BMC Clerk Recruitment 2024 New Update
BMC Clerk Recruitment 2024 New Update : मित्रांनो गेल्या महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी संघ म्हणजेच लिपिक पदासाठी मोठी भरती निघाली होती. आणि या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणे अशी अट होती. परंतु या जाचक अटीमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवार संताप व्यक्त करत होते.
त्यानंतर राज्यातील अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी या उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन ही जाचक अट रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि अखेर शेवट या उमेदवारांची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने उमेदवारांनी दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले पाहिजेत ही अट रद्द केली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
मुंबई महानगरपालिका भरती 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही जी अट रद्द केली (BMC Clerk Recruitment 2024 New Update) आहे याची सविस्तर माहिती एक्सच्या माध्यमातून दिली आहे. तसेच त्यांनी असे सांगितले आहे की सुधारित शैक्षणिक हरतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.
हेही वाचा : MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल मध्ये नवीन भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा
पुढे तुम्ही पाहू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिकेने कशा पद्धतीने नवीन अपडेट ची माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 10, 2024
सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार
सध्या अर्ज केलेल्या… pic.twitter.com/haM0tOXyqR
या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी असेही सांगितले आहे की ज्या उमेदवारांनी सध्या अर्ज केले होते त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
महत्वाचे :
मित्रांनो BMC Clerk Recruitment 2024 New Update ची ही माहिती तुमच्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांना पहिल्या अटीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक भरती 2024 साठी अर्ज करता आला नाही. जेणेकरून त्यांना आता नवीन भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करता येईल. अशाच नवनवीन अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.in/ ला अवश्य भेट देत जा.
हेही वाचा : Forest Department Recruitment 2024: वन विभागामध्ये नोकरीची संधी! हे उमेदवार करा अर्ज
धन्यवाद!