PSI Selection Process in Maharashtra in Marathi

मित्रांनो भरतीची तयारी करणाऱ्या कित्येक उमेदवारांचे स्वप्न PSI होण्याचे असते. तर आज आपण या लेखामध्ये PSI Selection Process in Maharashtra बद्दल ची सर्व माहिती पाहणार आहोत. सोबतच यामध्ये PSI होण्यासाठी कोण पात्र आहे, निकष काय आहेत? PSI Exam कशी होते? अशी पूर्ण माहिती नमूद केली आहे.
त्यामुळे जर तुम्ही पण PSI होण्याची तयारी करत आहात तर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. जेणेकरून तुम्हाला याबद्दल सर्व आवश्यक माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या ग्रुप ला लगेच जॉइन करा. PSI Selection Process in Maharashtra
PSI Eligibility Criteria
आवश्यक पात्रता : मित्रांनो जर तुम्हाला PSI व्हायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. त्याची सर्व माहिती पुढे दिली आहे. कारण PSI बनण्यासाठी MPSC मार्फत परीक्षा द्यावी लागते, स्पर्धा परीक्षा मधून पास झाल्यावर त्याच पात्र उमेदवारांना निवडले जाते. यासाठी सुरुवातीला फॉर्म भरतानाच काही निकष सांगण्यात आले आहेत, त्यात वयाची अट, शिक्षण इत्यादी गोष्टी नमूद आहेत.
PSI Educational Qualification
आवश्यक शिक्षणिक पात्रता : तुम्हाला जर MPSC अंतर्गत PSI पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे शिक्षण हे खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे. आणि जर तुमचे शिक्षण कमी असेल तर मात्र उमेदवार अर्ज सादर करु शकत नाही, MPSC द्वारे ज्या शिक्षणाच्या अटी दिल्या आहेत त्याच लागू आहेत. PSI Selection Process in Maharashtra
- MPSC अंतर्गत PSI पदासाठी कोणतीही पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षी असणारा उमेदवार अर्ज करू शकतो.
PSI Age Limit
वयोमर्यादा : शैक्षणिक पात्रतेप्रमानेच उमेदवारकडे दिल्याप्रमाणे वयोमर्यादा देखील असणे आवश्यक आहे.
- पीएसआय पदासाठी वयाची अट १९ ते ३१ वर्षे पर्यन्त आहे. १९ वर्षे हि किमान वयोमर्यादा आहे, तर 31 वर्षे हि कमाल मर्यादा आहे. सोबतच यामध्ये मागासवर्गीय, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, यासारख्या आरक्षित गटातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये विशेष 5 वर्षांची सूट आहे. सामान्य स्वरुपात सांगायचे झाले तर 19 ते 36 वर्षे अशी वयाची अट मागासवर्गीय आणि इतर आरक्षित गटासाठी लागू असणार आहे.
सामान्य प्रवर्ग | १९ ते ३१ वर्षे |
मागासवर्ग | 19 ते 36 वर्षे |
💻 अपडेट साठी आपला टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
PSI Physical Qualification
शारीरिक पात्रता : पीएसआय पदासाठी लागणारी शारीरिक पात्रतेची माहिती पुढे दिली आहे.
पुरुष | महिला | |
---|---|---|
उंची | 165 सेंटिमीटर | 157 सेंटीमीटर |
छाती | 79 सेंटीमीटर | लागू नाही |
पुरुषांसाठी:
इवेंट | गुण | इतर माहिती |
---|---|---|
गोळाफेक | १५ गुण | ७.५० मी |
पूल अप्स | २० गुण | ८ पुलअप्स |
लांब उडी | १५ गुण | ४.५० मी |
धावणे | ५० गुण | ८०० मी (२ मी.३० सेकंद) |
महिलांसाठी:
इवेंट | गुण | इतर माहिती |
---|---|---|
गोळाफेक | १५ गुण | ६ मी |
धावणे | ४० गुण | २०० मी (३५ सेकंद) |
चालणे | ५० गुण | ३ किमी (२३ मिनिट) |
ही महत्वाची माहिती पहा :
PSI Exam Details

