BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिका मध्ये 1846 क्लर्क पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज

BMC Clerk Recruitment 2024 Notification

brihanmumbai mhanagarpalika Clerk Recruitment 2024

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये क्लर्क पदाची मेगा भरती निघाली आहे. BMC Clerk Recruitment 2024 या भरतीद्वारे 1846 पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

BMC Clerk Recruitment 2024 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Clerk Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाचे : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

हेही वाचा : Mumbai Metro Recruitment 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नवीन पदाची भरती! हे उमेदवार करा अर्ज

BMC Clerk Vacancy 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे क्लर्क पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.

प्रवर्गप्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या
अनुसूचित जाती142 पदे.
अनुसूचित जमाती150 पदे.
विमुक्त जाती-अ49 पदे.
भटक्या जमाती-ब54 पदे.
भटक्या जमाती-क 39 पदे.
 भटक्या जमाती-ड38 पदे.
विशेष मागास प्रवर्ग46 पदे.
इतर मागासवर्ग452 पदे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 185 पदे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग185 पदे.
खुला प्रवर्ग 506 पदे.

एकूण रिक्त पदे : असे मिळून एकूण 1846 पदे भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.

Educational Qualification for BMC Clerk Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा)

वयोमर्यादा :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 43 वर्ष.
  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी : 03 ते 05 वर्ष सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता की नाही.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन (BMC Clerk Salary) : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 25,500/- ते 81,100/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

BMC Clerk Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 900/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : उमेदवार 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत. मित्रांनो शेवटच्या तारखेची वाट पाहू नका लवकरात लवकर अर्ज करा.

BMC Clerk Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आज शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply For BMC Recruitment 2024

अर्ज कुठे करावा ?

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत. त्यानुसार, दिनांक 21 सप्टेंबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. 

उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी 9513253233  हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान (दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे. 

BMC Clerk Recruitment 2024 PDF

BMC Clerk Recruitment 2024 Apply Online

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर चालू भरतीच्या महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्त्वाचे : मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज साठी फक्त काही दिवस बाकी आहेत. आणि शेवटी शेवटी वेबसाइट स्लो चालते.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

BMC Clerk Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

दिनांक 21 सप्टेंबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

BMC Clerk Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 1846 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

BMC Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close