Mahajyoti Free Military Training 2024: आता मिळणार मोफत आर्मी ट्रेनिंग! व 72,000 ची स्कॉलरशिप

Mahajyoti Free Military Training 2024

मित्रांनो जर तुम्ही आर्मी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण Mahajyoti Free Military Training 2024-25 या योजनेद्वारे मिलिटरी भरतीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करिता 2024-2025 या वर्षांमध्ये 10वी पास विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना 72000 रुपयांची स्कॉलरशिप आणि इतर महत्त्वाच्या वस्तू देखील मिळणार आहेत.

Mahajyoti Free Military Training 2024 या योजनेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे. जशी की कोणते मुलं मुली या योजनेसाठी अर्ज करू शकतात? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे पूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
हेही वाचा : BARTI Scholarship 2024: पोलीस भरतीचे ट्रेनिंग मोफत तसेच 72,000 स्कॉलरशिप! असा करा अर्ज

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25
Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25

योजनेचा तपशील :

योजनेचे नावMahajyoti Free Military Bharti Training 2024-25
अर्जाची शेवटची तारीख10 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पद्धतीऑनलाइन अर्ज करायचा आहे.

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Training Process

प्रशिक्षण प्रोसेस : या योजनेतून तुम्हाला कशाप्रकारे प्रशिक्षण मिळणार आहे याची माहिती पुढे दिली आहे.

  • मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • या योजनेमद्धे उमेडवरला 6 महीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • प्रशिक्षण अनिवासी तसेच ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे.

Mahajyoti Free Military Training 2024-25 Benefits

मित्रांनो Mahajyoti Free Military Training 2024-25 या योजनेमार्फत पात्र उमेदवारला MHT-CET/ JEE/ NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/ Day इंटरनेट डाटा देखील मिळणार आहे.

आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्या उमेदवारांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना योजनेतून मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला याचा खूप फायदा होणार आहे.

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Criteria

आवश्यक पात्रता : या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे काही आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा
  • विद्यार्थी 2024 मधे 10वी पास पाहिजे किंवा 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
  • विद्यार्थीचे वय कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 19 वर्ष चालेल.
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास व प्रवर्ग मधील असावा.
  • विद्यार्थीने यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनांच्या कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल तर त्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये.

प्रवर्गानुसार आरक्षण : या योजनेसाठी प्रवर्गानुसार आरक्षण देखील मिळणार आहे. त्याची माहिती पुढे आहे.

अ. क्रसामाजिक प्रवर्गमिळणारे आरक्षण
1इतर मागास वर्गीय (OBC)59%
2निरधीसूचित जमाती – अ (VJ-A)10%
3भटक्या जमाती – ब (NT-B)8%
4भटक्या जमाती – क (NT-C)11%
5भटक्या जमाती – ड (NT-D)6%
6विशेष मागास वर्गीय (SBC)6%
एकुण100%

Required Document for Free Military Training Program

आवश्यक कागदपत्रे : उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे आसने आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (पुढील व मागील बाजू सहित).
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate).
  • रहिवाशी दाखला (Domicile Certificate).
  • वैद्य नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Leyer).
  • विद्यार्थी 12वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
  • 10 वी गुणपत्रिका.
  • पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड लिंक असावा).
  • अनाथ असल्यास दाखला.

Physical Criteria for Mahajyoti Free Military Training 2024

आवश्यक शारीरिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा पुढील शारीरिक पात्रतेची पूर्तता करणारा असणे आवश्यक आहे.

  • पुरुष उंची : कमीत कमी 157 से.मी.
  • महिलांची उंची : कमीत कमी 152 से.मी.पाहिजे
  • छाती : कमीत कमी 77 से.मी. ( फुगवल्यानंतर 82 से.मी.) केवळ पुरुषांकरिता.

तसेच उमेदवाराकडे काही इतर शारीरिक पात्रता असणे देखील आवश्यक आहे.

  • अर्जदाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असणे गरजेचे आहे.
  • छातीच्या विकास कमीत कमी 4 से.मी. विस्तारित असावा.
  • नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. ( म्हणजे किमान 14 दंतबिंदू )
  • प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांनी 6/6 अंतरांच्या दृष्टिकोन वाजता आला पाहिजे. ( सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी ( CP-3 असावी )
  • हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हेरीकोकण किंवा मुळव्याध यांसारखे रोग नसावेत.
  • लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे. (उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करूनच अर्जदारांनी नोंद घ्यावी)

Free Military Training Program Selection Process

निवड प्रक्रिया : Mahajyoti Free Military Training 2024 या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही पुढील टप्प्याद्वारे करण्यात येणार आहे.

  • या योजनेत उमेदवारांची निवड करण्यासाठी आलेल्या सर्व अर्जांची तपासणी करण्यात येईल.
  • अर्जांची तपासणी केल्यानंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची मिलिटरी भरतीपूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
  • त्यानंतर घेतलेल्या चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकना नुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र अर्जदाराची यादी व प्रतिक्षायादी महा ज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अशा पद्धतीने उमेदवारांची निवड होणार आहे.

Mahajyoti Yojana Army Training Online Registration

अशा पद्धतीने अर्ज करा : Mahajyoti Free Military Training 2024 या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • सर्वात अघोडार तुम्हाला महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • त्यानंतर Notice Board मधील “Application for Military- 2024-25 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • सर्व कागदपत्रे स्वाक्षाकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहेत.
  • अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 Online Registration Last Date

शेवटची तारीख : या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो Mahajyoti Free Military Training 2024 ही माहिती तुमच्या आर्मी भरती करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि जर तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर पाहायचे असतील तर bhartiera.in ला रोज भेट देत जा. 

हेही वाचा :

eShram Card Yojana: कामगारांना मिळणार 3000 रुपये महिना! अर्ज सुरू

FAQ:

Mahajyoti Free Military Bharti Training 2024-25 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Mahajyoti Free Military Training 2024 या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.

महाज्योती योजना मोफत आर्मी ट्रेनिंग 2024-25 साठी कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी 10वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. तसेच इतर माहिती लेखामध्ये दिली आहे.

close