PSI परीक्षा चाचणी :
PSI परीक्षेसाठी एकूण 4 टप्पे असतात, या चारी टप्प्यामध्ये जर उमेदवार पास झाले तर त्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे पात्रता मेरीट लिस्ट काढून PSI पदासाठी निवडले जाते. PSI Selection Process in Maharashtra
टप्पे | गुण | अधिक माहिती |
---|---|---|
संयुक्त पूर्व परीक्षा | १०० गुण | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर |
मुख्य परीक्षा | ४०० गुण | पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र |
शारीरीक चाचणी | १०० गुण | – |
मुलाखत | ४० गुण | – |
1) संयुक्त पूर्व परीक्षा :
पूर्व परीक्षा हि केवळ एकाच टप्प्यामध्ये होणार आहे, या परीक्षेत जे उमेदवार पास होतील केवळ त्यांना मुख्य परीक्षा देता येईल.
2) मुख्य परीक्षा :
मुख्य परीक्षेत एकूण दोन पेपर असतात, दोन्ही पेपर 200-200 मार्कचे असतात.
- पेपर १ (संयुक्त) – २०० गुण (मराठी & इंग्रजी व्याकरण)
- पेपर २ (स्वतंत्र) – २०० गुण (१० विषय असतात)
3) शारीरीक चाचणी :
पुरुष आणि महिलांसाठी हि चाचणी थोडीफार वेगळी असते, महिलांना यामध्ये शिथिलता दिली जाते.
उंची, छाती, गोळाफेक, धावणे, चालणे, लांब उडी, पूल अप्स हे सर्व काही उमेदवारांना या शारीरीक चाचणी दरम्यान करावे लागते. PSI Selection Process in Maharashtra
4) मुलाखत :
मुलाखती मध्ये पात्र उमेदवारांना काही प्रश्न विचारले जातात, मुलाखती मध्ये त्या प्रश्नांचे उत्तर उमेदवाराने कसे दिले या नुसार त्यांना मार्क दिले जातात.
PSI पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलॅबस

1) पूर्व परीक्षा :
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- भारतीय राज्यघटना (Indian Polity)
- अर्थशास्त्र (Economics)
- सामान्य विज्ञान (General Science)इ .
- अंक गणित | बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning and Arithmetic)
2) मुख्य परीक्षा :
- मराठी व्याकरण –
- व्याकरण (Grammar)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- इंग्रजी व्याकरण –
- व्याकरण (Grammar)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- भाषाशुद्धता (Language Proficiency)
- निबंध लेखन (Essay Writing)
- सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी –
- चालू घडामोडी (Current Affairs)
- इतिहास (History)
- भूगोल (Geography)
- भारतीय राज्यघटना (Indian Polity)
- अर्थशास्त्र (Economics)
- सामान्य विज्ञान (General Science)
- पर्यावरण (Environment)
- अंकगणित (Arithmetic)
- तर्कशक्ती चाचणी (Logical Reasoning)
- बौद्धिक क्षमता (Intellectual Ability)
अशा पद्धतीची पूर्व परीक्षा असते. आणि उमेदवार 4 टप्प्यामध्ये पास झाले कि त्यांचे मार्क तपासले जातात, मुख्य परीक्षा + मुलाखत यावरून फाइनल कट ऑफ लिस्ट लागते. ज्यांना या मध्ये सर्वात जास्त मार्क आहेत त्यांची निवड PSI पदावर केली जाते. PSI Selection Process in Maharashtra
मित्रांनो अशा पद्धतीने उमेदवारांची PSI पदासाठी निवड करण्यात येते. तुम्हाला PSI Selection Process in Maharashtra ही माहिती कशी वाटली? आणि ही माहिती त्या मित्रांना नक्की शेअर करा जे PSI होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि अशाच अपडेट आपल्या Bhartiera.in या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :