MPSC Success Story in Marathi: प्रत्येकाने वाचावी अशी यशोगाथा! पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी पद..

MPSC Success Story in Marathi

MPSC Success Story in Marathi: मित्रांनो आज प्रत्येक जन आयुषयामद्धे काही ना काही ध्येय ठेऊन ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण आपण जर एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केला तर त्यासाठी कष्टाची तयारी देखील ठेवावी लागते तेव्हाच ते ध्येय/ स्वप्न प्राप्त होते. आणि अशीच एक यशोगाथा तुम्हाला या लेखामध्ये पाहायला मिळणार आहे. ही यशोगाथा आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव येथील डॉ. महेश अरविंद घाटुळे यांची.

ही Success Story तुमच्यापुढे मांडण्याचा उद्देश एवढाच आहे की, आज प्रत्येक सामान्य कुटुंबातील उमेदवार असेच यश प्राप्त करण्यासाठी धडपड करत आहे. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला एक नवी आशा मिळेल. एवढी आमची इच्छा आहे.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC News

MPSC Success Story in Marathi: डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी जेव्हा या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाचा पाया मजबूत केला व त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्याचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या गावातच झाले. महेशनी त्यानंतर माध्यमिक शिक्षण अंबेजोगाईच्या गुरुदेव विद्यालयात तर उच्च माध्यमिक शिक्षण तेथीलच योगेश्वरी महाविद्यालयात पुर्ण केले. पुढे नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. चांगले शिक्षण घ्यायचं, सातत्यपूर्ण अभ्यास करायचा अन् चांगल्या हुद्यावर जायचं, असा त्यांचा ध्यास होता. एम.डी करत असताना त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.

पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम

MPSC
MPSC

MPSC Success Story in Marathi: अवघ्या २९ वर्षीय महेश घाटुळे यांनी २०२३ पहिल्या प्रयत्नात मध्ये पूर्व, मुख्य व तद्नंतर यंदा मुख्य परिक्षेत सलग यश मिळवलं. आणि ध्येयाला गवसणी घातली. यामध्ये त्यांच्या सर्व परिवरचाही त्यांना खूप पाठिंबा मिळाला. खर तर त्यांना एमडी करण्यासाठी पुण्याला पाठवले होते.

जेव्हा ते एमडी करण्यासाठी पुण्याला गेले तेव्हा त्यांना वडिलांनी 40 हजार रुपये दिले होते. पण त्यांनी त्या दिलेल्या पैशांचा खर्च पुस्तकांवर केला आणि दिलेल्या सर्व पैशांचे पुस्तके घेतले. आणि ते MPSC ची तयारी करण्यासाठी त्यांनी गाव गाठल.

गावी आल्यानंतर त्यांनी लॉकडाऊन चा पुरेपूर फायदा घेतला आणि 2023 मध्ये जेव्हा आयोगाचे नोटिफिकेशन आले तेव्हा त्यांनी त्यासाठी अर्ज केला. आणि पहिल्याच प्रयत्न मध्ये एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली. आज ते कित्येक मुलांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

मित्रांनो ही यशोगाथा तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे सध्या एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. आणि तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या Bhartiera.in या पोर्टल वरती मिळत राहतील त्यामुळे अवश्य भेट देत जा. 

धन्यवाद!

हेही वाचा :

close