MPSC Success Story: 23 वेळा अपयश आणि 24 व्या प्रयत्नात मिळवली ही पदवी. आज लोक बोलत आहेत..

MPSC Success Story in Marathi

MPSC

मित्रांनो कित्येकदा आपण अपयश मिळल्याननंतर खचून जातो. पण आपण आज अशी एक MPSC Success Story पाहणार आहोत. ज्यामध्ये तब्बल 23 वेळा अपयश आल्यानंतरही जिद्द न सोडता 24 व्या वेळी निर्धारित केलेल यश मिळवल. एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. ती मेहनत आपल्याला काहीना काही परतफेड देतेच. त्यामुळे परिस्थितीशी लढत राहीलं पाहिजे. विशेष म्हणजे ही झुंज देत असताना संयम सोडायचा नाही. आपण संघर्ष करत असताना अनेक प्रसंग असे घडतात की, आपण माघार घ्यायचा विचार करतो.

पण अशा कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विचार न करता, न डगमगता आपण परिस्थितीशी दोन हात केले तर शेवटी आपल्यासमोर नियतीदेखील गुडघे टेकते. जर तुम्ही पण आयुष्यामध्ये संघर्ष करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. MPSC Success Story हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला कधीही माणण्याची इच्छा होणार नाही.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story of Sagar Shinde

मित्रांनो ही MPSC Success Story आहे नांदेड मधील सागर शिंदे या तरुणाची. सागर एक-दोनदा नाही तर तब्बल 23 वेळा अपयशी झाला. तो 23 वेळा एमपीएससीच्या परीक्षेत अपयशी झाला. पण त्याने हार मानली नाही. तो जिद्दीने अभ्यास करत राहिला आणि परीक्षा देत राहीला. अखेर त्याच्या मेहनतीचं चीज झालंय आणि 24 व्या वेळेस त्याने ध्येयाला गवसणी घातली आहे.

आपण तर बोलतोच की देव देतो तर छप्पड फाडून देतो. अर्थात हा श्रद्धेचा मुद्दा आहे. पण गेली सहा वर्षे 23 वेळा एमएससी परीक्षेत अपयशी झालेला सागर शिंदे यावेळी तब्बल दोन परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालाय. त्यामुळे त्याची नांदेड जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे. सागर मंत्रालयातील लिपीक आणि कर सहाय्यक अधिकारी या दोन्ही नोकरीसाठी पात्र ठरलाय. सागरने कर सहाय्यक अधिकारी पदाची नोकरीची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा : Mumbai Metro Recruitment 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नवीन पदाची भरती! हे उमेदवार करा अर्ज

यश मिळवल्यानंतर सागर शिंदेची पहिली प्रतिक्रिया काय?

MPSC Success Story: जेव्हा सागर शिंदे यांना त्यांच्या संघर्षाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की “यश आणि अपयश हे येतंच राहतं. अपयश आलं तर न डगमगता आपण पुढे चालत जायला पाहिजे. यश नक्की मिळतं. माझ्यासारखे किती तरी मुलं आहेत, ज्यांना अनेकवेळा अपयश मिळालं आहे. कुणी 30 वेळा अपयशी झाल्यानंतर अधिकारी बनलंय, तर कुणी 25 वेळेस अपयश आल्यानंतरही न खचून जाता मेहनत केली आणि यश ओढवून आणलं. तसंच माझंही आहे”, असं सागरने सांगितलं.

ते बोलले की “घरची परिस्थिती सांगायची झाली तर आम्हाला अडीच एकर शेती आहे. याच अडीच एकर शेतीत आई-वडिलांनी उदरनिर्वाह करुन मला पैसे पाठवले. त्यामुळेच हे यश प्राप्त झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया सागर शिंदे यांनी दिली. “मी 2016 पासून नांदेडला तयारी करत आहे. तेव्हापासून एमपीएससीची प्री, मेन्स परीक्षा देत-देत 2023 उजाडलं. पण 2022 च्या परीक्षेत मला यश आलं”, असं म्हणत सागरने आनंद व्यक्त केला.

सागर शिंदे यांचे शिक्षण बद्दल प्रतिक्रिया :

MPSC Success Story: “माझी पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माटाळा गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर पाचवी ते दहावी वळशी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे झालं. माझी अकरावी-बारावीचं शिक्षण कोपाडी येथील शिवाजी विद्यालय संस्था येथे झालं. त्यानंतर यशवंत महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतलं”, असं सागर शिंदेने सांगितलं.

अशा पद्धतीने सागर शिंदे यांनी कित्येक वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचे जे ध्येय होते ते गाठले. आणि दुसरीकडे आपल्याच आजूबाजूला असे कित्येक विद्यार्थी आहेत जे एक दोन वेळ अपयश आल की हार मानतात. आणि तो मार्ग सोडून देतात. तसेच काही जन तर एकदम टोकाचे निर्णय देखील घेतात. परंतु मित्रांनो असे चुकीचे निर्णय न घेता माणसाने परिस्थिति सोबत झुंज दिली पाहिजे.

हे नक्की करा :

मित्रांनो जर तुम्हाला MPSC Success Story ही आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही ही Success Story पाठवा जे अशाच संघर्षामधून जात आहेत. जेणेकरून त्यांना थोडी हिम्मत येईल. आणि अशाच प्रेरणादायी यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या Bhartiera.in ला भेट देत जा. 

धन्यवाद!

हेही वाचा :

close