लाडकी बहीण योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी खूप मोठी बातमी समोर अलीये. कारण आता राज्यातील तब्बल 50 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे. आणि त्याचे कारणही समोर आल आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. आणि त्यातील अपात्र महिलांना बाद करण्यात आले आहे.
50 लाख महिलांना कशामुळे लाभ मिळणार नाही याची कारण (Ladki Bahin Yojana News Today Marathi) तुम्ही पुढे पाहू शकता. आणि जर तुम्हाला अशाच अपडेट हवे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Ladki Bahin Yojana 50 Lakh Women Ineligible
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची जीवा पडताळणी करण्यात आली त्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ चाळीस लाख 28 हजार महिला अपात्र ठरले आहेत. त्याच्यासोबतच जवळपास चौदा लाख महिला या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या योजनेत त्यांना फक्त पाचशे रुपये हप्ता मिळतो. आणि काही महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
या महिलांच्या नावापुढे फायनान्शिअल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारून लाल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अशा महिला देखील या योजनेमधून अपात्र करण्यात आल्या आहेत. Ladki Bahin Yojana News Today Marathi
पडताळणी प्रोसेस : लाडकी बहीण योजनेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता. आणि हा लाभ महिलांना काही महिने मिळाला मात्र यात अनेक महिला पात्र असल्याचे समोर आले. त्यामुळे पाच महिन्यात पडताळणी करण्यात आली. आणि कित्येक महिलांनी अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेमध्ये आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. आणि जेव्हा या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली तर 14,298 पुरुषांनी पण या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2289 सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 32 लाख महिला, 65 वर्षांवरील एक लाख दहा हजार महिला आणि एकच कुटुंबातील अनेक महिलांनी लाभ घेतला आहे.
त्यातील चार महिलांचे अर्ज बंद करण्यात आले आहेत. चार चाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या सव्वा दोन लाख आहे. आणि याच्या शिवाय साठ हजार महिलांचा स्वतःहून लाभ नाकारला असल्याचे समोर आले आहे. अशा या संपूर्ण आकडेवारीनुसार जवळपास 50 लाख महिलांचा लाभ बंद केल्या असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील सध्या एकूण 2.59 कोटी महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. आणि अजून देखील या योजनेतील पडताळणी सुरूच आहे. त्यामुळे अजून या आकडेवारीमध्ये वाढ होऊ शकते. जर तुमचे घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांनाही माहिती लगेच शेअर करा. Ladki Bahin Yojana News Today Marathi