Lek Ladki Yojana Full Information 2025
मुलीच्या जन्मापासून शिक्षणाच्या टप्प्यांपर्यंत आर्थिक सहाय्य करणारी, महाराष्ट्र शासनाची “लेक लाडकी योजना”. गरीब व गरजू कुटुंबातील मुलींसाठी सरकारकडून टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ही माहिती इतरांना देखील कळवा.
राज्यात अशा अनेक योजना चालू असतात पण त्या लोकांपर्यंतन लवकर पोहचत नाहीत. त्यामुळे अशाच अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या व्हाटसप्प ग्रुप ला लगेच जॉइन करा.
लेक लाडकी योजनेची मूलभूत माहिती

| योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
|---|---|
| सुरू करणारा | महाराष्ट्र शासन |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभार्थी | पिवळे/केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी |
| मुख्य लाभ | टप्प्याटप्प्याने १,०१,०००/- रुपये |
| अर्ज पद्धत | बालविकास सेवा कार्यालयात |
| अधिकृत वेबसाइट | lly.mhicds.com |
लेक लाडकी योजना काय आहे?
- महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्माचे स्वागत व शिक्षणाची अखंडता राखण्यासाठी ही योजना सुरू केली.
- पिवळे/केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील ०१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ.
- मुलग्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने निधी जमा होतो.
- मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत – एकूण १,०१,००० रुपये.
Lek Ladki Yojana Benefits (लाभ व उद्दिष्ट्ये)
- मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
- अठराव्या वर्षी मुलगी अविवाहित असल्यास अंतिम हप्ता
- समाजात मुलीला ओझे न मानण्याची प्रवृत्ती बदलणे
- आरोग्य व पोषण सुधारणा
- मुलींना आत्मनिर्भर बनवणे
ही अपडेट पहा : PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 पदांची भरती! हवी ही पात्रता
Lek Ladki Yojana Eligibility पात्रता निकष
- अर्जदार महाराष्ट्रातील कायम रहिवासी असावा.
- फक्त पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक (पांढरा कार्ड अपात्र).
- वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत.
- मुलीचा जन्म ०१ एप्रिल २०२३ नंतर.
- शासकीय/खाजगी रुग्णालयात जन्म व स्थानिक संस्थेत नोंदणी.
- जुळ्या मुलींना स्वतंत्र लाभ.
- एकाच मुलीच्या कुटुंबाला किंवा पहिल्या मुलानंतर मुलगी असल्यास लाभ.
आर्थिक लाभाचे टप्पे

| टप्पा | मिळणारी रक्कम |
|---|---|
| जन्मानंतर | ₹५,००० |
| इयत्ता पहिली | ₹६,००० |
| इयत्ता सहावी | ₹७,००० |
| इयत्ता अकरावी | ₹८,००० |
| १८ वर्षे पूर्ण | ₹७५,००० |
| एकूण | ₹१,०१,००० |
Lek Ladki Yojana Required Documents
आवश्यक कागदपत्रे मुलीसाठी :
- जन्म दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
पालकासाठी :
- आई/वडिलांचे आधार कार्ड
- पॅन/मतदार ओळखपत्र
- पालक-मुलीसोबत फोटो
- मोबाईल नंबर
कुटुंबासाठी :
- पिवळे/केशरी रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक (IFSC, खाते क्रमांक स्पष्ट दिसावा)
- अपत्य संख्येबाबत घोषणापत्र
ही अपडेट पहा : Melghat Tiger Reserve Bharti 2025: मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये नवीन भरती जाहीर; हवी ही पात्रता
Lek Ladki Yojana Form (अर्ज प्रक्रिया)
- अर्ज PDF प्रिंट/झेरॉक्स काढा.
- अंगणवाडी सेविका/ग्रामपंचायत/बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयाकडे मोफत अर्ज उपलब्ध.
- सर्व माहिती नीट भरा व कागदपत्रे जोडा.
- भागातील अंगणवाडी सेविकेला अर्ज जमा करा.
- अधिकारी अर्ज तपासतील, माहिती योग्य असल्यास मंजूर.
- लाभार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा.
महत्त्वाचे संपर्क :
| कार्यालय | संपर्क |
|---|---|
| अंगणवाडी सेविका/केंद्र | स्थानिक गाव/शहर |
| CDPO प्रकल्प कार्यालय | तालुका कार्यालय |
| महिला व बाल विकास अधिकारी | जिल्हा परिषद |
| अधिकृत वेबसाइट | lly.mhicds.co |
ही पोस्ट आपल्या मित्रांसोबत शेअर करा. योजनेंच्या पात्र मुलींच्या कुटुंबांना एक अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक योजना!
जुळ्या मुलींना लाभ?
हो, जुळ्या मुलींना स्वतंत्रपणे लाभ मिळतो.
अर्ज फी आहे का?
अर्ज मोफत उपलब्ध; कुठलाही शासकीय फी नाही.
अंतिम हप्ता कोणाला?
मुलगी १८ वर्षांची, अविवाहित असणे गरजेचे.





