Dak Vibhag Bharti 2026: भारतीय डाक विभागात 10वी पास वर नोकरीची संधी!

Dak Vibhag Bharti 2026

Dak Vibhag Bharti 2026: तुम्ही १० वी पास असाल आणि जर भारतीय डाक विभाग मध्ये नोकरी करू इच्छित आहात तर सध्या डाक विभाग भरती 2025 सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी ते 08 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा (Written Exam) घेतली जाणार नाही. तुमची निवड केवळ एका साध्या मुलाखतीद्वारे (Interview) होणार आहे.

Dak Vibhag Recruitment 2026

विभागमाहिती
संस्थेचे नावभारतीय डाक विभाग (India Post)
पदाचे नावविमा प्रतिनिधी / एजंट (Direct Agent)
निवड प्रक्रियाथेट मुलाखत (Direct Interview)

ही भरती पहा : MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: एसटी महामंडळात उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

कोण अर्ज करू शकते? (Who can Apply?)

ही संधी केवळ बेरोजगार तरुणांसाठीच नाही, तर खालीलपैकी कोणीही यासाठी अर्ज करू शकतो:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • बेरोजगार तरुण आणि तरुणी.
  • निवृत्त शिक्षक किंवा माजी सैनिक.
  • अंगणवाडी ताई किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय करणारे व्यक्ती.
  • ग्रामपंचायत सदस्य किंवा ज्यांना विमा क्षेत्रात रस आहे असे सर्वजण.

आवश्यक पात्रता आणि कौशल्ये

  • शिक्षण: तुम्ही कोणत्याही बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • कौशल्य: तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य (Marketing Skills) अवगत असावे.
  • ज्ञान: थोडेफार संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक भागाची माहिती असणे फायद्याचे ठरेल.

वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ही अपडेट पहा : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर.

नोकरीचे ठिकाण आणि कमाई (Dak Vibhag Bharti 2026)

Dak Vibhag Bharti 2025 या भरतीद्वारे तुम्हाला सोलापूर शहर, मोहोळ, बार्शी आणि अक्कलकोट या भागांत काम करण्याची संधी मिळेल.

उत्पन्न (Income): यामध्ये ठराविक पगार नसून तुम्ही जेवढ्या विमा पॉलिसी विकाल, त्यावर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून आकर्षक कमिशन (Commission/Incentive) दिले जाईल. तुम्ही जेवढी मेहनत कराल, तेवढी तुमची कमाई वाढेल.

मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख (Interview Schedule)

मुलाखती ०५ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी उपस्थित राहू शकता:

  • १. अक्कलकोट टपाल कार्यालय.
  • २. बार्शी टपाल कार्यालय.
  • ३. मोहोळ टपाल कार्यालय.
  • ४. विभागीय कार्यालय, सोलापूर प्रधान डाक घर.

अर्ज कसा करावा? (How to Apply for Dak Vibhag Bharti 2026)

यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाही. तुम्हाला एका कोऱ्या कागदावर ‘वरिष्ठ अधीक्षक, सोलापूर विभाग’ यांच्या नावाने अर्ज लिहून मुलाखतीच्या ठिकाणी न्यायचा आहे.

सोबत न्यायची कागदपत्रे: मुलाखत साठी जाताना तुम्हाला पुढील कागदपत्रे लागणार आहेत.

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (Original & Xerox).
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
  • ३ पासपोर्ट साईज फोटो.
  • (निवड झाल्यावर ₹५,००० सुरक्षा अनामत म्हणून जमा करावे लागतील).

Dak Vibhag Bharti 2025 Notification PDF

Dak Vibhag Bharti 2026
लिंक प्रकारक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईटIndia Post

टीप: पोस्ट ऑफिससारख्या सरकारी संस्थेसोबत काम करणे हे केवळ उत्पन्नाचे साधन नाही, तर समाजात एक मान-सन्मान मिळवून देणारे काम आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका! आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा. Dak Vibhag Bharti 2026

ही भरती पहा :