Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana चा सहावा हप्ता जमा करण्यास 2 दिवसापासून सुरुवात झाली आहे. 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम चार ते पाच दिवसात 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिला आणि ज्या महिलांचे आधार सीडींग झालेल्या आहे अशा 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
पहिल्याच दिवशी 67,92,292 महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या योजनेबद्दल आजून काय काय अपडेट समोर आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे.
तुम्हाला जर योजणाचे असेच अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.
Majhi Ladki Bahin Yojana New Update
नेमक्या काय म्हणाल्या अदिती तटकरे? :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करत असताना त्यामध्ये 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती.
आधार सीडींगमुळं Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडींग झालं आहे अशा 12 लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसात टप्प्या टप्प्यानं वितरीत करणार आहोत. पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे. अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार आहे.
या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा, असं आवाहन अदिती तटकरे यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया कालपासून पुन्हा सुरू करून पहिल्या दिवशी 67,92,292 महिलांना त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana Online Form Link
अर्ज करण्यासाठी मुदत वाढणार का? सध्या चर्चा अशी आहे की ज्या महिला नोंदणी करायच्या बाकी होत्या त्यांच्यासाठी नोंदणी साठी मुदत वाढणार आहे? तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणी बाबात भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांना 2100 अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.
नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली. अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरु करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र प्रती फॉर्म मिळणाऱ्या 50 रुपयांपासून वंचित आहेत. अस देखील त्या म्हणाल्या. त्यामुळे नवीन नोंदणी साठी मुदत वाढणार की नाही याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणार आहे. आणि मगच याची खरी माहिती मिळणार आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ही अपडेट पहा :
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ही माहिती तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा.