BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती/ मिलिटरी मोफत ट्रेनिंग आणि 72,000 रु. मिळणार! असा करा अर्ज

BARTI Free Police Bharti Training 2025 Program

barti program

मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तर तुम्हाला BARTI Free Police Bharti Training 2025 द्वारे दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. आणि एकूण 72,000 रुपये मिळणार आहेत. तसेच तुम्हाला मोफत पोलीस भरतीचे प्रशिक्षण देखील मिळणार आहे.

पुढे तुम्हाला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

BARTI Free Police Bharti Training Program 2025

उमेदवारांना सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता BARTI आणि ARTI संस्था तुम्हाला मदत करणार आहेत. त्यांनी एक विशेष मोफत प्रशिक्षण योजना सुरू केली आहे जी अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी खास राबवण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला ₹10,000 मानधन (स्टायपेंड) दिलं जातं, जे एकूण 6 महिन्यांच्या प्रशिक्षणात ₹60,000 इतकं होतं. यासोबतच साहित्य खर्चासाठी शेवटी एकदाच ₹12,000 अनुदान दिलं जातं.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

म्हणजे या योजनेतील उमेदवारांना एकूण मिळणारी आर्थिक मदत ₹72,000 पर्यंत आहे, जी थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे एकप्रकारे प्रशिक्षण घेताना देखील तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक ताण येणार नाही.

Barti Arti प्रशिक्षण योजना 2025-26 आवश्यक पात्रता

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला पण या योजनेसाठी अप्लाय करायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे.

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  • फक्त मागासवर्गीय SC प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.
  • विद्यार्थी हा किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याचे वय 18 ते 27 दरम्यान असावे.
  • उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Barti Free Police Bharti Training Program Selection Process

निवड प्रक्रिया : या मोफत प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया हि सामायिक प्रवेश परीक्षा, शैक्षणिक पात्रता, आरक्षण या अशा टप्प्यामध्ये असणार आहे. केवळ पात्र उमेदवारच हे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.

  • सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET)
  • शैक्षणिक अहर्ता
  • आरक्षण
  • अंतिम निवड

या BARTI Free Police Bharti Training साठी अंतिम निवड हि सर्वस्वी (Common Entrance Test-CET) च्या प्राप्त गुणांवर असणार आहे, ज्या उमेदवाराला सर्वाधिक गुण त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य असणार आहे. या सोबत अंतिम निवडीचे पूर्ण अधिकार हे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सनियंत्रण आणि अंमलबजावणी समिती कडे असणार आहे.

महत्वाच्या अपडेट :

BARTI Free Police Bharti Training 2025 Apply Process

अर्ज प्रक्रिया : तुम्ही पुढील प्रमाणे या योजनेसाठी अर्ज करू शकता.

1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

  • BARTI च्या या प्रशिक्षणासाठी अर्ज खालील अधिकृत वेबसाईटवरून करता येईल:
  • ???? https://cpetp.barti.in

2: नाव नोंदणी (New Registration) करा

  • “New Registration” किंवा “Apply Online” या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख इत्यादी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणीनंतर तुम्हाला Registration ID आणि Password मिळेल.

3: लॉगिन करा आणि अर्ज भरा

  • मिळालेल्या ID आणि Password चा वापर करून लॉगिन करा.
  • त्यानंतर अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र, शारीरिक मापदंड इत्यादी माहिती भरावी.

4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा : फॉर्म भरताना खालील स्कॅन कागदपत्रे अपलोड करा:

  • पासपोर्ट साईझ फोटो (JPEG – 50 KB पेक्षा कमी)
  • स्वाक्षरी (Signature) (JPEG – 20 KB पेक्षा कमी)
  • जात प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, शिक्षण प्रमाणपत्रे (PDF/JPEG स्वरूपात)

5: प्रशिक्षण केंद्र निवडा : उपलब्ध असलेल्या यादीतून तुम्हाला हवे असलेले प्रशिक्षण केंद्र (Training Centre) निवडा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

6: अर्ज Final Submit करा आणि प्रिंटआउट काढा

  • संपूर्ण माहिती नीट तपासून घ्या आणि मग त्यानंतर Final Submission करा.
  • अर्ज सबमिट झाल्यावर फॉर्मची प्रिंटआउट काढा.

अशा प्रकारे तुम्ही BARTI Free Police Bharti Training 2025 Apply Online प्रोसेस पूर्ण करू शकता.

BARTI Free Police Bharti Training 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख नमूद केलेली नाहीये. पण होईल तेवढ्या लवकर अर्ज करा.

BARTI Free Police Bharti Training 2025 Training Apply Online

BARTI Free Police Bharti Training 2025

महत्वाच्या लिंक :

???? सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
???? परिपत्रकयेथे क्लिक करा
???? महाराष्ट्र राज्यातील सर्वकांक्षा धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, र्टीआरर्टीआय, सारथी, महाज्योती र्व आर्टी या संस्थामधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्ररिक्षण कार्यक्रम बाबतयेथे क्लिक करा
???? अर्ज करण्याची माहितीयेथे क्लिक करा
????️ ऑनलाइन अर्जApply Online
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

मित्रांनो जर तुम्हाला ही योजनेबद्दल काहीही शंका असेल तर तुम्हाला दिलेल्या पीडीएफ मध्ये सर्व संस्था चे हेल्पलाइन नंबर दिले आहेत. त्यावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता.

Military Bharti 2025 Training Program ही माहिती तुमच्या आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मित्राला/ मैत्रिणीला लगेच पाठवा. जेणेकरून त्यांना याची माहिती होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

Thank You!