MPSC Exam Postponed: अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर ‘एमपीएससी’ने २८ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; सुधारित तारीख येथे पहा

MPSC Exam Postponed Date 2025

MPSC Exam Postponed Date 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य नव्हते. कॉंग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. आयोगाने सुधारित तारीख जाहीर केली आहे.

पुढे तुम्हाला सुधारित तारीख पाहायला मिळणार आहे. पुढे त्याची माहिती दिली आहे. अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MPSC Exam Date 2025

MPSC Preliminary Exam 2025 Postponed: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता हा पेपर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यामुळे अतिवृष्टीबाधित जिल्ह्यांतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दर्शविला होता. अखेर या निर्णयाला जास्त विरोध झाल्यानंतर एमपीएससीने निर्णय घेतला आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही रविवारी (२८ सप्टेंबर २०२५) रोजी नियोजित होती. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बरेच महामार्ग बंद आहेत. अशात परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी उमेदवारांना अनेक अडचणी येणार होत्या. त्यामुळे उमेदवारांनी ही परीक्षा पुढे जावी, ही मागणी केली होती. MPSC Exam Postponed Date 2025

ही अपडेट पहा : Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँक अंतर्गत 3500 रिक्त पदांची भरती जाहीर; पहा पूर्ण प्रक्रिया

आज अखेर ही मागणी पूर्ण झाली असून राज्यसेवा पूर्व परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता याची सुधारित तारीख ९ नोव्हेंबर २०२५ आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवारी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे जावी, अशी मागणी या भागातील उमेदवारांकडून करण्यात आली होती. अखेर ही परीक्षा पुढे गेली आहे.महाराष्ट्र

लोकसेवा आयोग काय म्हणाले?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २८ सप्टेंबर, २०२५ रोजी होणारी परीक्षा राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये.

यासाठी शासनाने पत्राद्वारे केलेल्या विनंतीनुसार ही परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल.

या परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. MPSC Exam Postponed Date 2025

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
सुधारित तारीखसुधारित तारीख येथे पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
 इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

चबरोबर पुढील पाच-दिवस (२५ ते २९) राज्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे अगोदर झालेल्या पावसामुळे या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील एका आठवड्यापासून पावसाने थैमान घातला होता. या कारणास्तव राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसह अनेक राजकीय व्यक्तींनी केली होती. अखेर ही मागणी पूर्ण करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे गेली आहे. ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. MPSC Exam Postponed Date 2025

राजकीय नेत्यांनीही मुद्दा लाऊन धरला आहे

दुसरीकडे मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर असून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटोले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील, बच्चू कडूंसह अनेक नेत्यांनी केली होती. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे.

वाचनालये बंद असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही पावसात वाहून गेले आहे. तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत असून अनेक ठिकाणांहून विद्यार्थ्यांना पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे २८ सप्टेंबरची परीक्षा काही काळ पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांसह नेत्यांनी केली होती. अखेर ही परीक्षा पुढे गेली असून हा पेपर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.

शेअर करा MPSC Exam Postponed Date 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना, जेणेकरून त्यांना देखील या नवीन तारीख ची माहिती मिळेल. आणि अक्षकज अपडेट साठी आपल्या भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही अपडेट पहा :