Maharashtra Police Bharti 2025: पोलीस भरती थांबवू नका सरकारला उच्च न्यायालयाचा इशारा, पूर्ण माहिती येथे

Maharashtra Police Bharti 2025 News Marathi

Maharashtra Police Bharti 2025: मित्रांनो राज्यातील लाखों उमेदवार पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. पोलिस भरती सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. नागपूर खंडपीठाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने गृह विभागाच्या दोन उच्च अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. पोलिस आयुक्तांनी शहरात ८३८ पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले. रिक्त पदांसाठी गृह विभाग आणि वित्त विभागात बैठका देखील झाल्या.

पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाटसप्प तसेच टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Police Bharti 2025 Maharashtra new Update

सध्या पोलिस भरती करणे हे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा असल्याचे शपथपत्र गृह विभागाच्या उपसचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. आणि उपसचिवांच्या या शपथपत्रावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने गृह विभागाचे अतिरिक्त सचिव आणि उपसचिव यांना सोमवारी अवमानना नोटीस बजावली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

पोलीस भरती जनहित याचिका

शहरातील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांबाबत नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेत फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. आणि या प्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पोलिस आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची ४४७ पदे मंजूर असून नव्या ३९१ पदांसह एकूण ८३८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या आदेशानुसार, शहर पोलिस आयुक्तालयातील या ४४७ आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या ३९१ रिक्त पदे चार आठवड्यांत भरली जावीत. Maharashtra Police Bharti 2025

तसेच, अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्याचे आदेशात नमूद केले होते. त्यानंतर, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयाने राज्य शासनातर्फे या प्रकरणातील प्रगतीबाबत दोन आठवड्यांत उत्तर मागितले होते. आणि त्यानंतर दोनदा संधी देऊनही समाधानकारक उत्तर दाखल न केल्याने न्यायालयाने या दोन्ही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावली. न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. राहील मिर्झा, मध्यस्थी अर्जदाराकडून अॅड. आर. पी. जोशी आणि शासनातर्फे अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

📢 नवीन अपडेट साठी चॅनेलTelegram
WhatsApp
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here

नवीन पदभरतीच्या प्रस्तावावर बैठक

पोलिस महासंचालकांकडून १२ मार्च २०२५ रोजी नागपूर शहर आणि ग्रामीण पोलिसांसाठी नवीन पद भरती संदर्भात दोन प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांनी शपथपत्र दाखल करत दिली. बजेट आणि पद निर्मितीला मंजुरी मिळावी म्हणून हे प्रस्ताव २ मे २०२५ रोजी वित्त विभागाकडे पाठवण्यात आले. ३ जून २०२५ रोजी वित्त विभागाने या प्रस्तावांवर बैठक घेतली आणि काही प्रश्न उपस्थित केले. Maharashtra Police Bharti 2025

ही अपडेट पहा :