PM Yashasvi Scholarship 2024: विद्यार्थ्यांना 1,25,000 ची कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज

PM Yashasvi Scholarship 2024 Notification

National Testing Agency

मित्रांनो सरकार नेहमी शेतकरी, महिला, विद्यार्थी, मुली, गरीब, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग इत्यादींसाठी अशा नवनवीन योजना सरकार सतत राबवत असते. अशीच PM Yashasvi Scholarship Yojana सरकारने विद्यार्थ्यांसाठी सूरु केली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना 125000 पर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची योजना आहे. या योजनेचे नाव ‘पीएम यशस्वी योजना’ असे आहे. असे खूप विद्यार्थी असतात ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे संपूर्ण शिक्षण घेता येत नाही.

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कुठेतरी ते शिक्षणापासून वंचित राहतात. आणि ही बाब लक्षात घेऊन सरकार सतत नवनवीन स्कॉलरशिप योजना राबवत असते. जेणेकरून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा. त्यामुळे जर तुम्ही पण विद्यार्थी असाल, आणि तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे आपण या लेखात पीएम यशस्वी योजनाची PM Yashasvi Scholarship Yojana 2024 बद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे योजनेबद्दल सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.

मित्रांनो जर तुम्ही पण शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Yashasvi Scholarship Scheme

योजणेचे नावपीएम यशस्वी योजना (PM Yashasvi Scholarship Scheme)
कोणी सुर केली?महाराष्ट्र शासन द्वारे.
विद्यार्थ्यांची निवडलेखी परीक्षा द्वारे.
लाभार्थी 9वी ते 12वी मध्ये शिकणारे विद्यार्थी.
अधिकृत वेबसाइटhttps://scholarships.gov.in/

PM Yashasvi Yojana

सरकारने पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना  सुरू केली आहे. यालाच PM YOUNG ACHIEVERS SCHOLARSHIP AWARD SCHEME FOR VIBRANT INDIA पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया असे  ही नाव आहे.

Purpose of PM Yashasvi Yojana (योजनेची उद्दिष्टे) :

  • मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
  • या स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून जवळपास 385 कोटी रुपये इतकी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे.
  • या योजनेचा लाभ जे विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावीमध्ये  शिक्षण घेत आहे, त्यांना मिळणार आहे.
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • एमएसजे अँड इ म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक न्यायाने सक्षमीकरण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ही स्कॉलरशिप अनुदान योजना तयार केली आहे.
  • योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना सतत अभ्यास सुरू राहणे आणि त्यांना उच्च शिक्षण घेता यावे असा आहे.

PM Yashasvi Scholarship Benefits

पीएम यशस्वी योजना चे फायदे : या योजनेतून विद्यार्थ्यांना नेमकं कोणकोणते फायदे होणार आहेत ते पुढे दिले आहेत.

  1. मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.
  2. जे विद्यार्थी नववी मध्ये शिकत आहेत त्यांना 75 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे.
  3. आणि जे विद्यार्थी अकरावी मध्ये शिकत आहेत त्यांना 1,25,000/- रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे.

त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणी नववी ते अकरावी मध्ये शिकत असेल तर या योजनेचा लाभ नक्की घ्या. अन्यथा ही माहिती इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.

Pradhan Mantri Yashasvi Scholarship Yojana  Features

पीएम यशस्वी योजना चे वैशिष्ट्ये : PM Yashasvi Scholarship 2024 योजनेचे काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत ते पुढे दिले आहेत.

  • जे विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक लाभ देणे हे सरकारचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
  • या योजनेअंतर्गत ७५ हजार रुपये ते एक लाख 25 हजार रुपयेपर्यंतची आर्थिक मदत सरकार विद्यार्थ्यांना करत आहे.
  • या योजनेचे मुख्यतः 2 भाग असणार आहेत. पहिला भाग- नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तर दुसरा भाग- हा अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
  • 9वी च्या वर्गातील जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांना 75,000/- रुपये तर 11वी मधील  विद्यार्थ्यांना 1,25,000/- रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे.
  • ही योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे, ज्यात ओबीसी, एबीसी हे विद्यार्थी येतात. या योजनेसाठी विद्यार्थी हे स्कॉलरशिप परीक्षेतुन निवडण्यात येणार आहेत. त्या
PM Yashasvi Scholarship Scheme
PM Yashasvi Scholarship Scheme

