Maharashtra Police Bharti 2025 Details in Marathi

Maharashtra Police Bharti 2025: आता महाराष्ट्र पोलिस दलात लवकरच मोठी भरती होणार आहे. शिपाई संवर्गातील १५ हजारहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. गृह विभागाने भरती प्रक्रियेचे आदेश जारी केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात नवीन कर्मचारी दाखल होणार आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातही १७२ जागा भरण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.
तुम्हाला जर पोलीस भरतीबद्दल सर्व अपडेट हव्या असतील तर आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा. पुढे तुम्हाला या होणाऱ्या भरतीबद्दल सर्व माहिती व प्रक्रिया ची माहिती देखील दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
Maharashtra Police Bharti 2025 Application Start Date
राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण १५ हजार ६३१ रिक्त पदांवर होणाऱ्या भरतीकरीता घटकनिहाय प्रक्रिया राबविण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून, सन २०२२ ते २०२५ या वर्षांत वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत.
आता त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांनीही ‘खाकीचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यासह पोलिस घटकांनीही आगामी निवडणुकांसह सणोत्सवाचा आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच या भरतीप्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.
ही अपडेट पहा : Jalna Police Patil Bharti 2025: जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 722 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी पास
गृह मंत्रालयाने राज्यात १५ हजार रिक्त पदांवर पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलिस घटकांत भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली, तरी ग्रामीण पोलिस दलात १७२ रिक्त पदांवर भरतीची शक्यता आहे.
सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे ‘बळ’ प्राप्त होईल. त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून, बारावीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनीही त्याकरीता तयारी सुरू केली आहे. पुढे दिलेल्या चार्ट मध्ये तुम्ही पदांची सविस्तर माहिती पाहू शकता.
Maharashtra Police Bharti 2025 Vacancy Details

दरम्यान, सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिस दलात १५० जागांवर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली, तर सन २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली. सहा वर्षानंतर २०२३ मध्ये भरती झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह जाणवला होता, तर नाशिक शहरात तब्बल आठ वर्षानंतर सन २०२४ मध्ये ११८ पदांवर भरती झाली.
त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. पुढील टप्प्यात शहरात भरती होणार नसली, तरी आंतरजिल्हा नियुक्तीतून रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांच्या रिक्त मनुष्यबळात १५० पोलिस अंमलदार आणि २२ वाहनचालक या पदांचा समावेश असेल.
त्यामुळे कित्येक वर्षांपासून ‘खाकी’चे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. सिंहस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांनी जोरदार तयारी केल्याचे दिसते. पुढे तुम्हाला या भरतीप्रक्रियेची माहिती दिली आहे.
Maharashtra Police Bharti 2025 Process
- उमेदवार एकपेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत
- सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
- प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी
- शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड
- पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा
- गुणवत्ता यादी शारीरिक व लेखी परीक्षेनंतर
- कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
अशा पद्धतीने ही भरतीप्रक्रिया होणार आहे. जर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तयारी जोरात चालू ठेवा. आणि ही माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :





