Maharashtra CET 2025 Admission: सीईटी कक्षाकडून 16 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू; पहा कोणत्या अर्ज साठी सर्वात अर्ज

Table of Contents

Maharashtra CET 2025 Admission

Maharashtra CET 2025 Admission: मित्रांनो सध्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी कक्ष) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि अॅडमिशन घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत सुमारे सव्वातीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून अभियांत्रिकीसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.

आणि त्यानंतर एमबीए आणि बीएड अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती आहे. अर्ज करण्याची मुदत जवळ येत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra CET admission 2025-26

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ( सीईटी कक्ष ) सध्या राज्यभरात तब्बल सोळा अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुमारे सव्वातीन लाख विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज म्हणजे तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार अर्ज अभियांत्रिकीसाठी दाखल झाले असून त्या खालोखाल एमबीए, बीएड, विधी तीन व पाच वर्षे या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

तसेच गेल्या काही दिवसांत ही संख्या वाढली आणखी आहे. सीईटी कक्षाने मार्च-एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत अठरा हून अधिक विविध प्रवेश परीक्षा आयोजित केल्या. या परीक्षांचे निकाल मे आणि जून या दोन महिन्यांत जाहीर झाले. आणि आता पुन्हा या नोंदणी साठी सुरुवात झाली आहे. जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता पण आता जसी जसी नोंदणीची तारीख जवळ येत आहे. तशी तशी नोंदणीत वाढ होत आहे. Maharashtra CET 2025 Admission

या अभ्यासक्रमांपैकी बहुतांश अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून आठ ते नऊ जुलैदरम्यान अर्जनोंदणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यापैकी काही अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली, तरी बहुतांश अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

ही अपडेट पहा :

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास

Maharashtra CET 2025 Admission

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत यापैकी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली होती. यापैकी ९२,६११ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज कन्फर्म केले आहेत. पुढे तुम्ही दिलेल्या चार्ट मध्ये पाहू शकता की कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती अर्ज आले आहेत.

अभ्यासक्रमनोंदणीअर्ज निश्चिती
अभियांत्रिकी१,७७,२५१९२,६११
बीए४१,०३२२५,५४४
एमबीए३७,४७३१२,८३७
विधी-तीन वर्षे२८,५४८११,६८९
एमसीए१५,५७३३,५२०
विधी-पाच वर्षे१३,८७०९,६८१
एमडीएस३,४९३१,०७१
???? नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
????️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
???? अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

यामध्ये एमबीएसाठी अर्ज नोंदणी केलेल्या ३७,४७३ विद्यार्थ्यांपैकी फक्त १२,८३७ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले. बीएडसाठी नोंदणी झालेल्या ४१,०३२ विद्यार्थ्यांपैकी २५,५४४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले. यापैकी अनेक अभ्यासक्रमांसाठी 8 आणि 9 जुलैपर्यंत अर्ज नोंदणीची मुदत आहे. त्यामुळे या अर्जसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता सीईटी कक्षाकडून वर्तवण्यात आली आहे.

जर तुमचा कोणी मित्र यासाठी अर्ज करणार आहे. त्याला Maharashtra CET 2025 Admission ही माहिती लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अशाच अपडेट मिळतील. आणि आपल्या भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :