Police Bharti Information in Marathi: पोलीस भरती 2025 साठी आवश्यक माहिती जी तुम्हाला माहिती असायला हवी!

Police Bharti Information in Marathi

Maharashtra Police

मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र मध्ये पोलिस भरती होणार आहे. तर आज आपण Police Bharti Information in Marathi पाहणार आहोत. कारण महाराष्ट्रमध्ये लाखों उमेदवार पोलीस भारतीची तयारी करत आहेत. पण तयारी करत असंतान पोलीस भारतीची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

खाकी वर्दीचा तो अभिमान, डोक्यावर टोपी, खांद्यावर स्टार, आणि उभा असलेला सळसळता आत्मविश्वास, हे दृश्य जर तुझ्या मनात रोज खेळतं असेल, तर पुढे दिलेली माहिती खास तुमच्यासाठी आहे. पोलीस भरतीसाठी फक्त पुस्तकं वाचून काही होत नाही… इथं शरीर, मन, आणि मेंदू या तिघांचंही जोरात काम लागतं.

पुढे आपण या लेखात पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणीत यश कसं मिळवायचं, लेखी परीक्षेचं योग्य नियोजन कसं करायचं आणि मानसिक दृष्टिकोन कसा ठेवायचा याची पूर्ण माहिती पाहणार आहोत. Police Bharti Information in Marathi

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Police Bharti Ground Information

पोलीस भरती ग्राउंड माहिती : पोलीस भरतीचे ग्राउंड नेमके कसे असते, तसेच पुरुष उमेदवार व महिला उमेदवार साठी काय भिन्नता असते याची माहिती पुढे दिली आहे.

पुरुष उमेदवार शारीरिक चाचणी (Police Bharti Ground for Male): पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड हे पुढील पद्धतीचे असते.

1600 मीटर धावणे20 गुण
100 मीटर धावणे15 गुण
गोळा फेक15 गुण
एकुण गुण50 गुण

महिला उमेदवार शारीरिक चाचणी (Police Bharti Ground for Female): महिला उमेदवारांसाठी ग्राउंड ही पुढील पद्धतीने असते.

800 मीटर धावणे30 गुण
गोळा फेक20 गुण
एकुण गुण50 गुण

Police Shipai Chalak Ground Details

पोलीस शिपाई चालक पदासाठी ग्राउंड कशा पद्धतीने होते त्याची माहिती पुढे दिली आहे.

पुरुष उमेदवार पोलीस शिपाई चालक :

1600 मीटर धावणे30 गुण
गोळा फेक20 गुण
एकूण गुण50 गुण

महिला उमेदवार पोलीस शिपाई चालक :

800 मीटर धावणे30 गुण
गोळा फेक20 गुण
एकूण गुण50 गुण

ही महत्वाची अपडेट पहा : Maharashtra Saral Seva Bharti 2025: मेगा भरती – महाराष्ट्र शासनाची सरळसेवा पद्धतीने 10वी ते पदवी पास वर 75000+ जागांची भरती!

SRPF Police Bharti Ground Information

SRPF पोलीस म्हणजेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल. सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही 100 गुणांची घेतली जाते. सशस्त्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी वेगवेगळ्या भागात विभागले गेलेले असते. ग्राउंड ची इतर माहिती पुढे दिली आहे.

5 किलो मिटर धावणे50 गुण
100 मिटर धावणे25 गुण
गोळा फेक25 गुण
एकुण गुण100 गुण

Police Bharti Selection Process

Police Bharti Selection Process
Police Bharti Information in Marathi

पोलीस भारती निवड प्रक्रिया : तुम्ही जर पोलीस भारतीची तयारी करताय तर यामध्ये उमेदवारांची निवड कशी करण्यात येणार याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. यामध्ये मुख्यतः तीन टप्प्याद्वारे निवड करण्यात येते तीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. Police Bharti Information in Marathi

1. परीक्षा :

सर्वात अगोदर उमेदवारांची परीक्षा होते. परीक्षेचे स्वरूप पुढे दिली आहे.

  • पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. Police Bharti Information in Marathi

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:

विषयप्रश्न संख्यागुण
अंकगणित2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
बुध्दीमत्ता चाचणी2525
मराठी व्याकरण2525
एकूण100100

एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट असणार आहे.

  • चालक पोलीस शिपाई पदाकरीता :

चालक पोलीस शिपाई पदासाठी हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. Police Bharti Information in Marathi

ही महत्वाची अपडेट : AFS Nagpur Bharti 2025: वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत विविध नवीन पदांची भरती! येथून करा अर्ज

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट असणार आहे.

2. शारीरिक चाचणी :

लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. यावेळी धावण्याची शर्यत घेतली जाते. पोलीस भरतीमधील घेण्यात येणाऱ्या ग्राउंड ची माहिती वरती दिली आहे. Police Bharti Information in Marathi

3. कागदपत्रे पडताळणी :

शारीरिक चाचणी झाल्यानंतर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलण्यात येते. तर तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

ही अपडेट पहा : SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 पदांची भरती; मोठी संधी

Police Bharti Important Document

Maharashtra Police

पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  1. पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी -बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  2. जन्म दाखला,
  3. रहिवासी प्रमाणपत्र,
  4. जातीचे प्रमाणपत्र,
  5. जात वैधता प्रमाणपत्र,
  6. एमएससीआयटी पास असल्याचे प्रमाणपत्र,
  7. खेळाडू प्रमाणपत्र,
  8. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र,
  9. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
  10. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
  11. भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
  12. पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
  13. अनाथा बाबतचे प्रमाणपत्र,
  14. अंशकालीन प्रमाणपत्र,
  15. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र,
  16. एनसीसी प्रमाणपत्र यांसारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
💻 भरतीच्या नवीन अपडेट साठी टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
🌐 महाराष्ट्र पोलीस अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Required Documents for Police Bharti 2025

आवश्‍यक कागदपत्रे (Police Bharti Information in Marathi) :

  • दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
  • शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
  • आधार कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
  • नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
  • लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
  • ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
Police Bharti Information in Marathi ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :