Ladki Sunbai Yojana 2025: ‘लाडकी बहीण’ नंतर ‘लाडकी सुनबाई योजना! नेमकी काय आहे ही योजना, पहा सविस्तर

Ladki Sunbai Yojana in Marathi

Ladki Sunbai Yojana

ladki Sunbai Yojana 2025: सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डंका सुरू असताना आता शिंदे गटाकडून Ladki Sunbai Yojana ची घोषणा केली आहे. काय आहे ही योजना? नेमकी काय प्रक्रिया असणार आहे. आणि कधीपासून या योजनेला सुरुवात होणार आहे याची सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. राज्यातील महिलांसाठी ही अजून एक आनंदाची बातमी आहे.

जर तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट हवे असतील तर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा!

What Is Ladki Sunbai Scheme (लाडकी सुनबाई योजना काय आहे?)

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून लाडकी सूनबाई योजना घरोघरी पोहोचणार आहे. रविवारी याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. लाडकी सून या योजनेसाठी प्रत्येक शिवसेने शाखेमध्ये किंवा जे काही शिवसेनेचे विभागीय कार्यालय असेल या ठिकाणावरून त्यांना मदत केली जाणार आहे, तसेच एक हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. 

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आणि आता या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून लाडक्या सुनेवर जर कोणी अन्याय किंवा अत्याचार करत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या या हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधला तर त्यांना मदत केली जाणार आहे. राज्यस्तरावर ही मोहीम राबवली जाणार आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही लाडक्या सून आहेत त्यांना देखील याचा बाबतीत फायदा होणार आहे.

तसेच ज्या लाडके सासू आपल्या सुनांचा चांगला सांभाळ करत आहेत त्याकडे देखील शिवसेनेचे लक्ष दिले जाणार आहे. लाडकी सून या योजनेचा राज्य संबंधित पद ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना यावेळी देखील देण्यात आलेली माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सुनेसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

शिवसेना लाडकी सुनबाई योजना 2025

Ladki Sunbai Yojana बद्दल येणाऱ्या आणखी महत्त्वाचे अपडेट लवकर तुम्हाला दिल्या जातील. शेअर करा ही माहिती तुमच्या नातेवाईकांसोबत व परिवारासोबत. आणि पुढील अपडेट साठी आपला ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा आणि आपल्या वेबसाइट ला अवश्य भेट देत जा.

ही योजना पहा :

धन्यवाद!