HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025-26
HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025-26: शिक्षणाची ओढ आहे पण खिशात पैसे नाहीत? अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी HDFC बँक पुन्हा एकदा घेऊन आली आहे – ‘परिवर्तन ECSS प्रोग्राम’. या स्कॉलरशिपचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय आणि उच्च शिक्षण विनाअडथळा पूर्ण करता यावे हा आहे.
तुम्ही शाळेत असाल किंवा पदवीचे शिक्षण घेत असाल, ही योजना तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे HDFC Bank Parivartan Scholrship 2025-26 chi पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
मिळणारे फायदे (Scholarship Amount)
या योजनेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आर्थिक मदत दिली जाते:
- शालेय शिक्षण (इयत्ता १ ली ते ६ वी): ₹१५,००० ते १८,०००.
- इयत्ता ७ वी ते १२ वी/आयटीआय/डिप्लोमा: ₹३०,००० पर्यंत.
- पदवी शिक्षण (Graduation – B.A, B.Com, B.Sc, इ.): ₹३०,००० ते ५०,०००.
- व्यावसायिक पदवी/व्युत्पन्न (Engineering, MBBS, PG Courses): ₹५५,००० ते ७५,००० पर्यंत.
ही भरती पहा : BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी ५४९ जागांची मेगा भरती! १० वी पास उमेदवारांना संधी.
HDFC Bank Parivartan Scholrship 2025-26 Eligibility Criteria
१. अर्जदार विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.
२. मागील वर्षाच्या परीक्षेत किमान ५५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
३. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख ते ६ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे (विशिष्ट श्रेणीनुसार).
४. ज्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा (उदा. पालकांचा मृत्यू किंवा नोकरी जाणे) सामना केला आहे, त्यांना विशेष प्राधान्य दिले जाते.
HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025 Required Documents

| क्रमांक | कागदपत्राचे नाव (Document Name) | तपशील (Details) |
|---|---|---|
| 1 | शैक्षणिक गुणपत्रिका (10वीची Marksheet) | 2024-25 साली दिलेल्या परीक्षेची अधिकृत गुणपत्रिका आवश्यक आहे. |
| 2 | ओळखपत्र (Identity Proof) | आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड / शाळेचा ID Card यापैकी कोणतेही एक. |
| 3 | फोटो (Passport Size Photograph) | अलीकडचा रंगीत पासपोर्ट साईज फोटो. |
| 4 | उत्पन्नाचा पुरावा (Family Income Certificate) | तहसीलदार / SDM / Sarpanch / ग्रामपंचायत यांच्याकडून जारी केलेले प्रमाणपत्र. |
| 5 | बँक पासबुक / रद्द केलेला चेक (Bank Passbook/Cancelled Cheque) | अर्जदाराच्या नावाचे खाते असलेले पासबुकचे पहिले पृष्ठ. |
| 6 | राहण्याचा पुरावा (Address Proof) | राशन कार्ड / आधार कार्ड / निवास प्रमाणपत्र. |
| 7 | Bonafide Certificate | चालू वर्षात विद्यार्थी संबंधित संस्थेत शिकत असल्याचा पुरावा. |
| 8 | Email ID व Mobile Number | Valid व चालू स्थितीत असलेले संपर्क साधन. |
ही भरती पहा : Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्हा बँकेत ३७५ जागांसाठी मेगा भरती! लिपिक, शिपाई आणि चालकांसाठी मोठी संधी.
HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025 Application Process
HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करणे खूप सोपे आहे:
- पोर्टलला भेट द्या: अधिकृत वेबसाईट Buddy4Study वर जा.
- रजिस्ट्रेशन: तुमच्या ईमेल किंवा मोबाईल नंबरचा वापर करून खाते तयार करा (Sign Up).
- योजना निवडा: तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
- फॉर्म भरा: तुमची वैयक्तिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक माहिती अचूक भरा.
- डॉक्युमेंट अपलोड: वरील सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्टपणे स्कॅन करून अपलोड करा.
- फायनल सबमिट: सर्व माहिती एकदा तपासा आणि ‘Submit’ बटण दाबा.
HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025-26 Last Date

| तपशील (Event) | तारीख (Date) |
|---|---|
| अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 20 जुलै 2025 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 डिसेंबर 2025 |
| शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी | सप्टेंबर 2025 मधील दुसरा आठवडा |
| मुलाखतीचा संभाव्य कालावधी | सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 |
| अंतिम निवड यादी जाहीर होण्याची तारीख | ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत |
| घटक | लिंक / माहिती |
|---|---|
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा (School Students) इथे अर्ज करा (Undergraduate Student) इथे अर्ज करा (Postgraduate Student) |
HDFC बँकेचा हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवू शकतो. जर तुम्ही पात्र असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी गरजू विद्यार्थी असेल, तर त्यांच्यापर्यंत HDFC Bank Parivartan ECSS Programme 2025 ही माहिती नक्की पोहोचवा. लक्षात ठेवा, योग्य वेळी मिळालेली मदत एखाद्याचे पूर्ण आयुष्य बदलू शकते!
ही भरती पहा :





