Ladki Bahin Yojana 2024: महिलांना दर महिन्याला मिळणार 1500 रुपये! येथून करा अर्ज

Ladki Bahin Yojana Maharashtra

maharashtra government

मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की महाराष्ट्र शासन सतत नवनवीन योजना राबवत असते आणि अशीच एक योजना म्हणजे Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील सुमारे २.५ कोटी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात यावर्षी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आणि यामध्ये सर्वाधिक पसंती मिळालेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) द्वारे सुमारे २.५ कोटी महिलांना त्यांच्या बँक खात्यावर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा झाली आहे.

त्यामुळे राज्यातील महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेबद्दलची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया यासोबतच अधिकृत शासन निर्णय आणि सर्व अटींची माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

Ladki Bahin Yojana in Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर दिनांक 01 जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यानुसारच राज्यभरातून सर्व पात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
योजना नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मिळणारा लाभ1500/- रुपये महिना.
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने.
अर्ज कोठून करायचा?अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय मधून.
अर्ज करण्यास सुरुवात01 जुलै 2024 पासून अर्ज सुरू.
अर्जाची शेवटची तारीख15 जुलै 2024 पर्यन्त.

खर तर मध्यप्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडली बेहना योजनेच्या धर्तीवर ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार? आर्थिक लाभ किती मिळणार? अर्ज कसा करायचा? कोणाला अर्ज करता येणार? प्रक्रिया काय असणार? अशी सर्व माहिती आता आपण पुढे जाणून घेऊ.

हेही वाचा : PM Yashasvi Scholarship 2024: विद्यार्थ्यांना 1,25,000 ची कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज

Majhi Ladki Bahin Yojana Benefits

योजनेचे फायदे :

या योजनेचा फायदा म्हणजे या योजनेद्वारे अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे 1500/- रुपये दिले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याला 1500 म्हणजे वर्षाला एकूण 18,000 रू. महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे महिलांना चांगले आर्थिक सहाय्य मिळणर आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Criteria

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे कारण ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. आवश्यक पात्रतेची माहिती पुढे दिली आहे.

  • महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात.
  • महिलेचे वय हे 21 ते 60 वर्षा पर्यंत असावे.
  • विवाहित, विधवा, निराधार महिलांना प्राधान्य असणार आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख पेक्षा कमी असावे.
  • महिलेचे बँक खाते असावे.
  • महिलेच्या नावाने चारचाकी गाडी, ट्रॅक्टर नसावे. (कुटुंबातील कोणाच्याही नावाने नसावे)
  • कुटुंबाची संयुक्त शेतजमीन ही 5 एकर पेक्षा कमी असावी.

Majhi Ladki Bahin Yojana Documents

आवश्यक कागदपत्रे : या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची लिस्ट पुढे दिली आहे.

  1. महिलेचे आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. जन्म दाखला
  4. कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  5. बँक खाते पासबुक
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. रेशन कार्ड
  8. योजनेच्या अटीचे पालन करण्यासंबंधी हमीपत्र.

Majhi Ladki Bahin Yojana GR PDF

योजनेचा GRयेथे क्लिक करा
अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा

Majhi Ladki Bahin Yojana Registration

माझी लाडकी बहिण योजना साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांना अंगणवाडी केंद्रात जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. योजनेसाठी शासनाने GR प्रसिद्ध केला आहे, त्यामुळे आता लवकरच फॉर्म सुरु होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • सर्वात पहिल्यांदा जेव्हा या योजनेसाठी अर्ज सुरु होतील, तेव्हा तुम्हाला माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म मिळवायचा आहे.
  • त्यानंतर योजनेच्या फॉर्म वर जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या, माहिती चुकीची नसावी, त्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरा.
  • फॉर्म सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत, ते पण करून घ्या.
  • एकदा का फॉर्म मध्ये document अपलोड केले कि नंतर तुम्हाला थेट फॉर्म तपासून सबमिट करायचा आहे.
  • जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेंतर्गत पैसे मिळतील.
प्रारूप निवड यादी प्रकाशित16 ते 20 जुलै.
प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे21 ते 30 जुलै.
लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रकाशित01 ऑगस्ट.
योजनेचा लाभ देण्यास सुरुवात14 ऑगस्ट पासून.

तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरल्यानंतर जसे पीक विम्याचे किंवा PM KISAN योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळतात त्याच प्रकारे तुम्हाला पण प्रत्येक महिन्याला 1500/- रुपये मिळणार आहेत.

महत्वाचे :

Majhi Ladki Bahin Yojana बद्दलची ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. आणि शासनाच्या अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट साठी bhartiera.in ला भेट देत जा. आणि जर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच करा जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला व्हाट्सअप वरती देखील मिळतील. 

हेही वाचा :

Savitribai Phule Aadhaar Yojana: OBC विद्यार्थ्यांना 60,000! असा करा अर्ज

माझी लाडकी बहीण योजना बद्दल विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :

माझी लाडकी बहीण योजना द्वारे महिलांना किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे?

या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

Majhi Ladki Bahin Yojana साठी अर्ज केव्हा सुरू होणार आहेत?

या योजनेसाठी 01 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.

Ladki Bahin Yojana साठी आवश्यक पात्रता काय आहे?

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 21 वर्षे वयाच्या महिला पात्र असणार आहेत, वयाची मर्यादा ही 60 वर्षे आहे. इतर सर्व माहिती तुम्हाला वरती लेखामध्ये मिळेल.

close