KDMC Bharti 2026 Notification

मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामुळे या लेखात आपण Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती पाहणार आहोत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जुलै 2026 आहे.
Friends, an advertisement for recruitment to various positions in the Kalyan Dombivli Municipal Corporation has been published. Therefore, in this article, we will see all the information about KDMC Recruitment 2026. The last date to apply for this recruitment is July 2, 2026.
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर लगेच आपला ग्रुप जॉइन करा.
KDMC Recruitment 2026 in Marathi
हेही वाचा : BMC Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात २०२६.
भरतीचा विभाग : ही भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कल्याण डोंबिवली मध्ये नोकरी मिळणार आहे.
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.
| पदाचे नाव | पदसंख्या | आवश्यक शैक्षणिक पात्रता | मासिक मानधन | वयोमर्यादा |
| १. अंशकालीन वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग/फिजिशियन/बालरोग) | १९ | MBBS पदवी + PG पदवी / डिप्लोमा + संबंधित कामाचा अनुभव. | रु. ३०,०००/- | १८ ते ६९ वर्षे |
| २. बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) | ०१ | MD (Pediatrics) / DCH / DNB उत्तीर्ण. | रु. ७५,०००/- | १८ ते ६९ वर्षे |
| ३. साथरोगतज्ज्ञ (Epidemiologist) | ०१ | MBBS किंवा आरोग्य विज्ञान पदवी (BDS/BAMS/BHMS/BUMS/BPTh/B.Sc Nursing) आणि सोबत MPH / MHA / MBA (Health Care). | रु. ३५,०००/- | १८ ते ६९ वर्षे |
| ४. स्टाफ नर्स (Staff Nurse) | २३ | १२वी उत्तीर्ण + GNM कोर्स किंवा B.Sc Nursing उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (MNC) कडे नोंदणी वैध + अनुभव. | रु. २०,०००/- | १८ ते ६४ वर्षे |
| ५. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Tech) | ०९ | १२वी विज्ञान (10+2 Science) + DMLT कोर्स उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणी अनिवार्य + अनुभव. | रु. १७,०००/- | १८ ते ६४ वर्षे |
| ६. औषधनिर्माता (Pharmacist) | ०१ | D.Pharm / B.Pharm उत्तीर्ण आणि महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी वैध + अनुभव. | रु. १७,०००/- | १८ ते ६४ वर्षे |
| ७. सहाय्यक परिचारिका सुईण (ANM) | २१ | किमान १०वी उत्तीर्ण + RANM / ANM कोर्स उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (MNC) कडे नोंदणी वैध + अनुभव. | रु. १८,०००/- | १८ ते ६४ वर्षे |
| एकूण पदे | ७५ |
एकूण रिक्त पदे : 75 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
ही अपडेट पहा :
वयोमर्यादा : 18 ते 69 पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत :
- वैद्यकीय अधिकारी व सल्लागार पदे: थेट वॉक-इन मुलाखत.
- स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM पदे: ऑफलाइन अर्ज.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 Apply Last Date
थेट मुलाखतीची तारीख: ३० जून २०२६ (वैद्यकीय अधिकारी व तज्ञ पदांसाठी).
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ आणि ०२ जुलै २०२६ (नर्सिंग, फार्मासिस्ट व तांत्रिक पदांसाठी).
अर्ज सादर करण्याचा व मुलाखतीचा अधिकृत पत्ता: ‘क’ प्रभाग कार्यालय, दुसरा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी फायर स्टेशन जवळ, कल्याण (पश्चिम).
How to Apply for Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026
अशा पद्धतीने अर्ज करा :
१. थेट मुलाखत (पद क्र. १ ते ३ साठी – ३० जून २०२६)
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कोणताही आधी फॉर्म पोस्टाने न पाठवता, ३० जून २०२६ रोजी सकाळी सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे, त्यांच्या छायांकित प्रती (Zerox) आणि अपडेटेड बायोडाटासह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. KDMC Recruitment 2026
२. ऑफलाइन अर्ज पद्धत (पद क्र. ४ ते ७ साठी – ०१ व ०२ जुलै २०२६)
या पदांसाठी उमेदवारांनी पालिकेच्या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा. तो अचूक भरून, त्यावर फोटो चिकटवून, सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून ०१ आणि ०२ जुलै २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत स्वतः जाऊन किंवा सुरक्षित टपालाने सादर करायचा आहे
अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी?
- नर्सिंग (Staff Nurse/ANM), लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट पदांसाठी संबंधित कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) वैध आणि नूतनीकरण केलेले असणे अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज बाद केला जाईल. KDMC Recruitment 2026
- ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ०१ आणि ०२ जुलै २०२६ हीच आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आधीच अर्ज सादर करा.
- अर्जाच्या लिफाफ्यावर “राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत [पदाचे नाव] पदाकरिता अर्ज” असे ठळकपणे नमूद करा.
KDMC Bharti 2026 PDF Link

| नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. जेणेकरून त्यांना या भरतीच्या सर्व पदांचा अभ्यासक्रम बद्दल माहिती मिळेल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
हेही वाचा :





