Maharashtra Police Bharti 2024 Notification
मित्रांनो या पोलीस भरतीमध्ये जर तुमचे स्वप्न पूर्ण झाले नसेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Police Bharti 2024 द्वारे डिसेंबर मध्ये पुन्हा 7500 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोराने तयारीला लागा. ज्या चुका या भरतीमध्ये झाले आहेत त्या नक्की सुधारा.
महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास ३५ हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत. राज्यात २०२२ व २०२३ मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती ( Police Bharti December2024 ) होणार आहे.
मित्रांनो जर तुम्हाला या भरतीचे येणारे सर्व अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Police Bharti 2024 New Update
जेव्हा करोना आला होता तेव्हा सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती (Police Recruitment 2024) राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होणार आहे.
हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 क्लर्क जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज
त्यामुळे ज्या उमेदवारांना 17000+ पदांच्या झालेल्या पोलिस भरती मध्ये यश मिळवता आले नाही त्यांना पुनः एकदा मोठी संधी मिळत आहे. तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जोराने काम चालू आहे.
पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. आणि ही भरती प्रक्रिया संपुष्टात आली की लगेच डिसेंबर मध्ये राज्यात नवीन पोलिस भरतीला (Maharashtra Police Bharti 2024) सुरुवात होणार आहे. अशी मोठी माहिती समोर आली आहे.
Mumbai Police Bharti 2024
मुंबई पोलीस मध्ये होणार वाढ : मुंबईत ४,२३० पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे ५ लाख ६९ हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार ५७२ पोलीस हवालदार, ९१७ चालक, ७१७ तुरुंग हवालदार आणि २४ बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.
सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे. आणि या नंतरही डिसेंबर मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस दलाला आणखी १२०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत.
Maharashtra Police Bharti 2024 GR
पोलीस भरतीचा GR तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये मिळेल त्यासाठी ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा.
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
Maharashtra Police Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्वाची प्रश्न :
Maharashtra Police Bharti 2024 मध्ये किती पदे भरणार आहेत?
डिसेंबर मध्ये होणाऱ्या पोलीस भरती मध्ये 7000 पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे.