Nagarparishad Bharti Update 2026: नगरपरिषद व नगरपंचायत भरतीच्या पात्रतेमद्धे मोठे बदल, तुम्हाला माहिती असायला हवे

Nagarparishad Bharti Update 2026 in Marathi

Nagarparishad Bharti Update 2026: महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासकीय सेवा अंतर्गत नगरपरिषद भरती २०२६ (Nagarparishad Bharti Update 2026) संदर्भात नवीन अपडेट्स आणि घोषणा समोर येत आहेत. महाराष्ट्रातील विविध नगरपरिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो विविध पदांसाठी ही मेगा भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या भरतीसंदर्भातील सर्व महत्त्वाचे तपशील, संभावित पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची पद्धत आणि केलेले नवीन बदल याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

महत्त्वाचे तपशील (Recruitment Highlights)

तपशीलविशिष्ट माहिती
विभाग / संस्थामहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA Maharashtra)
भरतीचे नावमहाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत सेवा भरती २०२६
एकूण जागाविविध पदे (नियतकालिक अधिसूचनेनुसार)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र (महाराष्ट्र राज्य)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online Application)
निवड परीक्षासंगणक आधारित चाचणी (CBT Exam – TCS/IBPS द्वारे)
अधिकृत संकेतस्थळmahadma.maharashtra.gov.in

Nagarparishad Bharti Update 2026

नगरपरिषद व नगरपंचयात भरतीमधील नवीन बदल: महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. लिपिक-टंकलेखक, वाहन चालक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरेखक, अनुरेखक, फायरमन, सफाई कामगार अशा अनेक पदांच्या शैक्षणिक अर्हतेत बदल झाले आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेक पदांसाठी असलेली अनुभवाची अट काढून टाकली आहे, काही पदांसाठी HSC ऐवजी SSC पुरेशी केली आहे आणि सरळसेवा भरतीसाठी अनेक पदांवरील MS-CIT ची अट पात्रतेतून हटवली आहे. त्यामुळे Fresher उमेदवार, 10वी पास, ITI पास आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. Nagarparishad Bharti Update 2026

ही भरती पहा: RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये

संभावित पदे आणि वेतनश्रेणी (Post-Wise Salary Scale)

नगरपरिषद भरतीअंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय संवर्गातील पदांवर भरती केली जाते:

पदाचे नाव (Post Name)वेतनश्रेणी (7th Pay Commission)
नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा (Tax & Admin Officer)S-15 (₹४१,८०० – ₹१,३२,३००/-)
नगरपरिषद लेखापाल / लेखापरीक्षक (Accountant / Auditor)S-14 (₹३८,६०० – ₹१,२२,८००/-)
नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (Civil / Electrical / Computer)S-14 (₹३८,६०० – ₹१,२२,८००/-)
नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक (Sanitation Inspector)S-8 (₹२५,५०० – ₹८१,१०0/-)
सहाय्यक लिपिक / टंकलेखक (Clerk Typist)S-6 (₹१९,९०० – ₹६३,२००/-)
फायरमन / अग्निशामक (Fireman)S-6 (₹१९,९०० – ₹६३,२००/-)

Nagarparishad Bharti Update 2026: आदेशातील 4 मुख्य बदल

नियमांचे नाव बदलले: पूर्वीचे नाव “नगरपरिषद, नगरपंचायत (नगरपरिषद गट-क व गट-ड संवर्गातील) (सेवाप्रवेश) नियम, 2023” असे होते. आता हे नियम “नगरपरिषद व नगरपंचायत (गट-क व गट-ड संवर्गातील) सेवाप्रवेश नियम, 2024” या नावाने ओळखले जातील.

संगणक अर्हता प्रमाणपत्राचा नवीन नियम (नियम 9): यापूर्वी परिशिष्ट-1 मधील पदांवर सरळसेवा किंवा पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे नियुक्तीपूर्वीच संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे किंवा त्यातून सूट मिळालेली असणे आवश्यक होते.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आता नियम दोन भागांत आहे:

पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्यांसाठी: पदोन्नतीपूर्वी खालीलपैकी एक आवश्यक आहे:

  • शासन नियमांनुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र, किंवा
  • सामान्य प्रशासन विभाग (माहिती व तंत्रज्ञान) यांनी शासन आदेशाद्वारे नमूद केलेली संगणक / IT विषयक परीक्षा उत्तीर्ण, किंवा
  • सामान्य प्रशासन विभागाने ठरवलेल्या वयोमर्यादेनुसार सूट.

अन्यथा वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळणार नाही.

सरळसेवेने नियुक्त होणाऱ्यांसाठी: नियुक्तीपूर्वी संगणक प्रमाणपत्र नसले तरी नियुक्ती होऊ शकते, पण संबंधित नियमात दिलेल्या विहित मुदतीत ते प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे.

  • परिशिष्ट-1 (गट-क पदे) च्या अर्हतेत बदल
  • परिशिष्ट-2 (गट-ड पदे) च्या अर्हतेत बदल

Nagarparishad Bharti Update 2026: गट-क पदांची सुधारित शैक्षणिक पात्रता

मित्रांनो पुढे तुम्हाला या भरतीमधील पदांमद्धे व शैक्षणिक पात्रतेमधील करण्यात आलेल्या बदलांची पूर्ण माहिती दिली आहे. काळजीपूर्वक वाचा. Nagarparishad Bharti Update 2026

ही भरती पहा: Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती, पात्रता 10वी पास

Nagarparishad Bharti प्रशासकीय सेवा

लिपिक-टंकलेखक (गट-क) – सरळसेवा 50%

पूर्वीची पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी, मराठी 30 / इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन, MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र, मराठीचे पुरेसे ज्ञान.

सुधारित पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
  • राज्य शासनाची मराठी 30 श.प्र.मि. / इंग्रजी 40 श.प्र.मि. वेगाची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.

✅ बदल: सरळसेवेच्या पात्रतेतून MS-CIT ची अट काढली.

लिपिक-टंकलेखक (गट-क) – पदोन्नती 50%

सुधारित पात्रता:

  • नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीतील किमान 3 वर्षांचा अनुभव (नियमित सेवा पूर्ण व सेवाज्येष्ठतेनुसार).
  • HSC उत्तीर्ण.
  • मराठी 30 / इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र.
  • MS-CIT किंवा समकक्ष शासनमान्य प्रमाणपत्र.
  • विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
👉 पदोन्नतीच्या अटी जवळपास पूर्वीसारख्याच आहेत. MS-CIT आणि विभागीय परीक्षा येथे कायम आहे.

लघुटंकलेखक (गट-क) (स्वीय सेवा) – सरळसेवा 100%

पूर्वीची पात्रता: पदवी, मराठी व इंग्रजी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि., टंकलेखन 30/40, MS-CIT, मराठीचे ज्ञान.

सुधारित पात्रता:

  • कोणत्याही शाखेची पदवी.
  • मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाची 80 श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
  • मराठी 30 / इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे ज्ञान.
✅ बदल: आता दोन्हीपैकी एका भाषेत लघुलेखन पुरेसे, MS-CIT काढले.

वाहन चालक (गट-क) (तांत्रिक सेवा) – सरळसेवा 100%:

पूर्वीची पात्रता: SSC, हलके वाहन परवाना, 3 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव, मोटार वाहन दुरुस्ती प्रशिक्षण असल्यास प्राधान्य, मराठीचे ज्ञान.

सुधारित पात्रता:

  • SSC उत्तीर्ण.
  • हलके वाहन चालवण्याचा परवाना.
  • मराठी भाषेचे ज्ञान.
✅ बदल: 3 वर्षे अनुभवाची अट काढली.

उद्यान पर्यवेक्षक (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची B.Sc. (हॉर्टिकल्चर / ॲग्रीकल्चर / फॉरेस्ट्री) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी. Nagarparishad Bharti Update 2026

✅ बदल: 3 वर्षे अनुभव असणाऱ्यांना मिळणारे प्राधान्य काढले.
Nagarparishad Bharti Update 2026

नगरपरिषद व नगरपंचयात तांत्रिक सेवा

गाळणी चालक / प्रयोगशाळा सहायक (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता:

  • शासनमान्य विद्यापीठाचा रसायनशास्त्र विषयातील विज्ञान पदवीधर.
  • प्रयोगशाळा सहायक पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची DMLT पदविका.
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
✅ बदल: MS-CIT काढले. पूर्वी “DMLT पदवी” असे लिहिले होते, आता “DMLT पदविका” अशी दुरुस्ती.

जोडारी / वीजतंत्री (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता:

  • SSC उत्तीर्ण.
  • शासनमान्य ITI चा जोडारी / वीजतंत्री विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
✅ बदल: पूर्वी वीजतंत्री / नळ कारागीर असा ट्रेड होता, आता जोडारी / वीजतंत्री. 3 वर्षे अनुभवाची अट काढली.

पंप ऑपरेटर (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: SSC उत्तीर्ण आणि शासनमान्य ITI चा पंप ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

✅ बदल: अनुभवधारकांना मिळणारे प्राधान्य काढले.

तारतंत्री (वायरमन) (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: SSC उत्तीर्ण आणि शासनमान्य ITI चा तारतंत्री (वायरमन) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. Nagarparishad Bharti Update 2026

✅ बदल: अनुभवधारकांना मिळणारे प्राधान्य काढले.

अनुरेखक (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता:

  • SSC उत्तीर्ण.
  • शासनमान्य ITI कडील AutoCAD किंवा Spatial Planning मधील GIS कोर्स उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे ज्ञान.
✅ बदल: पूर्वी HSC आवश्यक होती, आता SSC पुरेशी. अनुभवाचे प्राधान्य काढले.

आरेखक (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता:

  • SSC उत्तीर्ण.
  • शासनमान्य ITI कडील AutoCAD किंवा Spatial Planning मधील GIS कोर्स उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे ज्ञान.
✅ बदल: HSC ऐवजी SSC, GIS चा पर्याय जोडला, अनुभवाचे प्राधान्य काढले.

लेखा व लेखा परीक्षण सेवा मधील बदल

रोखपाल (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता:

  • कोणत्याही शाखेची पदवी.
  • मराठी 30 / इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • मराठी भाषेचे ज्ञान.

✅ बदल: MS-CIT काढले. Nagarparishad Bharti Update 2026

नगरपरिषद भरती अग्निशमन संवर्ग आणि सेवा

वाहन चालक कम ऑपरेटर (यंत्र चालक) (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित शैक्षणिक पात्रता:

  • SSC उत्तीर्ण.
  • राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम, किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा 2 वर्षे कालावधीचा अग्निशमन कोर्स.
  • जड वाहन चालवण्याचा वैध परवाना.
  • मराठी भाषेचे ज्ञान.
✅ बदल: प्रशिक्षणासाठी नवीन पर्याय जोडले आणि जड वाहन चालक म्हणून 3 वर्षे अनुभवाची अट काढली.

नगरपरिषद सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यकीय अधिकारी (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: MBBS पदवी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियमांतर्गत नोंदणी आणि मराठी भाषेचे ज्ञान.

✅ बदल: 3 वर्षे अनुभवाची अट काढली.

आरोग्य सहायक (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: HSC उत्तीर्ण, शासनाच्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विहित किमान 12 महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम / स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान.

✅ बदल: 2 वर्षे अनुभवाची अट काढली.

