Ratan Tata Biography in Marathi

मित्रांनो रात्री Ratan Tata सरांची दुखद बातमी पहिली आणि पायाखालची जमीनच सरकली. आपल्या देशाची आन, बान आणि शान असणारे रतन टाटा (Ratan Tata Age) यांंचे 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आयुषयामद्धे कितीही मोठे झाल्यास पाय जमिनीवर रोवून कसे उभे राहावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा सर. त्यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढे तुम्हाला Ratan Tata सरांच्या 86 वर्षांचा इतिहास पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने ते या यशाच्या शिखरपर्यंत पोहचले. त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे शिक्षण कसे झाले? त्यांच्या कुटुंबामध्ये किती जन आहेत? त्यांची एकूण संपत्ती किती आहे? अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व लेख शेवटपर्यंत वाचा. नक्कीच तुम्हालाही अभिमान वाटेल.
Ratan Tata Birthday
Ratan Tata Family: मित्रांनो रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता. ते नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांचा जन्म सुरत येथे झालेल्या आणि नंतर टाटा कुटुंबात दत्तक घेतले गेले. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या भाची सूनी टाटा या त्यांच्या आई होत. टाटांचे आजोबा होर्मुसजी टाटा हे रक्ताने टाटा कुटुंबाचे सदस्य होते. जेव्हा रतन टाटा सर 10 वर्षाचे होते तेव्हा 1948 मध्ये, त्यांचे आई-वडील विभक्त झाले.
आई वडील गेल्यानंतर त्यांचे संगोपन केले आणि रतनजी टाटा यांच्या आजी आणि विधवा नवजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतले. (Ratan Tata Brother) त्यांना एक धाकटा भाऊ (जिमी टाटा) आहे आणि, नोएल टाटा हे सावत्र भाऊ आहेत, जे त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. रतन टाटांची पहिली ही भाषा गुजराती आहे.

रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.
Ratan Tata Education

रतन टाटा सरांचे शिक्षण : सरांच्या शिक्षणबद्दल बघितले तर आठवीपर्यंत शिक्षण हे मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी १९५५ मध्ये न्यूयॉर्क येथील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
पदवी घेतल्यानंतर, टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यामधून त्यांनी १९५९ साली वास्तुशास्त्र मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९७५ मध्ये, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सात-आठवड्याच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात भाग घेतला. Ratan Tata जेव्हा कॉर्नेल मध्ये होते तेव्हा ते अल्फा सिग्मा फी फ्रेटरनिटीचे सदस्य बनले.
त्यानंतर २००८ मध्ये, टाटाने कॉर्नेलला $50 दशलक्ष भेट दिली, जे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय देणगीदार बनले. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली.
Ratan Tata Career
करियर ची सुरुवात : रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा स्टीलच्या जमशेदपूर शाखेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर ते व्यवस्थापन शिकण्यासाठी 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेले. त्यानंतर 1991 हे टाटा समूहासाठी भारतासोबत महत्त्वाचे वर्ष होते. या काळात देशाचे खाजगीकरण आणि उदारीकरण यांसारख्या प्रमुख सुधारणा अंमलात आणल्या गेल्या. त्याच वर्षी त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. या काळात रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा भारताबाहेर पसरले आणि जगभर पसरले. आज टाटा समूह मीठ ते ट्रक बनवण्याच्या व्यवसायात आहे.
हेही वाचा : MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ, पुणे मध्ये लिपिक, विजतंत्री, शिपाई पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी
Ratan Tata Donation
मित्रांनो रतन टाटा सर देणगी च्या बाबतीत सदैव पुढे असायचे. रतन टाटा यांनी आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि समाजकल्याण उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून परोपकारी कारणांसाठी $1.2 अब्ज (अंदाजे ₹9,000 कोटी) पेक्षा जास्त देणगी दिली आहे. ते आपल्या एकूण कमाई च्या 66% कमाई ही दान करत होते.
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने कॉग्निटिव्ह सिस्टम आणि स्वायत्त वाहनांच्या संशोधनासाठी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी (CMU) ला त्यांनी $35 दशलक्ष देणगी दिली. कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे आणि 48,000 चौरस फूट इमारतीला TCS हॉल म्हणतात.
- टाटा समूहाने 2014 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बेला 950 दशलक्ष रुपयांची देणगी दिली आणि टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाइन (TCTD) ची स्थापना केली. संस्थेच्या इतिहासात मिळालेली ही सर्वात मोठी देणगी होती. जी रतन टाटा समूहाने दिली.
- टाटा ट्रस्टने अल्झायमर रोगाच्या कारणास्तव अंतर्निहित यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे लवकर निदान आणि उपचारांसाठी पद्धती विकसित करण्यासाठी न्यूरोसायन्स सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला देखील तब्बल 750 दशलक्ष रुपयांचे अनुदान देखील दिले.
Ratan Tata Net Worth
रतन टाटा नेट वर्थ: टाटा समूहाचा व्यवसाय हा पूर्ण जगभर पसरलेला आहे आणि हे नाव घरच्या स्वयंपाकघरापासून ते आकाशातल्या विमानांपर्यंत आहे. गटात 100 हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत आणि कित्येक अनसूचीबद्द आहेत. त्यांचा एकूण व्यवसाय सुमारे 300 अब्ज डॉलर्स आहे. आणि फक्त रतन टाटा यांची संपत्ती 3800 करोड़ रुपये आहे. एवढ्या संपत्तीसह ते देशातील ४३३ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रतन टाटा यांची संपत्ती कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी केलेले परोपकारी उपक्रम.
Ratan Tata Private Jet
मित्रांनो रतन टाटा यांच्याकडे Dassault Falcon 2000 प्रायव्हेट जेट आहे. या जेटची किंमत सुमारे 224 कोटी रुपये आहे. रतन टाटा एक प्रशिक्षित पायलट असून ते स्वतःचे खाजगी जेट देखील चालवायचे.
Ratan Tata House

जर याच्या घरबद्दल बघितले तर मुंबईतील कुलाबा येथे एक आलिशान घर आहे. हे घर 14,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. या आलिशान घराची किंमत 150 कोटी आहे. टाटाच्या हवेलीमध्ये जिम, स्विमिंग पूल, सन डेक, बार आणि लाउंजसह इतर सर्व सुविधा आहेत.
मदतीस सदैव तत्पर
टाटा हे मदतीच्या बाबतीत कधीच कमी पडले नाही कारण 2004 ची त्सुनामी असो किंवा देशात कोरोना महामारीचा उद्रेक असो, प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर होते. केवळ सामाजिक कार्यातच नव्हे तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यातही ते नेहमीच अग्रेसर असत. त्यांचा ट्रस्ट अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. जे विद्यार्थी आर्थिक परिस्थिति सी झुंजत आहेत अशा विद्यार्थ्यांनी जे.एन. टाटा एंडोमेंट, सर रतन टाटा स्कॉलरशिप आणि टाटा स्कॉलरशिप द्वारे मदत दिली जाते.
Ratan tata News in Marathi
Ratan Tata Death: रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे झाला? : गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीड कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांना सोमवारी रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
एवढी संपत्ती असूनही एकदम साधी राहणीमान, प्रेमळ स्वभाव सदैव देशाच्या भविष्याचा विचार करणारा, देशातील युवा पिढीसाठी विचार करणारा “बाप माणूस” आज काळाच्या पडद्याआड गेला. पूर्ण तरुण पिढीसाठी रतन टाटा सर प्रेरणा होते. रतन सरांकडून खूप काही शिकण्यासारख आहे.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट Bhartiera.in ला आवश्य भेट देत जा.