RBI Summer Internship 2026: थेट ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! ₹२०,००० स्टायपेंड आणि बँकिंग करिअरचा अनुभव.

RBI Summer Internship 2026: मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India – RBI) ने समर इंटर्नशिप २०२६ (Summer Internship 2026) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. महत्वाच म्हणजे यामध्ये आकर्षक पगार देखील मिळणार आहे.

या सरकारी इंटर्नशिप (Sarkari Internship) योजनेमुळे विद्यार्थ्यांना थेट भारताच्या केंद्रीय बँकेच्या (Central Bank) कामाचा अनुभव घेता येईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹२०,००० स्टायपेंड (Monthly Stipend) दिला जाईल.

आरबीआय समर इंटर्नशिप २०२६

RBI Summer Internship 2026
संस्थेचे नावरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
योजनेचे नावसमर इंटर्नशिप (Summer Internship 2026)
स्टायपेंड (Stipend)दरमहा ₹२०,००० (₹20,000 Per Month)
इंटर्नशिप कालावधीसाधारणतः ३ महिने (एप्रिल ते जुलै २०२६)
नोकरी/इंटर्नशिप ठिकाणआरबीआयची देशभरातील विविध कार्यालये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online Application)

महत्त्वाच्या तारखा (RBI Summer Internship 2026 Important Dates)

आरबीआय इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया दरवर्षी एका विशिष्ट कालावधीत होते. इच्छुक विद्यार्थ्यांनी या तारखांची नोंद घ्यावी.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
तपशीलतारीख
अर्ज करण्याची सुरुवात१५ ऑक्टोबर २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ डिसेंबर २०२५
निवडीचा निकाल (Result)साधारणतः फेब्रुवारी-मार्च २०२६
इंटर्नशिप कालावधीएप्रिल ते जुलै २०२६

ही अपडेट पहा : DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 764 जागांसाठी भरती, हवी ही पात्रता

शैक्षणिक पात्रता आणि निकष (RBI Summer Internship 2026 Eligibility Criteria)

पात्रता निकषतपशील
अभ्यासक्रमपदव्युत्तर (Postgraduate) अभ्यासक्रम (उदा. M.A., M.Sc., MBA), एकात्मिक ५ वर्षांचे पदवी अभ्यासक्रम (Integrated 5-Year Course) किंवा ३ वर्षांचे पूर्णवेळ कायद्याचे (Law) अभ्यासक्रम.
अभ्यास क्षेत्रातील विषयअर्थशास्त्र, वित्त, बँकिंग, वाणिज्य (Commerce), सांख्यिकी (Statistics), कायदा (Law) किंवा संबंधित विषय.
वर्षाची अटतुम्ही सध्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या-शेवटच्या वर्षात (Penultimate Year) किंवा समतुल्य वर्षात शिकत असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीयत्वभारतीय नागरिक (Indian Citizen)

अर्ज करण्याची प्रक्रिया (Online Application Process)

आरबीआय इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: आरबीआयच्या करिअर/इंटर्नशिप पानावर जा.
  2. जाहिरात वाचा: ‘समर इंटर्नशिप २०२६’ ची सविस्तर जाहिरात (Notification PDF) काळजीपूर्वक वाचा.
  3. ऑनलाईन फॉर्म भरा: वैयक्तिक आणि शैक्षणिक माहितीसह वेब-आधारित अर्ज भरा.
  4. कागदपत्रे अपलोड करा: तुमचा अलीकडील फोटो, स्वाक्षरी आणि तुमच्या कॉलेज/संस्थेचे बोनाफाईड/अधिकृत पत्र (Bonafide/Authorization Letter) स्कॅन करून अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करा: अंतिम मुदतीपूर्वी अर्ज ऑनलाईन सबमिट करा.
  6. शुल्क नाही: या इंटर्नशिपसाठी कोणतेही अर्ज शुल्क (Application Fee) आकारले जात नाही.

ही माहिती पहा : SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती, हवी ही पात्रता

इंटर्नशिपचे फायदे (Benefits)

आरबीआय इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील फायदे मिळतात:

  • मूलभूत अनुभव: केंद्रीय बँकिंग, धोरण संशोधन (Policy Research), डेटा विश्लेषण (Data Analysis) आणि वित्तीय नियमन (Financial Regulation) यांसारख्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव.
  • आर्थिक मदत: ३ महिन्यांसाठी एकूण ₹६०,०००/- चा स्टायपेंड.
  • भविष्यातील करिअर: बँकिंग (Banking Career), वित्त आणि अर्थशास्त्र क्षेत्रातील भविष्यातील नोकऱ्यांसाठी मौल्यवान असलेले इंटर्नशिप प्रमाणपत्र.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

लेटेस्ट अपडेट साठीTelegram Channel
आरबीआय करिअर वेबसाइटअधिकृत वेबसाइट

ही उत्कृष्ट संधी गमावू नका! पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कोणतीही माहिती चुकीची किंवा अपूर्ण भरणार नाही याची काळजी घ्यावी. आणि अशाच अपडेट साठी ग्रुप जॉइन करून भरती एरा ला भेट देत जा.

ही मेगा भरती पहा :