Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा अर्ज आता इंग्रजीतच हवा! सरकारचा अजब आदेश

Majhi Ladki Bahin Yojana New Update

maharashtra government

मित्रांनो सरकारने Majhi Ladki Bahin Yojana काही दिवासपूर्वी राज्यातील महिलांसाठी सुरू केली आहे. परंतु या योजनेमद्धे वारंवार अनेक बदल करण्यात येत आहेत. सुरवातीला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रामद्धे बदल करण्यात आले त्यानंतर वयोमार्यादे मध्ये तसेच इतरही बदल करण्यात आले आणि आता अर्ज भरण्याबद्दल मोठा आदेश सरकारने दिला आहे.

जर तुमच्या घरामधूनही Majhi Ladki Bahin Yojana साठी अर्ज केला असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून नवीन आदेशाची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज आता पुन्हा इंग्रजी मध्ये करावा लागणार!

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आला परंतु अर्ज इंग्रजीत भरण्याचा उल्लेख कुठेही नव्हता. काही नागरिकांनी तसेच ज्यांच्यावर मुख्य जबाबदारी टाकण्यात आले अशा अंगणवाडी सेविकांनी देखील मराठीतच अर्ज केल्याची माहिती पुढे आली आहे. एक महिना झाल्यानंतर आणि फक्त पुण्यामध्ये जवळपास 12 लाख अर्ज आले आहेत.

आणि आता शासनाने एक अजबच आदेश काढला आहे की जे अर्ज इंग्रजीत आहेत तेच ग्राह्य धरण्यात येतील. जेव्हा Majhi Ladki Bahin Yojana ही योजना जाहीर झाली होती तेव्हाच कागदपत्रांसाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या आणि त्यासोबतच नागरिकांचे लूट होण्याचे प्रकारे समोर आले होते. त्यानंतर अशी परिस्थिती पाहून सरकारने कागदपत्रांसाठी विविध बदल केले होते.

हेही वाचा : Annapurna Yojana: आता 3 गॅस मिळणार मोफत! सरकारची “अन्नपुर्णा योजना”

आणि आता प्रत्येक तालुक्यामध्ये अर्जांची छाननी करण्यात येणार असून तालुकास्तरावर छाननी कक्ष सुरू केले आहे त्यासाठी सकाळी सात ते रात्री बारापर्यंत अधिकारी कर्मचारी छाननीचे काम करणार असून प्रत्येकाच्या शिफ्ट मध्ये कामाची जबाबदारी दिली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 96 हजार 800 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 09 लाख १९ हजार ८७२ अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana Maharashtra

पुन्हा इंग्रजीत अर्ज करावा लागणार: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यात प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला तिचा लाभ मिळेल पर्यंत सुरू राहणार आहे. मराठीमध्ये जर अर्ज केलेला असेल तर त्या महिलांना त्यांच्या मोबाईलवर पार्शली रिजेक्टेड असा संदेश येईल.

त्यानंतर अशा महिलांनी मोबाईलवर प्राप्त झालेले या संदेशांचे व्यवस्थित रित्या वाचन करून त्या संदेशात दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्जाची दुरुस्ती करायचे आहे तसेच मागणी केलेले कागदपत्रे जोडून अर्ज पुन्हा सादर करायचा आहे. तुम्ही तुमचा अर्ज एकदा चेक करा जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर तुम्हालाही Majhi Ladki Bahin Yojana अर्ज पुन्हा सादर करावा लागणार आहे.

सविस्तर माहिती : येथे क्लिक करा

महत्वाचे :

माझी लाडकी बहीण योजनाची ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत तसेच नातेवाईकांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना या नवीन आदेशाबद्दल माहिती होईल आणि तेही त्यांचा अर्ज परत सादर करू शकतील. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

Yuva Karya Prashikshan Yojana 2024: आता तरुणांना मिळणार 10 हजार दर महिन्याला! नवीन योजना

FAQ:

“माझी लाडकी बहीण योजना” नवीन कोणते बदल करण्यात आले आहेत?

योजनेसाठी जर तुम्ही अर्ज हा मराठीमध्ये केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा तुमचा अर्ज हा इंग्रजीमध्ये सादर करावा लागणार आहे. कारण पुणे जिल्ह्यामधील अर्जांच्या छाननी मध्ये मराठी मध्ये असणारे अर्ज नाकारले जात आहेत.

close