Tata Capital Pankh Scholarship Program 2026-27 Information
Tata Capital Pankh Scholarship Program 2026: टाटा कॅपिटल लिमिटेड (Tata Capital Limited) या अग्रगण्य वित्तीय संस्थेकडून समाजकल्याण उपक्रमांतर्गत (CSR Initiative) ‘टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम’ राबवला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शालेय व उच्च शिक्षण विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे.
या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक फीच्या ८०% किंवा रु. १०,००० ते रु. ५०,००० पर्यंत ची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
Tata Capital Pankh Scholarship 2026 Details in Marathi
| तपशील | विशिष्ट माहिती |
| स्कॉलरशिपचे नाव | द टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम (The Tata Capital Pankh Scholarship Programme) |
| प्रोजक संस्था | टाटा कॅपिटल लिमिटेड (Tata Capital Limited) |
| अंमलबजावणी भागीदार | बडी४स्टडी (Buddy4Study) |
| पात्र अभ्यासक्रम | इयत्ता ११ वी, १२ वी, डिप्लोमा, पदवी (Undergraduate – General & Professional) |
| स्कॉलरशिप रक्कम | रु. १०,००० ते रु. ५०,००० प्रतिवर्ष (किंवा कोर्स फीच्या ८०%) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online Application) |
ही अपडेट पहा : Maharashtra Metro Bharti 2026: नागपूर व पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! पात्रता 10वी पास, पगार 1,00,000 पर्यंत
Tata Capital Pankh Scholarship Program 2026-27 Benefits
हा स्कॉलरशिप प्रोग्राम मुख्यत्वे तीन वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरांवर विभागला गेला आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
१. इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी (School Students – Class 11 & 12):
- पात्रता: मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ११ वी किंवा १२ वी मध्ये नियमित प्रवेश घेतलेला असावा. मागील परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ: रु. १०,००० पर्यंत (किंवा शैक्षणिक फीच्या ८०%).
२. सामान्य पदवी विद्यार्थ्यांसाठी (Undergraduate – General Degree Courses):
- पात्रता: B.A., B.Sc., B.Com., B.B.A. इत्यादी सामान्य पदवी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकत असलेले विद्यार्थी. मागील परीक्षेत किमान ६०% गुण आवश्यक.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. २.५ लाख ते रु. ४ लाखांपेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ: रु. १२,००० ते रु. २०,००० पर्यंत (किंवा कोर्स फीच्या ८०%).
३. व्यावसायिक पदवी व डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी (Professional Degree & Diploma Courses):
- पात्रता: B.E., B.Tech., MBBS, B.Arch. सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा करत असलेले विद्यार्थी. मागील वर्षात किमान ६०% गुण आवश्यक.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. ४,००,००० पेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ: रु. ५०,००० पर्यंत (किंवा शैक्षणिक फीच्या ८०%).
ही अपडेट पहा : SSC CHSL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2536 जागांसाठी भरती, पात्रता 12वी पास
Tata Capital Pankh Scholarship Program 2026 Eligibility
- शैक्षणिक गुण: उमेदवाराने मागील वर्षाच्या परीक्षेत/बोर्ड परीक्षेत किमान ६०% गुण मिळवलेले असावेत.
- उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न योजनेच्या अटींनुसार रु. २.५ लाख ते रु. ४ लाखांच्या आत असावे.
- नागरिकत्व: अर्जदार भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.
- विशेष प्राधान्य: दिव्यांग विद्यार्थी, अनाथ मुले, किंवा ज्यांच्या कुटुंबात कमावता व्यक्ती नाही अशा विद्यार्थ्यांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाते.
- अपवाद: टाटा कॅपिटल आणि बडी४स्टडी कर्मचाऱ्यांची मुले या योजनेसाठी पात्र नाहीत.
Tata Capital Pankh Scholarship Program 2026 Required Documents
अर्ज सबमिट करताना खालील कागदपत्रांच्या स्पष्ट स्कॅन प्रती अपलोड करणे आवश्यक आहे:
- ओळख पुरावा: आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे: मागील वर्षाची मार्कशीट (इयत्ता १० वी, १२ वी किंवा पदवी)
- प्रवेश पुरावा: चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate) किंवा फी पावती (Fee Receipt)
- उत्पन्न दाखला: तहसीलदार / सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला / Income Certificate / Form 16
- बँक खात्याचा तपशील: विद्यार्थ्याच्या नावाचे बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक (Cancelled Cheque)
- पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर/ईमेल आयडी
How to Apply for Tata Capital Pankh Scholarship Program 2026
- बडी४स्टडीच्या अधिकृत वेबसाईटवरील Tata Capital Pankh Scholarship Page वर जा.
- तुमच्या Email ID / Mobile Number चा वापर करून रजिस्टर किंवा लॉग इन (Login) करा.
- ‘Apply Now’ या बटणावर क्लिक करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे योग्य आकारात आणि फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- नियम व अटी मान्य करून ‘Preview’ वर क्लिक करून फॉर्म तपासा.
- सर्व माहिती अचूक असल्यास ‘Submit’ बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
ही अपडेट पहा : IBPS RRB Bharti 2026: IBPS मार्फत ग्रामीण बँक मध्ये 13,706 जागांसाठी मेगाभरती, Attractive Salary
Tata Capital Pankh Scholarship Program 2026-27 Apply Online

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Apply Online | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
शेअर करा Tata Capital Pankh Scholarship Program 2026 ही माहिती इतर मित्रांसोबत आणि तुम्हाला अशाच वेगवेगळ्या Scholarships ची माहिती वेळेवर हवी असेल तर आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :






