AFCAT-2 2024 Notification
मित्रांनो भारतीय हवाई दल AFCAT-2 2024 (Indian Air Force AFCAT 2024) 304 कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी. एअर फोर्स कॉमन ॲडमिशन ऑनलाइन टेस्ट (एएफसीएटी) – ०२/२०२४: एनसीसी स्पेशल एंट्री/ मीटरोलॉजी एंट्री कोर्सेस जुलै २०२५ मध्ये सुरू होत आहेत त्याची अधिकृत जाहिरात देखील प्रकाशित झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार भारतीय हवाई दल मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी या परीक्षेद्वारे नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.
खूप उमेदवारांची भारतीय हवाईदल मध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे जर तुम्ही पण AFCAT-2 2024 या परीक्षेसाठी उत्सुक असाल तर पुढे या परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या, अर्ज करण्याची पद्धती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख अशी सगळी महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच येणाऱ्या नवनवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Air Force AFCAT 2024 Exam
कोर्स चे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-02/2024: NCC Special Entry असे या कोर्स चे नाव आहे.
भरतीचा विभाग : AFCAT-2 2024 ही भरती भारतीय हवाई दल या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Indian Air Force Vacancy 2024
पदाचे नाव : या परीक्षेद्वारे भारतीय हवाई दलातील विविध पदे भरण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
एंट्री चे नाव | विभाग | पदांची संख्या |
AFCAT एंट्री | फ्लाइंग | 29 पदे. |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 156 पदे. | |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 119 पदे. | |
NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | 10% जागा |
एकूण पदे : या परीक्षेद्वारे एकूण 304 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.
Indian Air Force salary
मिळणारे वेतन : AFCAT परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना 56,100/- ते 1,77,500/- पगाराची ऑफर दिली जाते. पगार रचना खाली दिली आहे.
- रँक-फ्लाइंग ऑफिसर – लेव्हल – 10 संरक्षण मॅट्रिक्सनुसार वेतन : 56,100/- ते 1,77,500/- रुपये.
- मिलिटरी सर्व्हिस पे (MSP) : 15,500/- रुपये प्रति महिना.
Educational Qualification for Indian Air Force AFCAT
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
फ्लाइंग : (1) या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech असणे आवश्यक आहे.
ग्राउंड ड्युटी :
टेक्निकल : (1) या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (2) 60% गुणांसह BE/B.Tech.
नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग (NCC Special Entry Air Force) : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र असणे आवश्यक.
Age Limit for AFCAT-2 2024
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 20 ते 26 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- फ्लाइंग ब्रांच : 20 ते 24 वर्षे
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) : 20 ते 26 वर्षे.
AFCAT-2 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्जाची लिंक पुढे दिले आहे.
अर्ज शुल्क : 550/- रुपये + GST.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि संधीचा लाभ घ्या.
AFCAT-2 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
AFCAT 2 2024 Registration
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
How to Apply for AFCAT-2 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात सर्वात अगोदर तुम्ही स्वतः काळजीपूर्वक वाचून घ्या कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ज्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- अर्ज भरताना तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत त्यानंतर असणारे अर्ज शुल्क भरून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
AFCAT Selection Process
निवड प्रक्रिया : मित्रांनो या परीक्षेद्वारे तुम्हाला नियुक्त होण्यासाठी चार टप्प्यामधून पार पडावे लागते त्यानंतर तुमची निवड केली जाते. त्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे बघू शकता.
- AFCAT लेखी परीक्षा : उमेदवारांना AFCAT लेखी परीक्षेसाठी पात्र होणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सामान्य जागरूकता, इंग्रजीतील मौखिक क्षमता, संख्यात्मक क्षमता, तर्कशक्ती आणि लष्करी योग्यता चाचणी यासारख्या विषयांवर बहु-निवडीचे प्रश्न असतात.
- AFSB (एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड) चाचणी: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना AFSB चाचणीसाठी बोलावले जाईल, ज्यामध्ये अधिकारी बुद्धिमत्ता रेटिंग चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी, गट चाचणी आणि मुलाखत यासारख्या विविध टप्प्यांचा समावेश आहे.
- वैद्यकीय परीक्षा: जे उमेदवार AFSB चाचणी पास करतात त्यांची सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी केली जाईल.
- गुणवत्ता यादी: लेखी परीक्षा, AFSB चाचणी आणि वैद्यकीय परीक्षेतील उमेदवाराच्या कामगिरीवर आधारित अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना भारतीय हवाई दलामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Indian Army TES Recruitment 2024: जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर करा अर्ज! नोकरीची चांगली संधी
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
AFCAT-2 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या परीक्षेद्वारे एकूण 304 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Indian Air Force AFCAT 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
या कोर्स साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-02/2024 साठी आवश्यक वयोमर्यादा काय आहे?
ज्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 20 ते 26 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे त्यासाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात पाहू शकता.)