Career Options After 10th: 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात करियर करावे? कोणते मार्ग आहेत? पहा येथे

Career Options After 10th in Marathi

Career Options After 10th
Career Options After 10th

मित्रांनो खूप जाणला प्रश्न पडतो की 10 वी नंतर काय करावे? कोणते करिअर (Career Options After 10th) निवडावे? तर आज तुम्हाला Career Options After 10th यासंबंधी माहिती देणार आहे. यामध्ये 10वी नंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये करियर करू शकता? सोबतच कोण कोणते करिअर दहावी नंतर उपलब्ध असतात, जे तुम्हाला करता येतात, त्याची माहिती देखील या लेखामध्ये पुढे दिलेली आहे.

जर तुमची पण 10वी झाली असेल किंवा आत्ताच तुमचा दहावीचा निकाल लागला असेल, तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची ठरणार आहे. कारण खूप उमेदवार असे असतात ज्यांना 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर नेमक कोणता मार्ग निवडावा हे समजत नाही. आणि त्यामुळेच त्यांना योग्य क्षेत्रामध्ये करियर करता येत नाही.

मित्रांनो जर तुम्ही पण नोकरीची तयारी करत असाल आणि तुम्हाला पण अशीच माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वाची माहीती मिळत राहील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Career Options After 10th

जेव्हा विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतात तेव्हाच त्यांच्यासाठी खूप सारे करिअर ऑप्शन (Career Options After 10th) असतात ज्यामध्ये खूप सारे डिप्लोमा कोर्सेस आहेत. जे तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला पुढे देखील शिक्षण चालू ठेवायचे असेल तर तुम्ही पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तर चला आता आपण सविस्तर पाहूया की तुम्ही दहावी नंतर कोणते करिअर ऑप्शन निवडू शकता.

  • Commerce stream
  • Science Stream
  • Arts Stream

Best Diploma Course After 10th

  • Hotel Management
  • Computer Hardware and Networking
  • ITI डिप्लोमा कोर्स
  • Engineering Diploma
  • स्टेनोग्राफी अँड टायपिंग

तर चला मित्रांनो आपण आता या सर्व कोर्स बद्दल (Best Career Options After 10th) सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा जेनेकेरून तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही.

Commerce stream

कॉमर्स स्ट्रीम म्हणजे काय ?

मित्रांनो कॉमर्स स्ट्रीम म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक बाबी तसेच अर्थशास्त्र, कॉमर्स (वाणिज्य) या विषयामध्ये जास्त आवड आहे ते विद्यार्थी अकरावी बारावी मध्ये कॉमर्स शाखेतून शिकून यामध्येच करिअर घडवू शकतात. जर तुम्ही कॉमर्स शाखेतून शिक्षण घेतले तर पुढे तुम्हाला बँकिंग मध्ये देखील जाता येते, तसेच तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तरीदेखील कॉमर्स शाखा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.

यामधे मुख्य असे करियर Options (Commerce Stream Jobs) आहेत CA, CS, CMA आणि बँकिंग. त्यामुळे जर तुम्हाला या स्ट्रीम मध्ये करियर करण्याची आवड असेल तर तुम्ही हा करियर ऑप्शन निवडू शकता.

Science Stream

science stream म्हणजे काय? : सायन्स स्ट्रीम म्हणजे काय व हे तुमच्यासाठी कशाप्रकारे करिअरचे चांगले ऑप्शन ठरू शकते याची माहिती पुढे दिली आहे.

मित्रांनो विज्ञानामध्ये ज्या विद्यार्थ्यांची आवड आहे त्यांना विज्ञान शाखा निवडून 11वी, 12वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे Science Stream मधून करियर करता येते. यामधे खूप साऱ्या Interesting अशा Field आहेत ज्यात तुम्ही जाऊ शकता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यामधे ज्यांना आवड आहे ते विद्यार्थी मेडिकल, इंजिनियर अशा मोठमोठ्या क्षेत्रामध्ये मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला पण या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही पण ही शाखा निवडू शकता.

