GSSC Goa Group C Bharti 2025: गोव्यात २१९ सरकारी जागांसाठी मेगा भरती! अर्ज प्रक्रिया सुरू.

GSSC Goa Recruitment 2025

GSSC Goa Group C Bharti 2025: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर गोवा कर्मचारी निवड आयोग (GSSC) मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आली आहे. कारण विविध सरकारी विभागांमध्ये गट ‘क’ (Group C) च्या एकूण २१९ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये लिपिक, तलाठी, तांत्रिक साहाय्यक आणि इतर अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

GSSC Goa Group C Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती मिळणार आहे. आणि अशाच अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

GSSC Goa Group C Bharti 2025 Notification

विभागमाहिती
संस्थेचे नावगोवा कर्मचारी निवड आयोग (GSSC)
पदाचे नावगट ‘क’ (Group C) – विविध पदे
एकूण रिक्त पदे२१९ जागा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
नोकरी ठिकाणगोवा (Goa State)

रिक्त पदांचे नाव आणि तपशील (Vacancy Details)

GSSC Goa Group C Bharti 2025 या भरती प्रक्रियेत २० पेक्षा जास्त कॅटेगरीमधील पदे भरली जाणार आहेत. काही प्रमुख पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पदाचे नावरिक्त पदेवेतन पातळी
तलाठी३०पातळी-२
ग्रामपंचायत सचिव२६पातळी-३
प्रयोगशाळा सहाय्यक४६पातळी -४
अकाउंट्स क्लार्क१२पातळी -४
तपासकर्ता२७पातळी -४
अवल कारकुन१२पातळी -५
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१७पातळी -५
कनिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ०७पातळी-६
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ०३पातळी-६
इतर गट क पदे३९पातळी २-६
एकूण२१९

ही भरती पहा : Dak Vibhag Bharti 2026: भारतीय डाक विभागात 10वी पास वर नोकरीची संधी!

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility)

उमेदवारांना पदांनुसार शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे:

  • शैक्षणिक पात्रता: पदांनुसार पदवी (Science/Commerce/Arts), इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अनिवार्य आहे.
  • भाषा ज्ञान: उमेदवाराला कोकणी (Konkani) भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. (मराठी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल).
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी सवलत लागू असेल).

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

निवड प्रक्रिया आणि अर्ज फी (Selection Process)

  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) आणि काही पदांसाठी कौशल्य चाचणी (Skill Test) द्वारे केली जाईल.
  • अर्ज फी: अर्जासाठी लागणाऱ्या शुल्काची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स (Important Dates)

GSSC Goa Group C Bharti 2025
कार्यक्रमतारीख / वेळ
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख०५ डिसेंबर २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ डिसेंबर २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत)
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटgssc.goa.gov.in
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
GSSC Goa Group C Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचणे आवश्यक आहे. गोव्यामध्ये स्थायिक असलेल्या आणि कोकणी भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुदतीपूर्वीच आपला अर्ज सादर करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी भरती एरा वेबसाइट ला भेट द्या.

ही अपडेट पहा :