PM Vidyalaxmi Yojana In Marathi
मित्रांनो जर तुम्हीही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण PM Vidyalaxmi Yojana ही केंद्र सरकारने नवीन योजना खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 10,00,000 पर्यंतचे कर्ज (Loan) मिळणार आहे.
प्रधान मंत्री विद्यालक्ष्मी योजना ची सविस्तर माहिती जसे की पात्रता, अर्ज प्रक्रिया, शेवटची मुदत, मिळणारा लाभ इत्यादि. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. सर्व माहिती वाचून मगच अर्ज करा.
अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना
मित्रांनो २०२४-२५ चा अर्थसंकल्प जुलै मध्ये जेव्हा सादर केला गेला तेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे दरवर्षी २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेला बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी २०२४-२५ ते २०३०-३१ या सात वर्षांच्या कालावधीत ३,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठा लाभ होणार आहे. या कालावधीत सुमारे सात लाख नवीन विद्यार्थ्यांना या व्याज सवलतीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ही योजना पंतप्रधान विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने प्रशासित केली जाईल.
PM Vidyalaxmi Education Loan Scheme
योजनेची वैशिष्टे :
- गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
- तसेच विद्यार्थ्यांना गॅरंटेड किंवा कोणतीही गोष्ट गहाण न ठेवता हे कर्ज मिळणार आहे.
- 2024 ते 2031 या कालावधीत तब्बल सात लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद आहे.
- विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
ही अपडेट पहा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांकडून सरप्राईज! केले 10 मोठ्या घोषणा, 25 हजार पदांची पोलिस भरती व इतर
PM Vidyalaxmi Yojana Eligibility
कोणती विद्यार्थी पात्र ठरणार? : जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
- NIRF सर्वोत्तम गुणवत्तेच्या उच्च शिक्षण संस्था मध्ये दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे.
- विद्यार्थी ज्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत त्या संस्थेची NIRF रँकिंग मध्ये ऑल इंडिया 101 किंवा राज्यातील HEIs रँकिंग 200 च्या आत असावी. असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
PM Vidyalaxmi Yojana Apply
अर्ज प्रक्रिया : जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करू शकता.
- सगळ्यात अगोदर तुम्हाला पीएम विद्या लक्ष्मी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला कॉमन एज्युकेशन लोन एप्लीकेशन फॉर्म म्हणजेच (CELAF) भरायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पात्रता आणि इतर सोयीनुसार शैक्षणिक अर्जासाठी माझ्याकडून अर्ज करू शकता.
PM Vidya Lakshmi Education Loan Yojana
कशाप्रकारे मिळणार लाभ? : अर्ज केल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला या PM Vidyalaxmi Yojana चा लाभ मिळणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- योजनेचे पोर्टल लोन झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी अर्ज करतील तेव्हा अर्ज प्रक्रिया सुलभ केली जाईल आणि पोर्टल सर्व बँकांना उपलब्ध होईल.
- विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करंसी वॉलेट द्वारे हे व्याज अनुदान उपलब्ध होईल.
- यामध्ये 27.5 लाखापर्यंत जा कर्जासाठी 75 टक्के क्रेडिट गॅरंटी दिली जाईल. त्यामुळे सर्व बँकांना कर्ज वितरणास प्रोत्साहन मिळेल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
आशा करतो की या लेखामध्ये तुम्हाला या PM Vidyalaxmi Yojana ची सविस्तर माहिती मिळाली असेल. या संधीचा लाभ नक्की घ्या आणि ही माहिती तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. तसेच अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी Bhartiera.in या आपल्या वेबसाईटला भेट देत जा.
धन्यवाद!
ही अपडेट पहा: