CBSE Bharti 2025 Notification
CBSE Bharti 2025: जर तुम्ही केंद्र सरकारमध्ये नोकरी शोधत असाल, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२५-२६ या वर्षासाठी विविध गट अ, ब आणि क (Group A, B & C) पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण १२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे, या भरतीमध्ये कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) आणि कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) यांसारख्या पदांसाठी १२ वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
CBSE Recruitment 2025
| विभाग | माहिती |
| संस्थेचे नाव | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) |
| जाहिरात क्र. | CBSE/Rectt.Cell/14(88)/2025 |
| एकूण पदे | १२४ जागा |
| पदाचे नाव | कनिष्ठ सहाय्यक, अधीक्षक, सचिव आणि इतर |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत (All India) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online) |
ही भरती पहा : IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 394 जागांसाठी भरती
CBSE Vacancy Details 2025
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
| १ | सहाय्यक सचिव (Assistant Secretary) | ०८ |
| २ | सहाय्यक प्राध्यापक व संचालक | २७ |
| ३ | लेखा अधिकारी (Accounts Officer) | ०२ |
| ४ | अधीक्षक (Superintendent) | २७ |
| ५ | कनिष्ठ भाषांतर अधिकारी | ०९ |
| ६ | कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) | १६ |
| ७ | कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) | ३५ |
| एकूण जागा | १२४ |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (CBSE Bharti 2025 Eligibility)
उमेदवारांना पदांनुसार खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant): १२ वी उत्तीर्ण + संगणकावर टायपिंगचे ज्ञान (English: 35 WPM / Hindi: 30 WPM).
- अधीक्षक (Superintendent): कोणतीही पदवी (Bachelor’s Degree) + संगणकाचे ज्ञान.
- कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant): १२ वी उत्तीर्ण (कॉमर्स/अकाउंट्स विषयांसह).
- इतर पदे: पदव्युत्तर पदवी (PG) किंवा संबंधित विषयातील पदवी.
वयोमर्यादा (२२ डिसेंबर २०२५ रोजी):
- १८ ते २७/३०/३५ वर्षे (पदांनुसार).
- सवलत: SC/ST साठी ५ वर्षे, तर OBC साठी ३ वर्षे सवलत लागू असेल.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा (CBSE Bharti 2025 Important Dates & Fees)

| तपशील | माहिती |
| General / OBC / EWS (गट A) | ₹१७५०/- |
| General / OBC / EWS (गट B & C) | ₹१०५०/- |
| SC / ST / महिला / PwBD / माजी सैनिक | ₹२५०/- (प्रक्रिया शुल्क) |
| ऑनलाईन अर्ज सुरू | ०२ डिसेंबर २०२५ |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ डिसेंबर २०२५ (मुदतवाढ) |
निवड प्रक्रिया (CBSE Bharti 2025 Selection Process)
- १. टियर-१ (Tier-I): वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा (MCQ).
- २. टियर-२ (Tier-II): लेखी परीक्षा (काही पदांसाठी).
- ३. कौशल्य चाचणी: टायपिंग किंवा भाषांतर चाचणी (गरजेनुसार).
- ४. मुलाखत: केवळ गट ‘अ’ मधील पदांसाठी.
ही भरती पण पहा :





