Ujjwala Yojana 2.0 New Update
मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का? या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्वला योजना. आता या योजनेअंतर्गत अंतर्गत PM Ujjwala Yojana 2.0 ही नवीन मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार आता अर्जदाराला मोफत फ्री मध्ये गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा नक्कीच घ्या.
जर तुमच्या कडे जर घरगुती गॅस कनेक्शन नसेल तर तुमच्या साठी ही मोठी संधी आहे, लवकर मोफत गॅस कनेक्शन साठी अर्ज करून घ्या म्हणजे तुम्हाला सरकार द्वारे अगदी फ्री मध्ये गॅस कनेक्शन चा लाभ मिळेल. आणि तुमच्या इतर मित्रांना तसेच नातेवाईकांना पण कळवा जेणेकरून ते पण या योजणेचा लाभ घेतील.
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रे लागणार? कोणते व्यक्ती पात्र असणार? लाभ कसा मिळणार? अशी सविस्तर माहिती हवी असेल तर पुढे या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे काळजीपूर्वक सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व माहिती नीट वाचा.
Pradhan Mantri Ujjwala Yojana
योजनेचा तपशील :
योजनेचे नाव | PM Ujjwala Yojana 2.0 |
योजनेची सुरुवात कोणी केली | केंद्र शासन |
योजनेचा उद्देश | मोफत गॅस कनेक्शन देणे |
लाभार्थी | देशातील पात्र महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन किंवा ऑफलाईन योजनेचे अर्ज |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
Ujjwala Yojana 2.0 Eligibility (उज्वला योजना आवश्यक पात्रता)
आवश्यक पात्रता : मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणारी केवळ महिला असावी, पुरुषांना अर्ज करता येणार नाही.
- अर्जदार महिलेचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे अशाच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
- घरामध्ये कोणत्याही स्वरूपाचे आधीचे घरगुती LPG गॅस नसावे.
- SC, ST, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी, MBC, अंत्योदय शिधापत्रिका धारक, मागासवर्गीय, गरीब लोक या PM Ujjwala Yojana 2.0 साठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
- जर तुमच्याकडे या पात्रता असतील तर तुम्हाला या योजणेचा लाभ मिळणार आहे.
Ujjwala Yojana 2.0 Document
उज्वला योजना आवश्यक कागदपत्रे : या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही महत्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची लिस्ट पुढे दिली आहे.
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- रेशनकार्ड
- बँकेचे पासबुक
- मोबाइल नंबर (घरामध्ये कोणाचाही चालेल)
वरती दिलेल्या कागदपत्रांसोबत तुम्हाला यासोबत इतर काही कागदपत्रे देखील सादर करावे लागतात, जर तुम्ही तुमचा अर्ज ऑफलाईन स्वरूपात केला तर तुम्हाला स्थानिक Distributor ने सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत लावावे लागतील. आणि जर तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन केला तर तुम्हाला वर सांगितलेले आवश्यक कागदपत्रे (Documents) Form भरताना अपलोड करावे लागणार आहेत. तरच तुमचं फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे.
How to Apply for Ujjwala Yojana 2.0
अशा पद्धतीने अर्ज करा : मित्रांनो तुम्ही ऑनलाइन व अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज हा तुम्ही तुमच्या जवळच्या डिस्ट्रीब्यूटर कडे जाऊन करू शकता आणि ऑनलाईन अर्ज हा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरून करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत खाली दिली आहे.
ऑनलाइन अर्ज पद्धती :
- सर्वात अघोदर तुम्हाला तुम्हाला PM Ujjwala Yojana Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला Click Here to apply for New Ujjwala 2.0 Connection या Option वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर एक Pop up येईल, त्यात तीन गॅस चे ऑप्शन असतील त्यातून तुम्हाला जो गॅस पाहिजे तो निवडायचा आहे.
- Click here to apply वर क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट Open होईल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर PM Ujjwala Yojana 2.0 Application Form Open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यावर वर सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे.
- त्यानंतर एकदा अर्ज पुनः चेक करून घ्या जेणेकरून काही चूक होणार नाही.
- आणि सर्व प्रोसेस झाल्यानंतर Submit वर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.
- तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज अधिकाऱ्यांद्वारे तपासला जाईल आणि जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन व गॅस सबसिडी देखील मिळणार आहे.
इतर महत्वाच्या योजना अपडेट : येथे पहा सर्व महत्वाच्या योजना
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ होईल. आणि सरकारच्या अशाच नवनवीन योजनांचे तसेच सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
FAQ:
Ujjwala Yojana 2.0 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला ती लेखामध्ये मिळेल. तिथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
उज्वला योजना आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
अर्जदार महिलेचे आधार कार्ड
रहिवासी पुरावा
रेशनकार्ड
बँकेचे पासबुक
मोबाइल नंबर (घरामध्ये कोणाचाही चालेल)
Ujjwala Yojana 2.0 मध्ये मोफत गॅस कनेक्शन कधी मिळते?
योजनेसाठी तुम्हाला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात त्यानंतर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज
अधिकाऱ्याद्वारे चेक केला जातो आणि जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन व गॅस सबसिडी मिळते.
धन्यवाद!