World Chess Champion D Gukesh
मित्रांनो आपण आयुष्यामध्ये खूप स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. असंच स्वप्न बघितल होत D Gukesh ने. आपण पुढे गुकेश दोम्माराजू बद्दल सर्व माहिती जसे की यांचा प्रवास कसा सुरू झाला आणि कसे त्यांनी त्याचे स्वप्न साकार केले ते पाहणार आहोत.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा!
अशाच अपडेट साठी आपला ग्रुप | Click Here |
Who is D Gukesh
बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? :
मित्रांनो सध्या सर्वत्र एकच नावाची चर्चा आहे ते म्हणजे D Gukesh! तर चला आज जाणून घेऊया D Gukesh कोण आहे. बुद्धिबळातील नवीन चाणक्य डी गुकेशचा जन्म २९ मे 20०६ रोजी चेन्नई (तामिळनाडू) येथे तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव डोम्माराजू गुकेश आहे. त्याचे पालक आंध्र प्रदेशातील गोदावरी डेल्टा भागातील आहेत. त्याचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा सर्जन आहेत, तर आई पद्मा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. वयाच्या सातव्या वर्षी तो बुद्धिबळ खेळायला शिकला. तो चेन्नईतील वेल्लामल विद्यालयात शिकतो.
२ व्या वर्षी ग्रँडमास्टर, आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक :
डी गुकेशने वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर विजेतेपद पटकावले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. त्यानानंतर हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले होते. डोम्माराजू गुकेश २०२० चा वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीचा (WACA) भाग आहे. तसेच, २०२३ पासून वेस्टब्रिज कॅपिटल्स डी गुकेशला स्पॉन्सर करत आहेत.
हेही वाचा : Ratan Tata Biography in Marathi: रतन टाटांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, उत्तराधिकारी, एकूण संपत्ती किती आहे? पहा पूर्ण जीवन प्रवास
D Gukesh Journey
डी गुकेश चा प्रवास : मित्रांनो तुम्ही पुढे पाहू शकता की त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची वाटचाल कासि होती.
- 2015 : गोव्यामध्ये राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवल आणि त्याने पुढची 2 वर्ष ही विजेतेपद कायम ठेवले.
- 2016 : त्यानंतर कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकले.
- 2017 : यावर्षी गुकेशला पाहिल्यानंदच इंटरनॅशनल चेस फेडरेशन रेटिंग मिळालं.
- 2018 : यावर्षी गुकेशचे वय केवळ 12 वर्षे होते आणि या वर्षी त्याने वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप जिंकली.
- 2019 : यावर्षी गुकेशचे ग्रँडमास्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
- 2021 : यावर्षी युरोपियन क्लब कप जिंकला या स्पर्धेदरम्यान त्याने मॅग्नस कार्लसनचा सामना केला होता.
- 2022 : आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या बुद्धिबळ संघात समावेश झाला.
- 2023 : चेस वर्ल्ड कप मध्येही त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि सप्टेंबर मध्ये रेटिंग लिस्ट मध्ये मुकेशने अधिकृत रित्या विश्वनाथ आनंदला मागे टाकला. आणि या कामगिरी सोबत तो भारतातील नंबर एक चा बुद्धिबळपटू ठरला.
- 2024 : एप्रिल मध्ये फिडे कॅन्डीडेट्स स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. आणि अखेर त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
World Chess Champion 2024
मित्रांनो पूर्ण भारतासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament) जिंकून नवा इतिहास रचला आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू तर ठरला आहेच, शिवाय ही स्पर्धा जिंकणारा डी गुकेश जगातील सर्वात तरुण खेळाडूही ठरला आहे.
मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचे प्रत्येक बुद्धिबळपटू चे स्वप्न असत आणि आज मी माझ स्वप्न जगतो आहे. सर्वात आधी देवाचे खूप आभार - डी गुकेश.
D Gukesh World Chess Champion
काल गुरुवारी (१२ डिसेंबर) रोजी झालेल्या चॅम्पियनशिपच्या १४व्या आणि शेवटच्या फेरीत लिरेन आणि गुकेश मध्ये चुरशीची स्पर्धा झाली, यात गतविजेता लिरेन याने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. यासह वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारताच्या गुकेशने विश्वविजेता बनून विक्रम केला. विशेष म्हणजे तो १८वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनही आहे.
सिंगापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत होती. डिंगने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. आई अशा परिस्थितीत त्याने गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला होता. तर गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये चॅलेंजर म्हणून या चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केला होता.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंद याच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
D Gukesh Biography in Marathi
मित्रांनो तुम्हाला गुकेशचा प्रवास कसा वाटला? आपण सर्वांनीही स्वप्न बघितले पाहिजेत आणि ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. ही माहिती तुमच्या त्या मित्रांना पाठवा ज्यांना तुम्ही आयुषमद्धे यशस्वी पाहू इच्छित आहेत. आणि अशाच अभिमानास्पद गोष्टी पाहण्यासाठी आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!
हेही वाचा :
Thank You!