Ladki Bahin Yojana New Update 2025
आताच कुठे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना चा डिसेंबर हप्ता मिळायला सुरुवात झाली होती. आणि अशातच Ladki Bahin Yojana New Update 2025 समोर आलीये. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Laadki Bahin Yojna) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे. तुमचे पण नाव योजनेमधून वगळले जाऊ शकते का? याची माहिती तुम्ही पाहू शकता की नेमक कोणत्या महिलांचे अर्ज पुनः तपासले जाणार आहेत.
तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
Ladki Bahin Yojana News Today
आजची महत्वाची अपडेट : मित्रांनो अदिती तटकरे यांनी मीडिया सोबत संवाद साधतान असे सांगितले आहे की “लाडकी बहिण योजनेच्या मूळ जीआरमध्ये आम्ही कोणतेही बदल करत नाही. स्थानिक प्रधानाकडून तक्रारी आल्या आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांची पडताळणी होणार आहे. सरसकट पडताळणी होणार नाही. ज्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या आहेत त्यांची पडताळणी होणार आहे. काही तक्रारी आम्हाला लाभार्थी महिलांकडून प्राप्त झाल्या आहेत,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
त्या असे देखील म्हणाल्या की “लाडकी बहीण योजनेसंदर्भात आम्हाला एक ते दीड महिन्यात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या सर्व तक्रारींची दखल घेतली असून छाननी करत आहोत. यासाठी आम्ही इन्कम टॅक्स, तसंच चारचाकीची माहिती घेण्यासाठी आरटीओ विभाग यांची मदत घेणार आहोत,” असं त्या म्हणाल्या आहेत.
मिळणाऱ्या लाभाबाबत बोलता त्या म्हणाल्या की, “ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार. काही महिला लग्न झाल्यानंतर राज्याबाहेर गेल्या आहेत त्यांना लाभ मिळणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही महिलांनी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. पालकमंत्रीपदाबाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतली असं त्या म्हणाल्या आहेत. Ladki Bahin Yojana New Update 2025
Ladki Bahin Yojana New Changes
लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत त्याची माहिती पुढे दिली आहे. जर तुम्ही अशी चूक केली असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
- ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार पडताळणी
- चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी
- एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार पडताळणी
- लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
- आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार
अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने पडताळणी होणार असल्याचं सांगितले आहे. काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता पात्र नसल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मूळ जीआरमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे देखील अदिती तटकरे यांनी सांगितलं. Ladki Bahin Yojana New Update 2025
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जर या योजनेबद्दल आणखी काही महत्वाची अपडेट आली तर तुम्हाला सर्वात अघोडार त्याची माहिती मिळेल. त्यासाठी आपल्या टेलेग्राम ग्रुप ला लगेच जॉइन व्हा! आणि ही माहिती तुमच्या बहिणी तसेच मैत्रिणींना देखील शेअर करा. Ladki Bahin Yojana New Update 2025
हेही पहा :
धन्यवाद!