Savitribai Phule Aadhaar Yojana for OBC
मित्रांनो तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. कारण Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तब्बल 60,000/- रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत मिळणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे की सरकार सतत लोकांच्या हितासाठी खूप साऱ्या योजना राबावत असते त्यापैकीच ही एक योजना आहे.
खूप साऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति बेताची असते आणि त्यामुळे ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन माननीय मंत्रिमंडळाने इतर मागासवर्गीय, वगळलेल्या जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे 19.10.2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. या योजनेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांच्या अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
Dnyanjyoti Savitribai Phule Scholarship Yojana ही मुख्यतः विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सूरु करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. |
कोणी सूरु केली? | महाराष्ट्र शासन द्वारे. |
योजनेचा विभाग | इतर मागास बहुजन विकास महामंडळ. |
लाभार्थी | OBC विद्यार्थी |
मिळणारी एकूण आर्थिक मदत | 60,000/- रुपये. |
अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन, व ऑफलाइन पद्धतीने |
योजनेची अधिकृत वेबसाइट | mahadbt.maharashtra.gov.in |
Gyan Jyoti Savitribai Phule Aadhar Yojana
मित्रांनो सारकरद्वारे चालू करण्यात आलेली ही योजना भटक्या जमाती-क वर्गात मोडणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता विशेष मागासवर्गातील उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेमद्धे एकूण 21,600 विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” च्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली आहे, विशेषत: उच्च शिक्षणातील विशेष मागास प्रवर्गातील प्रति जिल्हा 600 विद्यार्थी पात्र असणार आहेत.
तुम्ही कशाप्रकारे या योजनेसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता आणि यासाठी पात्रता काय लागणार आहे. याची सर्व माहिती तुम्हाला पुढे मिळेल. त्यामुळे सर्व माहिती वाचा आणि तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्या.
Savitribai Phule Aadhar Yojana Eligibility
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आवश्यक पात्रता : जर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ इच्छित आहेत तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे बघू शकता.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा OBC किंवा SC, ST प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहत असावा.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे.
- योजनेद्वारे मिळणारा आर्थिक फायदा केवळ इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- विद्यार्थ्यांना या योजनेसाठी मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि या योजनेची उत्पन्न मर्यादा केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढीनुसार असेल.
- विद्यार्थ्याने त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय, विद्यार्थी ज्या शहरात किंवा तालुक्यातील रहिवासी नसावा जेथे त्यांनी नोंदणी केलेली शैक्षणिक संस्था आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification for Savitribai Phule Aadhar Yojana) : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही शैक्षणिक पात्रता असणे देखील आवश्यक आहे.
- विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 12वी पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेतले पाहिजे
- ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणीक वर्षात जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना लाभ मिळणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 उमेदवार निवडले जाणार आहेत त्यांना लाभ मिळणार आहे.
- विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेत आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ऑल इंडिया मेडिकल कौन्सिल, इंडियन फार्मसी कौन्सिल, आर्किटेक्चरल कौन्सिल, राज्य सरकार किंवा तत्सम प्रशासकीय मंडळाने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या 12वी मधील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन हे निश्चित केले जाईल. या योजनेअंतर्गत, 70% प्रवेश व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील, तर उर्वरित 30% गैर-व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
- ज्या वेळेस विद्यार्थी अर्ज करेल तेव्हा व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे किमान 60 टक्के किंवा समतुल्य ग्रेड/ CGPA असणे आवश्यक आहे.
Scholarships for Higher Education in Maharashtra
Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे मिळणारी एकूण रक्कम : मित्रांनो विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम ही वेगवेगळ्या ठिकानानुसार वेगवेगळी मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
खर्चाची बाब | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारी रक्कम. | इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारी अनुदेय रक्कम. | इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम. | इतर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारी अनुदेय रक्कम. |
भोजन भत्ता | 32000/- रुपये. | 28000/- रुपये. | 25000/- रुपये. | 23000/- रुपये. |
निवास भत्ता | 20000/- रुपये. | 15000/- रुपये. | 12000/- रुपये. | 10000/- रुपये. |
निर्वाह भत्ता | 8000/- रुपये. | 8000/- रुपये. | 6000/- रुपये. | 5000/- रुपये. |
एकूण खर्च | 60000/- रुपये. | 51000/- रुपये. | 43000/- रुपये. | 38000/- रुपये. |
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Documents
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : या योजनेसाठी अर्ज करतेवेळी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
- SC, ST, OBC मागासवगीर्य जातीचे कास्ट सर्टिफिकेट.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक खाते पासबुक.
- अर्जदार विद्यार्थ्याची इयत्ता 10 वी आणि 12 वी मार्कशीट.
- महाविद्यालय, विद्यापीठ किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (प्रवेश प्रमाणपत्र किंवा पावती). इत्यादि.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Online Apply
शासन निर्णय | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (अद्याप सुरवात नाही) | येथे क्लिक करा |
How to Apply for Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana
अशा पद्धतीने अर्ज करा :
मित्रांनो, सध्या Savitribai Phule Aadhaar Yojana साठी कोणतेही अर्ज आलेले नाहीत. राज्य सरकारने अधिकृतपणे निर्णय जाहीर केल्यावरच या योजनेचे फॉर्म उपलब्ध होणार आहेत. आत्तापर्यंत, ज्ञानज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाहीये. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असल्यास, तुम्ही इतर मागासवर्गीय बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयातून फॉर्म मिळवू शकता आणि सबमिट करू शकता.
मात्र, सध्या याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जेव्हा अर्ज करण्याबाबतची अपडेट येईल तेव्हा आम्ही देखील अपडेट करू. जर तुम्हाला ही अपडेट वेळेवर हवी असेल तर आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला ग्रुप द्वारे अपडेट मिळेल.
महत्वाचे :
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे उच्च शिक्षण घेत आहेत. जेणेकरून त्यांना देखील थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!
ही अपडेट देखील पहा :
BEST Mumbai Bharti 2024: बेस्ट, मुंबई मध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी! पहा सविस्तर
योजनेसंबधी विचारली जाणारी काही महत्वाची प्रश्न :
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana साठी अप्लाय करण्याची तारीख काय आहे?
मित्रांनो, सध्या Savitribai Phule Aadhaar Yojana साठी कोणतेही अर्ज आलेले नाहीत. राज्य सरकारने अधिकृतपणे निर्णय जाहीर केल्यावरच या योजनेचे फॉर्म उपलब्ध होणार आहेत. आत्तापर्यंत, ज्ञानज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाहीये. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असल्यास, तुम्ही इतर मागासवर्गीय बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयातून फॉर्म मिळवू शकता आणि सबमिट करू शकता.
Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे विद्यार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळणार आहे?
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana द्वारे सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तब्बल 60,000/- रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
Savitribai Phule Aadhaar Yojana काय आहे?
महाराष्ट्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तब्बल 60,000/- रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत मिळणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे की सरकार सतत लोकांच्या हितासाठी खूप साऱ्या योजना राबावत असते त्यापैकीच ही एक योजना आहे.