PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकात विविध पदांची भरती! लगेच अर्ज करा

PCMC Recruitment 2024 Notification

Pimpari Chinchvad Municipal Corporation
Pimpari Chinchvad Municipal Corporation

तुम्ही पण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी PCMC Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. आणि या भरतीची अधिकृत जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. या भरतीची सर्व सविस्तर माहिती पुढे दिली आहे. या भरतीसाठी सर्व उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

PCMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 पर्यन्त आहे. आणि जर तुम्ही पण या भरतीसाठी उत्सुक असला तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, व इतर महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

PCMC Bharti 2024

भरतीचे नाव : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचा विभाग : ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका या विभागांतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Jobs in PCMC) येथे नोकरी मिळणार आहे.

Pimpari Chinchvad Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव : PCMC Recruitment 2024 या भरतीद्वारे सहाय्यक शिक्षक पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

भरल्या जाणाऱ्या पदांचा सविस्तर तपशील :

  • मराठी माध्यम :
विषयाचे नावपदांची संख्या
मराठी32 पदे.
हिंदी20 पदे.
गणित30 पदे.
विज्ञान09 पदे.
क्रीडा07 पदे.
एकूण 71 पदे.
  • उर्दू माध्यम :
विषयाचे नावपदांची संख्या
उर्दू – भूगोल08 पदे.
इंग्रजी – इतिहास08 पदे.
गणित08 पदे.
विज्ञान08 पदे.
एकूण 32 पदे.

एकूण पदे : या भरती Pimpri Chinchwad Municipal Corporation च्या भरती प्रक्रियेमध्ये दोन्ही माध्यमातून मिळून 103 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for PCMC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

आवश्यक पात्रतेचा तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक या पदासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

Age Limit :

आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांची आवश्यक वयोमर्यादा ही पदांनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात पहा.

PCMC Recruitment Salary

वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला 27,500/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

PCMC Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : PCMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कसलेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास करण्यास सुरुवात झाली आहे.

PCMC Teacher Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज सादर करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका,माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर,पिंपरी,पुणे – १८ (वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ) येथे अर्ज सादर करायचा आहे.

निवड प्रक्रिया : PCMC Recruitment 2024 या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

PCMC Teacher Recruitment 2024 Notification
अधिकृत पीडीएफ जाहिरायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Required Documents for PCMC Teacher Recruitment 2024

आवश्यक कागदपत्रे : या भरतीसाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांच्या प्रती तुमच्या बायोडाटा सोबत घेऊन जायचे आहेत.

  1. शैक्षणिक कागदपत्रे.
  2. पासपोर्ट फोटो.
  3. आधार कार्ड.
  4. पॅन कार्ड.

भरती मधील काही अटी व शर्ती :

  1. ही भरती एकत्रित मानधन करार पद्धतीने होत आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे शिक्षक प्राप्त न झाल्यामुळे जे रिक्त पदे आहेत त्यांच्यासाठी ही भरती होत आहे.
  2. एकत्रित मानधन करार पद्धतीने शिक्षकांची नेमणूक ही आदेशांच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीसाठी राहील त्यामुळे अर्जदारास कायम पदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही.
  3. उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांच्या प्रती व इतर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासणीसाठी सोबत ठेवावीत.
  4. या भरतीसाठी पोस्टाने/ कुरिअरने येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतः तिथे जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
  5. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा कसला विचार केला जाणार नाही.
  6. नियुक्ती दिल्यानंतर उमेदवाराला महानगरपालिकेच्या कोणत्याही विद्यालयात कामकाज करावे लागेल. तसेच गरज पडल्यास इतर विषयाच्या अध्यापनाचे कामकाज देखील करावे लागेल.

महत्वाच्या सूचना :

  1. मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  2. जर अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास आणि त्या निदर्शनास आल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल.
  3. तसेच जे अर्ज पूर्ण असतील ते सरसकट नाकारण्यात येणार आहेत.

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

Post Office GDS Recruitment 2024: डाक विभागात 30 हजार पदांची भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

धन्यवाद!

PCMC Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

PCMC Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे सहाय्यक शिक्षक पदाच्या 103 जागा भरण्यात येणार आहेत.

PCMC Teacher Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 12 जून 2024 अर्जाची शेवटची तारीख आहे.

close