Arts Stream

Career Options After 10th
Career Options After 10th

कला शाखा : कला शाखेमध्ये नेमक काय आहे ही पुढे सविस्तर सांगितले आहे.

कला शाखा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना साहित्य आणि कला या विषयात रुची आहे त्यांच्यासाठी कला शाखा उत्तम आहे, यामधे तुम्ही इतिहास, तत्वज्ञान, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या Stream मध्ये करियर करू शकता. कला शाखेत जे विद्यार्थी शिकले आहेत त्यांना आर्मी आणि इतर स्पर्धा परीक्षा साठी देखील संधी असते. त्यामुळे (Career Options After 10th) हा चांगला मार्ग आहे.

Hotel Management

हॉटेल मॅनेजमेंट :

आपण सर्व तर पाहत आहोत की सध्या हॉटेल मॅनेजमेंट मध्ये खूप उमेदवार त्यांचे करियर घडवत आहेत, त्यामुळे जर तुम्ही जर दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला (Career Option After 10th) तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मधून नोकरी मिळू शकते. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तर हॉटेल हॉस्पिटलिटी इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळण्यास सोपे होते. तसेच खूप उमेदवारांना बाहेरील देशामध्ये नोकरी करण्याची संधी देखील मिळते. त्यामुळे जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये स्वारस्य असेल तर हे नक्कीच तुमच्या साठी चांगला पर्याय आहे.

Computer Hardware and Networking

Computer Hardware and Networking In Marathi :

मित्रांनो आपण पाहत आहोत की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज लॅपटॉप कम्प्युटर याचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे जर तुम्ही या शाखेमध्ये करीयर केले तर तुम्हाला Computer Hardware and Networking  मध्ये चांगली नोकरी मिळू शकते. आज तंत्रज्ञानाचे क्षेत्र ज्या प्रकारे सतत विकसित होत आहे, लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. प्रत्येक प्रकारची माहिती एका क्लिकवर लोकांपर्यंत पोहोचते. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती कॉम्प्युटर नेटवर्किंगची.

त्यामुळेच आजच्या काळात हे क्षेत्र तरुणांसाठी सर्वोत्तम करिअर पर्याय ठरत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ आजच्या काळात आयटी कंपन्यांचा कणा आहेत. आयटी कंपन्यांमध्ये स्टोरेज एरिया नेटवर्कमध्ये अशा तरुणांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे हे एक असे क्षेत्र आहे ज्यात प्राविण्य मिळवल्यानंतर नोकरीसाठी जास्त वेळ थांबावे लागत नाही.

ITI Diploma Course

ITI Diploma Course Information in Marathi :

मित्रांनो आयटीआय (ITI) हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ITI चा Full Form हा “Industrial Training Institute” असा होतो, याला मराठीत “औद्योगिक प्रकाशन संस्था असे म्हणतात. आयटीआय हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते. या कोर्स मध्ये पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण कॉलेज आहेत. आणि त्यांचयाद्वारे प्रत्येक वर्षी प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात.

महाराष्ट्रातील होणाऱ्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे हा आयटीआय कोर्स खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि आपले करीयर बनवतात. ITI मध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर, असे अनेक ट्रेड्स असतात. ट्रेड नुसार विद्यार्थ्याला त्या-त्या गोष्टीचे प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जाते. तसेच विविध क्षेत्रामध्ये या ट्रेड नुसार नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत असतात त्यामुळे 10वी नंतर (Career Options After 10th) तुमच्यासाठी हा चांगला करीयर ऑप्शन ठरू शकतो.

Engineering Diploma

Engineering Diploma Information in Marathi :

मित्रांनो 10वी झाल्यानंतर तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा हा शिक्षणाचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. दहावीला 35% टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी डिप्लोमाला पात्र असतात. त्यामुळे जारी तुम्हाला 10वी मध्ये कमी टक्के मिळाले असतील तरी देखील तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचे करीयर करू शकता. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर इंजिनीअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश देखील घेता येतो. यासाठी प्रवेश परीक्षा (सी. ई. टी.) घेतली जात नाही. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाच्या गुणांनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात.

इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या १० टक्के जागा (साधारणत: १५ हजार जागा) इंजिनीअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. या जागांमध्येच पहिल्या वर्षी रिकाम्या राहिलेल्या जागांची भर पडते. दरवर्षी या सर्व जागा मिळून जवळपास 50 हजारापेक्षा जास्त जागा पदवी इंजिनीअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे हा तुमच्यासाठी (Career Options After 10th) चांगला पर्याय आहे.

Stenography and Typing (स्टेनोग्राफी अँड टायपिंग)

Stenography Course Information in Marathi :

स्टेनोला स्टेनोग्राफर असे म्हटले जाते. स्टेनोग्राफी ही एक भाषा आहे. या भाषेला कोडिंग भाषा किंवा शॉर्ट हॅन्ड असेही म्हणतात. स्टेनोग्राफी मध्ये समोरच्या व्यक्तीने सांगितलेले एखादे भाषण थोडक्यात लिहायला शिकवले जाते.त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीला स्टेनोग्राफर असे म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीने दिलेले भाषण हाताच्या साह्याने कमी वेळात लिहिण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला स्टेनोग्राफर असे म्हणतात.

यामध्ये कोणत्याही प्रादेशिक भाषेचे कोडेड भाषेत रूपांतर केले जाते. ज्याला आपण शॉर्टहँड म्हणून ओळखतो म्हणजेच स्टेनोग्राफर याचे काम शब्दाचे सांकेतिक भाषेत भाषांतर करणे व ही सांकेतिक भाषा परत मूळ स्वरूपात बदलली जाते. यामध्ये मूळ भाषेत 200 शब्द प्रतिमिनिट तितक्या जास्त वेगाने भाषांतर केले जाते. त्यामुळे जर तुम्ही यामध्ये प्राविण्य मिळवले तर तुम्हाला यामध्ये चांगले करीयर करता येऊ शकते.

Typing Course Information in Marathi :

टाईपरायटिंग कोर्स म्हणजे कीबोर्ड द्वारे मजकूर किंवा वाक्य टाईप करणे .हस्तलेखन किंवा कॅलिग्राफी पेक्षा टंकलेखन हे वेगळे असते. टाईपरायटिंग हा कोर्स आपल्या इच्छेनुसार आपल्या पसंतीच्या भाषेत म्हणजेच इंग्रजी ,हिंदी, उर्दू इत्यादी टाईप करण्यासाठी प्रशिक्षित करत असते.

टंकलेखन हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे टाईपरायटिंग मध्ये डिप्लोमा आणि व्यवसायिक प्रमाणपत्र हे दोन खूप लोकप्रिय असणारे टंकलेखन अभ्यासक्रम आहेत. टंकलेखन हा अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही स्तरावर उपलब्ध आहे. NIOS म्हणजे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन लर्निंग’ हे वर्ग इयत्ता आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टंकलेखन अभ्यासक्रम ऑफर करत असते.

तर मित्रांनो ही आहेत तुमच्यासाठी काही महत्वाची करीयर ऑप्शन जे तुम्ही 10वी झाल्यानंतर (Career Options After 10th) करू शकता आणि एक चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता.

Career Options After 10th
Career Options After 10th
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांची आत्ताच 10वी झाली आहे. जेणेकरून त्यांना देखील योग्य ते करीयर ऑप्शन Career Options After 10th निवडण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच नवनवीन करियर ऑप्शन आणि शासनाच्या महत्वाच्या योजनांच्या अशाच अपडेट पाहण्यासाठीhttps://bhartiera.in/रोज भेट देत जा.

हेही वाचा :

AFCAT-2 2024: भारतीय हवाई दल मध्ये 304 जागांसाठी परीक्षा! पहा सविस्तर

Career Option After 10th बद्दल विचारली जाणारी काही महत्वाची प्रश्न :

Best Career Options After 10th कोणकोणते आहेत?

Commerce stream
Science Stream
Arts Stream
Hotel Management
Computer Hardware and Networking
ITI डिप्लोमा कोर्स
Engineering Diploma
स्टेनोग्राफी अँड टायपिंग

close