LG Scholarship Program 2024: पदवी च्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये! विद्यार्थी घ्या फायदा

LG Scholarship Program 2024 for Students

LG Scholarship Program 2024
LG Scholarship Program 2024

मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन स्कॉलरशिप योजना राबवण्यात येत असतात अशीच एक LG द्वारे सुरु करण्यात आलेली LG Scholarship Program 2024. या योजनेतून पदवी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 1 लाख रुपयाची Scholarship मिळणार आहे. या स्कॉलरशिप ची सुरवात LG India द्वारे सूरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी (Scholarship for Students) आर्थिक मदत केली जाणार आहे. जे अर्जदार विद्यार्थी पदवीधर आहेत किंवा ज्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले नाही त्यांना देखील LG Scholarship Program या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे

पुढे तुम्हाला ही योजना काय आहे? याचा फायदा कोणाला आणि कसा मिळणार? पात्रता निकष/ शैक्षणिक पात्रता काय आहेत? अशी सर्व माहीती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही पण या योजेनचा लाभ घ्या. ज्यामध्ये तुम्हाला LG द्वारे वर्षाला 1,00,000 लाख रुपये देखील मिळतील.

मित्रांनो तुम्ही पण भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला पण अशाच येणाऱ्या नवनवीन योजनांच्या अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LG Scholarship 2024

LIFE’S GOOD Scholarship Program 2024 ची थोडक्यात माहिती :

योजनेचे नावLIFE’S GOOD Scholarship Program 2024
योजनेची सुरुवातLG India
योजनेचा उद्देशगुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
लाभार्थीसर्व पदवीधर आणि पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी
अर्ज पद्धतीऑनलाईन पद्धतीने.

LIFE’S GOOD Scholarship Program 2024 (Phase 1)

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला पण LG Scholarship 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. ज्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  • अर्जदार विद्यार्थी हा किमान पदवीधर असावा अन्यथा तो चालू वर्षात पदवीचे शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षात असेल तर त्याला मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षेत किमान 60% गुण मिळालेले असावेत.
  • जर उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदवी वर्षात शिकत असतील तर त्याला मागील पदवीच्या वर्षामध्ये किमान 60% मिळालेले असणे अनिवार्य आहे.
  • या स्कॉलरशिप चा फायदा LG Electronics India Private Limited मध्ये आणि Buddy4Study काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना येणार नाही.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा जास्त नसावे.

LIFE’S GOOD Scholarship 2024 Benefits

LG Scholarship Program 2024 चा फायदा :

  1. या स्कॉलरशिप योजनेदवारे उमेदवारांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
  2. जे उमेदवार पदवीधर आहेत किंवा जे पदवीच्या चालू वर्षामध्ये शिकत आहेत अशा उमेदवारांना 1,00,000/- रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
  3. यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे ज्यांची आर्थिक परिस्थिति बेताची आहे.

LG Scholarship Program 2024 Documents

आवश्यक कागदपत्रे : या स्कॉलरशिप ला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची सविस्तर माहीती पुढे दिली आहे.

  • 12 ची मार्कशीट आणि मागील वर्षाची/ सेमिस्टरची मार्कशीट (2रे/ 3री/ 4थ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी)
  • सरकारने जारी केलेला पत्ता पुरावा (उदा. आधार कार्ड)
  • कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (खालील कागदपत्रांपैकी कोणतेही एक):
  • इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) स्टेटमेंट
  • पगार स्लिप
  • फॉर्म 16 (पगारदार असल्यास)
  • बीपीएल/ रेशन कार्ड
  • तहसीलदार/ बीडीपी यांनी स्वाक्षरी केलेले उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र (ग्रामीण भागासाठी)
  • ग्रामपंचायतीचे पत्र/ प्रमाणपत्र (स्वाक्षरी केलेले आणि शिक्का मारलेले)
  • प्रवेशाचा पुरावा (कॉलेज/ शालेय ओळखपत्र, शैक्षणिक शुल्काची पावती) आणि फी संरचना)
  • संस्थेकडून बोनाफाईड प्रमाणपत्र
  • लाभार्थ्यांचे बँक खाते तपशील
  • पासपोर्ट फोटो

LG Scholarship Program 2024 Apply Online

  • जर तुम्हाला या स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या ऑनलाइन अप्लाय च्या लिंक वरुण अर्ज करायचा आहे.
  • लिंक ओपेन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल, मोबाईल किंवा Gmail खात्यासह Buddy4Study वर नोंदणी करा.
  • तुमच्या नोंदणीकृत आयडीसह Buddy4Study वर लॉग इन करा आणि ‘अर्ज फॉर्म पेज’ वर जा.
  • तुम्हाला आता ‘लाइफ’स गुड’ शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024 अर्ज फॉर्म पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘स्टार्ट ॲप्लिकेशन’ बटणावर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर स्कॉलरशिप साठी लागणारे सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • ‘अटी आणि नियम’ स्वीकारा आणि अर्ज एकदा तपासून बघा जेणेकरून करी चूक होणार नाही.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही या स्कॉलरशिप साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
LG Scholarship Program 2024
LG Scholarship Program 2024

LIFE’S GOOD Scholarship 2024 College List

पुढील कॉलेज मधून पदवी घेणाऱ्या उमेदवारांना या स्कॉलरशिप चा लाभ मिळणार आहे : कॉलेज ची पहिली यादी प्रकाशित करण्यात आली आहे. दुसरी यादी लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

कॉलेज ची लिस्टयेथे क्लिक करा

LIFE’S GOOD Scholarship 2024 Apply Online Last Date

जर तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. ऑनलाइन अर्ज ची लिंक पुढे दिली आहे.

अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

LG Life’s Good Scholarship Scheme

तुम्ही या LG Scholarship Program 2024 साठी तुमचा अर्ज सादर करू शकता, जर तुम्ही शैक्षणिक आणि इतर बाबी मध्ये पात्र ठरलात तर तुम्हाला या शिष्यवृत्ती साठी निवडले जाईल. त्यामुळे तुम्ही नक्की अर्ज करा. आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या.

महत्वाचे :

या LG Scholarship Program 2024 ची माहिती इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून तुमच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर अशाच योजनेच्या अपडेट हवे असतील तर आमचा ग्रुप जॉइन केला नसेल तर नक्की करा. आणि अशाच अपडेट साठी https://bhartiera.in/ ला आवश्य भेट देत जा. 

हे पण वाचा :

Savitribai Phule Aadhaar Yojana: OBC विद्यार्थ्यांना 60,000! असा करा अर्ज

योजनेबद्दल विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :

LG Scholarship Program 2024 द्वारे विद्यार्थ्यांना किती रुपयांची मदत मिळणार आहे?

तुम्हाला LG द्वारे वर्षाला 1,00,000 लाख रुपये मिळणार आहेत.

LG Scholarship 2024 साठी पात्रता काय आहे?

1) अर्जदार विद्यार्थी हा किमान पदवीधर असावा अन्यथा तो चालू वर्षात पदवीचे शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
2) जर विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षात असेल तर त्याला मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षेत किमान 60% गुण मिळालेले असावेत.
3) जर उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदवी वर्षात शिकत असतील तर त्याला मागील पदवीच्या वर्षामध्ये किमान 60% मिळालेले असणे अनिवार्य आहे.
4) या स्कॉलरशिप चा फायदा LG Electronics India Private Limited मध्ये आणि Buddy4Study काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना येणार नाही.
5) विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा जास्त नसावे.

LIFE’S GOOD Scholarship 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

तुम्हाला या स्कॉलरशिप साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close