Ladka Shetakri Yojana 2024 Maharashtra
आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि यामध्ये Ladka Shetakri Yojana 2024 ची मोठी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र मध्ये नुकतीच “लाडकी बहीण योजना” सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. तसेच या योजनेचे मिळणारे पैसे महिलांच्या Bank Account मध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे. आणि त्यानंतर लगेच “लाडका शेतकरी योजना 2024” ही योजना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Ladka Shetakri Yojana 2024 in Marathi
मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे.
महायुती सरकारने ही जी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. आणि हे सर्व चालू असताना आज अशातच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली.
हे महत्वाचे पहा : Ladki Bahin Yojana Website: आता लाडकी बहीण योजना मधील “या” महिलांना मिळणार 4500 रुपये! पहा यादी
एकनाथ शिंदे नेमक काय म्हणाले?
आज झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव मध्ये बोलताना एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की “महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली.
आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरही लाडका होणार”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. कोणत्या पिकासाठी किती रुपये मिळणार याची माहिती पुढे दिली आहे.
कापूस आणि सोयाबीन साठी हेक्टरी ५ हजारांची घोषणा :
एकनाथ शिंदे या Ladka Shetakri Yojana 2024 योजनेबद्दल बोलताना म्हणाले की “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला ५ हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही ५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असणार आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
“आता आपण ते ई-पीक पाहणी वैगेरे बाजूला ठेवणार आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे. त्या शेतकऱ्यांना आपण ५ हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत. विरोधक म्हणाले की, मग मागच्या वीज बिलाचं काय? आम्ही शेतकऱ्यांचं येणारं वीज बिल घेत नाही तर मग थकलेलं कसं घेणार? मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत”, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
मित्रांनो ही माहिती इतरांसोबत देखील नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील तसे देशातील अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी Bhartiera.in ला आवश्य भेट देत जा.
महत्वाचे :
या योजनेबद्दलचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट तुम्हाला ते तुमच्या व्हाट्सअप वरती मिळतील.
Ladka Shetakri Yojana 2024 Apply
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄योजनेचा GR | लवकरच अपडेट करण्यात येईल |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
योजनेबद्दल विचारले जाणारे काही प्रश्न :
Ladka Shetakri Yojana 2024 कधीपासून सुरू होणार आहे?
बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव मध्ये बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या Ladka Shetakri Yojana 2024 योजनेची घोषणा केली आहे. याबद्दलचे येणारे अपडेट लवकरच मिळतील.