PM Yashasvi Scholarship Exam

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना परीक्षा : मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हे स्कॉलरशिप परीक्षेद्वारे निवडले जाणार आहेत परीक्षा कशा पद्धतीचे असणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

विषयप्रश्नांची संख्या एकूण गुण
गणित30 प्रश्न120 मार्क्स
विज्ञान20 प्रश्न80 मार्क्स
सामाजिक शास्त्र25 प्रश्न100 मार्क्स
सामान्य ज्ञान26 प्रश्न100 मार्क्स

PM Yashasvi Scholarship Eligibility

पीएम यशस्वी योजना आवश्यक पात्रता : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही आवश्यक पात्रता देखील असणे आवश्यक आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  1. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार OBC/ EBC/ DNT/ SAR/ NT/ SNT प्रवर्ग मधील असणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

PM Yashasvi Scholarship Documents

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कागदपत्रांची लिस्ट पुढे दिली आहे.

  1. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड.
  2. उत्पन्नाचा दाखला.
  3. जातीचे प्रमाणपत्र.
  4. पासबुक.
  5. पासपोर्ट फोटो.
  6. आठवी ते दहावीपर्यंतचे शैक्षणिक प्रमाणपत्र.
  7. मोबाईल नंबर.

PM Yashasvi Scholarship Apply Online

अशा पद्धतीने अर्ज करा : जर तुम्ही किंवा तुमच्या घरामधील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करणार असेल तर अर्ज करण्याची पद्धती पुढे दिली आहे.

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमची नोंदणी करावी लागेल. जर अघोदर नोंदणी केलेली असेल तरी पण चालेल. पुढे दिलेल्या पद्धतीने नोंदणी करा.
  • त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, त्या वेबसाईटवर क्लिक करताच तुम्हाला मेन्यू मध्ये रजिस्टर हा पर्याय दिसेल.
  • त्यानानंतर तुमच्या पुढे नोंदणी करण्यासाठी पेज ओपेन होईल. त्यामध्ये तुमचे नाव, ईमेल, आयडी, जन्मतारीख, पासवर्ड  टाका आणि नोंदणी करा.
  • त्यानंतर “खाते तयार करा” या बटन वर क्लिक करा, अशा पद्धतीने तुम्ही अर्जाची नोंदणी करू शकता.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्ही कोणती शिष्यवृत्ती घेण्यासाठी पात्र आहात, तिथे ट्रस्ट थिंकसाठी उमेदवारांनी उपयुक्त लिंक्स मध्ये लॉगिन या बटनवर क्लिक करा.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचे लॉगिन करणे आवश्यक आहे. नंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल ज्यावर तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  • त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हचे साइन इन होईर्र्ल.
  • त्यानंतर परीक्षेसाठी साइन इन करण्यासाठी पोर्टलच्या यशस्वी चाचणी नोंदणी पुरुषवर जा. तिथे मागितलेली संपूर्ण माहिती त्यामध्ये भरा.
  • अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. किंवा तुम्ही जवळच्या कम्प्युटर कॅफे मध्ये जाऊन देखील अप्लाय करू शकता.
PM Yashasvi Scholarship PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

PM Yashasvi Scholarship या स्कॉलरशिप योजनेची माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ होईल. आणि शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे व सरकारी भरतीचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ वेबसाईटला भेट देत जा. 

हेही वाचा :

Savitribai Phule Aadhaar Yojana: OBC विद्यार्थ्यांना 60,000! असा करा अर्ज

LG Scholarship Program 2024: पदवी च्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये! विद्यार्थी घ्या फायदा

धन्यवाद !

PM Yashasvi Scholarship 2024 बद्दल विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :

PM Yashasvi Scholarship 2024 या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना किती रुपयांचे आर्थिक मदत मिळणार आहे?

या योजनेद्वारे नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना 75,000/- ते 1,25,000/- रुपयांचे आर्थिक मदत मिळणार आहे.

PM Yashasvi Scholarship साठी पात्रता काय आहे?

1. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणारा विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2, या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार OBC/ EBC/ DNT/ SAR/ NT/ SNT प्रवर्ग मधील असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना साठी अर्ज पद्धती काय आहे?

या योजनेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

close