eShram Card Yojana: कामगारांना मिळणार 3000 रुपये महिना! अर्ज सुरू

eShram Card Registration

e sharm

मित्रांनो केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात अशीच एक योजना eShram Card Pension Yojana (ई-श्रम कार्ड पेन्शन योजना) बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, ६० वर्षे वय पूर्ण झालेल्या कामगारांना केंद्र सरकारकडून दर महिन्याला ३००० रुपये दर महिन्याला पेन्शन मिळते. यामुळे, वृद्धापकाळात त्यांना कोणत्याही प्रकारचे काम न करता आरामदायी जीवन जगता येईल. ६० वर्षांनंतर त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि ते स्वतःच्या हिमतीवर आपला खर्च भागवू शकतील.

तर असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या सर्व मजुरांना ई-श्रम कार्डद्वारे पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कामगार कार्ड धारक आणि मजूर असाल, तर तुम्ही या योजनेचा अर्ज करून सहजपणे लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही सरकारकडून दरमहा ₹3000 पेन्शन मिळवू शकता. पुढे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत, आवश्यक पात्रता काय लागणार आहे? अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
हेही वाचा : Mahajyoti Tablet Yojana: 10वी उत्तीर्ण मुलांना मिळणार टॅब्लेट! कोचिंग, पुस्तके आणि बरेच काही

eShram Card Pension Scheme In Marathi

योजनेचा तपशील :

योजनेचे नाव ई-श्रम कार्ड पेन्शन योजना.
कोणी सुरू केली?केंद्र सरकार.
लाभार्थीबांधकाम कामगार वर्ग.
मिळणारा लाभ3000/- रुपये महिना.
अर्ज पद्धतीऑनलाइन
अधिकृत वेबसाइटeshram.gov.in

eShram Card Update

केंद्र सरकारने कामगार आणि मजूर वर्गासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश कामगार वर्गातील मजुरांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत पुरवणे हा आहे, जेणेकरून त्यांना आरामदायी जीवन जगता येईल. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या निराधार मजुरांना अनेकदा 60 वर्षांनंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 60 वर्षांनंतर दर महिन्याला ₹3,000 पेन्शन दिली जाते. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला 60 वर्षांपूर्वीच या योजनेत योगदान देणे आवश्यक आहे. तुम्ही या योजनेत ₹55 ते ₹200 पर्यंत प्रीमियम भरू शकता.

भारत सरकारकडून कामगाराला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयाची पेन्शन दिली जाणार आहे. तसेच 2 लाख रुपयांचा अपघात विमा देखील दिला जाणार आहे.

eShram Card Registration

जर तुम्ही या कार्ड करिता नोंदणी करणार आहात तर त्याकरिता काही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • ई-श्रम कार्ड (eShram Card) करिता अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 16 ते 59 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.
  • स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड ला फोन नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • स्वतःचे चालू बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
  • शिधापत्रिका.
  • अर्ज करणारा व्यक्ती हा EPFO/ ESIC आणि NPS चा सदस्य नसावा.

ई-श्रम कार्ड करिता कोण नोंदणी करू शकतो?

ई-श्रम कार्ड (eShram Card) करिता असंघटित क्षेत्रामधील कामगारांच्या श्रेणीमध्ये दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी/ सेल्समन/ हेल्पर, रिक्षा चालवणारे, पंचर दुरुस्ती करणारे, मेंढी पालन करणारे, ज्यांचा दुग्ध व्यवसाय आहे असे, पेपर फेरीवाले, सर्व पशुपालक, कोणत्याही कंपनीमध्ये असणारे डिलिव्हरी बॉय, वीट भट्ट्यांसारखे क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर इत्यादी लोक या कार्डसाठी नोंदणी करू शकतात.

E Shram Card Benefits in Marathi

ई-श्रम कार्ड अंतर्गत तुम्हाला किती योजनेचा लाभ मिळतो? त्या योजनांची लिस्ट पुढे दिली आहे.

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना.
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.
  • स्वयंरोजगार करण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
  • अटल पेन्शन योजना.
  • पीएम सुरक्षा विमा योजना.
  • प्रधानमंत्री आवास योजना.
  • राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना.
  • आयुष्यमान भारत योजना.
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना.
  • कौशल्य विकास योजना.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था योजना.

इत्यादी योजनांचा लाभ तुम्हाला या अंतर्गत मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर या कार्ड करिता नोंदणी करा. नोंदणी कशी करायची याची माहिती पुढे दिली आहे.

eShram Card Apply Online 2024

ई-श्रम कार्ड काढण्याची प्रक्रिया:

  1. सर्वात अगोदर तुम्ही ई-श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईट (eShram portal) वर जा.
  2. त्यानंतर REGISTER on eSharm हा पर्याय निवडा.
  3. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड सी लिंक असणारा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  4. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल.
  5. ओटीपी टाकल्यानंतर एका नवीन पेज वरती एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.
  6. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व हवी ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  7. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.
  8. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 10 अंकी ई-श्रम कार्ड (eShram Card) जारी केले जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप या कार्डसाठी नोंदणी करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन देखील नोंदणी करू शकता.

महत्वाचे :

मित्रांनो जर (eShram Card) ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या कार्डचा लाभ घेता येईल. आणि सरकारच्या अशाच नवीन येणाऱ्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://bhartiera.in/ पोर्टलला अवश्य भेट देत जा. 

हेही वाचा :

UCO Bank Recruitment 2024: युको बँक मध्ये 544 पदांची भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

FAQ:

ई-श्रम कार्ड कसे काढावे?

ई-श्रम कार्ड काढण्याकरिता तुम्ही पुढील स्टेप फॉलो करू शकता.
1. सर्वात अगोदर तुम्ही ई-श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
2. त्यानंतर REGISTER on eSharm हा पर्याय निवडा.
3. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड सी लिंक असणारा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
4. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल.
5. ओटीपी टाकल्यानंतर एका नवीन पेज वरती एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.
6. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व हवी ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
7. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.
8. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 10 अंकी ई-श्रम कार्ड जारी केले जाईल.

ई-श्रम कार्ड म्हणजे काय आहे?

ई-श्रम कार्ड म्हणजे भारत सरकारने देशातील असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक मदत मिळण्याकरिता ई-श्रम कार्ड ही सुविधा सुरू केली आहे.

ई-श्रम कार्ड पात्रता काय हवी आहे?

ई-श्रम कार्ड करिता अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 16 ते 59 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा व्यक्ती हा EPFO/ ESIC आणि NPS चा सदस्य नसावा.

close