परिचारिका (गट-क) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: HSC उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी (GNM) पदविका उत्तीर्ण प्रमाणपत्र, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आणि मराठी भाषेचे ज्ञान. Nagarparishad Bharti Update 2026

✅ बदल: 3 वर्षे अनुभवाची अट काढली.

नगरपरिषद भरती गट-ड पदांची सुधारित पात्रता

व्हालमन – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता: SSC उत्तीर्ण, शासनमान्य ITI चा नळ कारागीर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान.

✅ बदल: MS-CIT आणि अनुभवाचे प्राधान्य दोन्ही काढले.

अग्निशामक विमोचक (फायरमन) – सरळसेवा 100%:

सुधारित पात्रता:

  • SSC उत्तीर्ण.
  • राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचा 6 महिने अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम, किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा 2 वर्षे अग्निशमन कोर्स उत्तीर्ण.
  • मराठी भाषेचे ज्ञान.
✅ बदल: अग्निशमन प्रशिक्षणासाठी नवीन पर्याय जोडले.

सफाई कामगार – नामनिर्देशन / वारसाहक्काने:

सुधारित पात्रता: चौथी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान.

बदल: पूर्वी सातवी उत्तीर्ण आवश्यक होती, आता चौथी पुरेशी.

Nagarparishad Bharti 2026 Age Limit

वयोमर्यादा:

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय:
    • खुला प्रवर्ग (General/Unreserved): ३८ वर्षे
    • मागावसवर्गीय प्रवर्ग (OBC / SC / ST / EWS): ४३ वर्षे
    • दिव्यांग / खेळाडू / प्रकल्पग्रस्त: नियमानुसार ५ ते १० वर्षे अतिरिक्त सवलत.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Nagarparishad Bharti 2026 Exam Pattern

परीक्षा पॅटर्न:

  • एकूण गुण: २०० गुण
  • एकूण प्रश्न: १०० प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला २ गुण)
  • वेळ: २ तास (१२० मिनिटे)
  • विषय:
    1. मराठी भाषा (Marathi) – १५ प्रश्न (३० गुण)
    2. इंग्रजी भाषा (English) – १५ प्रश्न (३० गुण)
    3. सामान्य ज्ञान (General Knowledge) – १५ प्रश्न (३० गुण)
    4. बौद्धिक चाचणी / अंकगणित (Reasoning & Maths) – १५ प्रश्न (३० गुण)
    5. विषय संबंधित तांत्रिक ज्ञान (Technical Subject) – ४० प्रश्न (८० गुण)
ही भरती पहा: CRPF Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 521 जागांसाठी भरती, पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण

How to Apply Online for Nagarparishad Bharti 2026

अशा पद्धतीने अर्ज करा:

  1. महाडिएमए (Directorate of Municipal Administration) च्या अधिकृत पोर्टल mahadma.maharashtra.gov.in वर जा.
  2. होमपेजवर “नगरपरिषद भरती २०२६ ऑनलाईन अर्ज” या लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन नोंदणीसाठी ‘New Registration’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीद्वारे प्रोफाईल तयार करा.
  4. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि पत्त्याचा तपशील अचूक भरा.
  5. पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे (जात प्रमाणपत्र, डोमासाईल, शैक्षणिक गुणपत्रक) अपलोड करा.
  6. ऑनलाईन गेटवेद्वारे (UPI/Credit Card/Net Banking) अर्ज फी भरा.
  7. अर्ज Submit करा व त्याची PDF / प्रिंट डाऊनलोड करून जतन करा.

महत्त्वाच्या तारखा (Important Date)

कार्यक्रमतारीख
आदेश जारी18 सप्टेंबर 2026
अंमलबजावणीआदेश प्रसिद्धीच्या दिनांकापासून तात्काळ
पुढील भरती जाहिरातलवकरच जाहीर होईल

Nagarparishad Bhrati 2026 Apply Online

लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शासन आदेश PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Nagarparishad Bharti Update 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :