Majhi Ladki Bahin Yojana New Update: आता सर्व महिला असणार पात्र! पहा नवीन नियम

Majhi Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

यावर्षीच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेली सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या (Majhi Ladki Bahin Yojana New Update) योजनेबद्दल आता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. यामधील अटींमध्ये तसेच कागदपत्रांमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे आणि अनेक महिलांच्या तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागणीनंतर या योजनेत देखील अपडेट करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आता या योजनेमद्धे बरेच बदल (Majhi Ladki Bahin Yojana New Update) करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये असणारी वयोमर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. आणि कागदपत्रांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुमच्या घरामधून तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढे या नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो जर तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी अपडेट मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन शासन निर्णय :

मित्रांनो ही योजना राज्यभरामध्ये सुरू करण्यात आले आहे. आणि त्यासाठी अर्ज करण्याची तारीख 01 जुलै पासून सुरू करण्यात आली होती. आणि अर्जाची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 होती. परंतु या योजनेवर मोठ्या प्रमाणावर विरोधकांकडून टीका करण्यात आल्या कारण यामध्ये टाकलेल्या जाचक अटी असतील किंवा कागदपत्रांची पूर्तता असतील यासोबतच अर्ज करण्याची मुदत असेल या सगळ्या गोष्टींमुळेच सेतू केंद्रांवर तसेच ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला गर्दी करत होत्या.

यामुळेच या योजनेचा सर्व बाबतीत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यामुळेच हे योजनेमध्ये आता विविध बदल (Majhi Ladki Bahin Yojana New Update) करण्यात आले आहेत. त्याची माहिती तुम्ही पुढे बघू शकता.

योजनेच्या अगोदरच्या अटी :

  • महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात.
  • महिलेचे वय हे 21 ते 60 वर्षा पर्यंत असावे.
  • विवाहित, विधवा, निराधार महिलांना प्राधान्य असणार आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख पेक्षा कमी असावे.
  • महिलेचे बँक खाते असावे.
  • महिलेच्या नावाने चारचाकी गाडी, ट्रॅक्टर नसावे. (कुटुंबातील कोणाच्याही नावाने नसावे)
  • कुटुंबाची संयुक्त शेतजमीन ही 5 एकर पेक्षा कमी असावी.
हेही वाचा : PM Yashasvi Scholarship 2024: विद्यार्थ्यांना 1,25,000 ची कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज

🆕 माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट

🚜 ०५ एकर शेती संदर्भातील अट :

  • कारण अगोदर योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे एकत्रित ०५ एकर जमीन असल्यास या महिलेला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नव्हता. आणि त्यामुळे या देखील मागणीवर अनेकांनी पुनर्विचार करण्यासाठी सरकारला आवाहन केले होते आणि यानुसारच आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये (Majhi Ladki Bahin Yojana New Update) हा देखील निर्णय आता रद्द केला आहे आणि त्यामुळेच आता ज्या शेतकरी कुटुंबाच्या एकत्रित नावावर ०५ एकर जमीन असणार आहे अशा देखिल महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

📄 डोमासाईल सर्टिफिकेट :

  • सुरुवातीला योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजेच की डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे ते सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आले होते परंतु आता अनेक महिला लाभार्थींकडे हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्याऐवजी महिला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

👧 वयोमर्यादा :

  • नवीन शासन निर्णयानुसार (Majhi Ladki Bahin Yojana New Update) महिलांची वयोमर्यादा जी अगोदर 21 ते 60 वर्षे होती त्यामध्ये बदल करून आता वयोमर्यादा ही 21 ते 65 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळेच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे. तसेचज्या महिलेचा जन्म पर राज्यात झाला आहे अशा महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास अशा वेळेस त्यांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा अधिवास प्रमाणपत्र असल्यास यादेखील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

💵 वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र :

  • योजनेमध्ये अगोदर महिलेच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला अनिवार्य करण्यात आला होता परंतु उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जास्त वेळ लागत आहे असे खूप महिलांकडून सांगण्यात येत होते आणि यामुळेच आता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे म्हणजेच की २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे परंतु काही कारणामुळे महिलांकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल (Majhi Ladki Bahin Yojana New Update) तर अशा महिला त्यांच्या कुटुंबाचे असणारे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दाखवून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत म्हणजेच की उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील लागणार नाही.

👰अविवाहित महिलांना मिळणार लाभ :

योजनेमध्ये सुरुवातीला फक्त विवाहित, विधवा, निराधार महिलांना प्राधान्य असणार होते त्यामुळे अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हत्या. परंतु आता नवीन शासन निर्णयानुसार सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

📄 अर्जाची शेवटची तारीख :

योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 होती परंतु यामुळे सेतू केंद्रावर तसेच ग्रामपंचायत मध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी नवीन शासन निर्णयानुसार या योजनेसाठी अर्ज शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठरवण्यात आली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांना अर्ज करण्यास उशीर होईल त्यांना देखील जुलै महिन्यापासूनच 1500 रुपये मिळायला सुरुवात होणार आहे.

योजनेचा GRयेथे क्लिक करा

महत्त्वाचे :

👍 तर मित्रांनो इत्यादी बदल Majhi Ladki Bahin Yojana New Update या योजनेमध्ये करण्यात आले आहेत त्याची माहिती तुम्हाला वरती दिली आहे. ही माहिती तुमच्या इतर नातेवाईकांसोबत तसेच मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट साठी bhartiera.in ला अवश्य भेट देत जा

हेही वाचा : Mahajyoti Tablet Yojana: 10वी उत्तीर्ण मुलांना मिळणार टॅब्लेट! कोचिंग, पुस्तके आणि बरेच काही

FAQ:

Majhi Ladki Bahin Yojana New Update

या योजनेमध्ये शासन निर्णयानुसार विविध बदल करण्यात आले आहेत ज्यामध्ये वयोमर्यादा, अविवाहित महिला, 05 एकर शेती, डोमासाईल सर्टिफिकेट, अर्जाची तारीख इत्यादी मुद्द्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

close