Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27: Management आणि Engineering च्या विद्यार्थ्यांना 1.5 लाख ते 10 लाख रुपये पर्यंतची स्कॉलरशिप!

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27: बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) या भारतातील अग्रगण्य वित्तीय संस्थेने ‘बडी४स्टडी’ (Buddy4Study) च्या सहकार्याने बजाज फिनसर्व्ह स्कॉलरशिप प्रोग्राम २०२६-२७ ची घोषणा केली आहे. या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना व्यवस्थापन (Management) आणि तंत्रज्ञान (Technology / Engineering) क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.

या स्कॉलरशिप अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दरवर्षी रु. १.५ लाख ते रु. १० लाखांपर्यंत ची भरघोस आर्थिक मदत दिली जाते. या स्कॉलरशिप साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे लगेच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27 Highlights

तपशीलविशिष्ट माहिती
स्कॉलरशिपचे नावबजाज फिनसर्व्ह स्कॉलरशिप प्रोग्राम २०२६-२७
प्रोजक संस्थाबजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv)
अंमलबजावणी भागीदारBuddy4Study
पात्र अभ्यासक्रमMBA, PGDM, PGP, B.E./B.Tech, M.E./M.Tech (CS, IT, AI/ML, Data Science)
स्कॉलरशिप रक्कमरु. १,५०,००० ते रु. १०,०००,००० (प्रतिवर्ष)
कौटुंबिक उत्पन्न मर्यादावार्षिक रु. १५ लाखांपेक्षा कमी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online Application)
अंतिम तारीख (Last Date)३० सप्टेंबर २०२६ (अंदाजे / नियतकालिक अपडेटनुसार लागू)
अधिकृत अर्ज लिंकयेथे क्लिक करून अर्ज करा (Apply Link)
ही अपडेट पहा : GMC Latur Bharti 2026: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर मध्ये ग्रुप D पदांची भरती.

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27 Benefits

हा स्कॉलरशिप प्रोग्राम दोन मुख्य विभागांमध्ये विभागला गेला आहे:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

१. मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी (For Management Students – MBA / PGDM / PGP):

  • पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून Full-time २ वर्षांच्या MBA, PGDM किंवा PGP च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
  • आर्थिक लाभ:दरवर्षी रु. १० लाखांपर्यंत शैक्षणिक खर्चासाठी मदत.

२. तंत्रज्ञान व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी (For Technology / Engineering Students – B.E./B.Tech & M.E./M.Tech):

  • पात्रता:
    • B.E. / B.Tech: ४ वर्षांच्या पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश (Computer Science, IT, AI/ML, Data Science किंवा Statistics शाखा).
    • M.E. / M.Tech: २ वर्षांच्या पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश (Computer Science, IT, AI/ML, Data Science किंवा Statistics शाखा).
  • आर्थिक लाभ:दरवर्षी रु. १,५०,००० (GATE स्टायपेंड सुरू असणाऱ्या M.Tech विद्यार्थ्यांनाही या योजनेचा स्वतंत्र लाभ घेता येतो).

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026 Eligibility Criteria

अर्जदारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. शैक्षणिक गुणवत्ता: इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये किमान ७५% गुण (किंवा समतुल्य CGPA) असणे आवश्यक आहे.
  2. उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न रु. १५ लाखांपेक्षा कमी असावे.
  3. कॉलेज रँकिंग (NIRF Criteria):Top 25 NIRF रँकिंग असलेल्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल (विशेषतः Top 10 NIRF मधील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य).
  4. विशेष प्राधान्य (Preference Criteria):
    • दिव्यांग विद्यार्थी (Persons with Disabilities – PwD)
    • एकच पालक (Single Parent) असलेले किंवा अनाथ विद्यार्थी.
  5. अपवाद: बजाज फिनसर्व्ह किंवा बडी४स्टडी कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिपसाठी पात्र नाहीत.
ही अपडेट पहा : Maha CID Pune Bharti 2026: अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग मध्ये नवीन भरती, पगार 41,800 पासून

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27 Required Documents

अर्ज करताना खालील कागदपत्रांच्या स्पष्ट डिजिटल प्रती (PDF/JPEG) अपलोड कराव्या लागतील:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • ओळखपत्र: आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट
  • शैक्षणिक कागदपत्रे:
    • इयत्ता १० वी आणि १२ वीची मार्कशीट
    • पदवीची मार्कशीट (M.Tech / MBA साठी अर्ज करत असल्यास)
  • प्रवेश पुरावा: चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate) किंवा कॉलेज आयडी कार्ड
  • फी पावती: चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेज फी पावती (Fee Receipt)
  • उत्पन्न दाखला: सक्षम प्राधिकरणाने दिलेला अधिकृत कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला / IT Return / Form 16
  • बँक खात्याचा तपशील: विद्यार्थ्याच्या नावाचे बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक (Cancelled Cheque)
  • इतर (लागू असल्यास): दिव्यांग प्रमाणपत्र / अनाथ किंवा सिंगल पेरेंट प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा? (How to Apply – Step-by-Step Guide)

  1. सर्वात आधी बडी४स्टडीच्या अधिकृत वेबसाईटवरील Bajaj Finserv Scholarship Page ला भेट द्या.
  2. तुमच्या Email ID / Mobile Number चा वापर करून नोंदणी (Register/Login) करा.
  3. ‘Apply Now’ या बटणावर क्लिक करा.
  4. अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक माहिती अचूक भरा.
  5. सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर आणि योग्य आकारात अपलोड करा.
  6. नियम व अटी (Terms & Conditions) स्वीकारून अर्ज काळजीपूर्वक तपासा (Preview).
  7. शेवटी ‘Submit’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज सादर करा.

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27 Apply Online

Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Apply OnlineApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
शेअर करा ही माहिती इतर मित्रांसोबत आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या Scholarships ची माहिती वेळेवर हवी असेल तर आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा: