SBI Asha Scholarship Program 2026–27
SBI Asha Scholarship Program 2026–27: एसबीआय फाउंडेशन (SBI Foundation) कडून ‘SBI Asha Scholarship Program’ अंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या CSR उपक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा मुख्य उद्देश शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना आर्थिक अडसर न येता शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे हा आहे.
या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दरवर्षी रु. १५,००० ते रु. ७,५०,००० पर्यंत ची भरघोस आर्थिक मदत दिली जाते. या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
SBI Asha Scholarship Program 2026–27 Program Highlights
| तपशील | विशिष्ट माहिती |
| स्कॉलरशिपचे नाव | एसबीआय आशा स्कॉलरशिप प्रोग्राम (SBI Asha Scholarship Program) |
| प्रोजक संस्था | एसबीआय फाउंडेशन (SBI Foundation) |
| अंमलबजावणी भागीदार | बडी४स्टडी (Buddy4Study) |
| पात्रता | इयत्ता ६ वी ते १२ वी, पदवी (Undergraduate), पदव्युत्तर (Postgraduate) व IIT/IIM विद्यार्थी |
| स्कॉलरशिप रक्कम | रु. १५,००० ते रु. ७,५०,००० प्रतिवर्ष |
| कौटुंबिक उत्पन्न मर्यादा | वार्षिक रु. ३,००,००० ते रु. ६,००,००० पर्यंत (श्रेणीनुसार) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online Application) |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 19 सप्टेंबर 2026 |
ही अपडेट वाचा : Bajaj Finserv Scholarship Program FY 2026-27: Management आणि Engineering च्या विद्यार्थ्यांना 1.5 लाख ते 10 लाख रुपये पर्यंतची स्कॉलरशिप!
SBI Asha Scholarship 2026 Category-wise Benefits
हा स्कॉलरशिप प्रोग्राम प्रामुख्याने चार वेगवेगळ्या स्तरांवर विभागला गेला आहे:
१. शालेय विद्यार्थ्यांसाठी (School Students – Class 6 to 12)
- पात्रता: इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५% गुण असणे आवश्यक.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. ३,००,००० पेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ:रु. १५,००० प्रतिवर्ष.
२. पदवी विद्यार्थ्यांसाठी (Undergraduate Students – UG Courses)
- पात्रता: भारतातील मान्यताप्राप्त संस्थांमधून पदवी अभ्यासक्रमाच्या (BA, B.Sc, B.Com, B.Tech इत्यादी) पहिल्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी. मागील वर्षात किमान ७५% गुण.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. ६,००,००० पेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ:रु. ५०,००० प्रतिवर्ष.
३. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी (Postgraduate Students – PG Courses)
- पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून PG अभ्यासक्रमात (MA, M.Sc, M.Com, M.Tech इत्यादी) प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. ६,००,००० पेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ:रु. ७५,००० प्रतिवर्ष.
४. प्रीमियर संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी (IIT / IIM Students)
- पात्रता: शीर्ष शैक्षणिक संस्थांमध्ये (NIRF Top Ranked / IITs / IIMs) प्रवेश घेतलेले पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: कौटुंबिक उत्पन्न रु. ६,००,००० पेक्षा कमी असावे.
- आर्थिक लाभ:रु. २,००,००० ते रु. ७,५०,००० पर्यंत (अभ्यासक्रम व फीनुसार).
SBI Asha Scholarship 2026 Eligibility Criteria
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मागील वर्षाच्या परीक्षेत किमान ७५% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- कौटुंबिक उत्पन्न: कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न योजनेच्या नियमानुसार रु. ३ लाख ते रु. ६ लाखांच्या मर्यादेत असावे.
- भारतीय नागरिकत्व: अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- विशेष प्राधान्य: अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), दिव्यांग विद्यार्थी आणि महिला उमेदवारांना अर्जात विशेष प्राधान्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
अर्ज सबमिट करताना खालील कागदपत्रांच्या स्कॅन प्रती जोडणे अनिवार्य आहे:
- ओळख पुरावा: आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स
- शैक्षणिक पुरावा: मागील वर्षाची गुणपत्रिका (Marksheet)
- प्रवेश पुरावा: चालू वर्षाची फी पावती (Fee Receipt) किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate)
- उत्पन्न दाखला: तहसीलदार / सक्षम प्राधिकरणाने दिलेला उत्पन्नाचा दाखला / Form 16 / Salary Slip
- बँक पासबुक: विद्यार्थ्याच्या बँक खात्याचा तपशील (Passbook / Cancelled Cheque)
- पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर/ईमेल आयडी
ही अपडेट वाचा : IBPS RRB Bharti 2026: IBPS मार्फत ग्रामीण बँक मध्ये 13,706 जागांसाठी मेगाभरती, Attractive Salary
अर्ज कसा करावा? (Step-by-Step Application Process)
- बडी४स्टडीच्या अधिकृत वेबसाईटवरील SBI Asha Scholarship Page वर जा.
- तुमच्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीने लॉग इन (Register / Login) करा.
- ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करा.
- अर्जातील सर्व वैयक्तिक, कौटुंबिक व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- नियम व अटी मान्य करून ‘Preview’ वर क्लिक करा व भरलेली माहिती तपासा.
- सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

| Our Telegram channel for detailed information | Click here |
| Official Details | Click here |
| Online Application | Click Here |
| Official website | Click here |
| ☑️ Other important updates | Click here |
Conclusion :
The SBI Asha Scholarship Program 2026–27 is one of India’s largest CSR education schemes, empowering thousands of talented students to achieve their academic goals without financial worry. Ensure you gather your documents and complete your application before 19 September, 2026!






