PM Vidyalakshmi Scheme: विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये पर्यन्त शैक्षणिक लोन, पहा सविस्तर प्रक्रिया व पात्रता

PM Vidyalakshmi Scheme Information in Marathi

मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर चांगलेच पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच सरकारने PM Vidyalakshmi Scheme या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. केवळ ज्ञान मिळवण्यासाठीच नव्हे तर उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

मात्र, अनेकदा आर्थिक अडचणीमुळे होतकरू विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना (PM Vidyalakshmi Yojana) ही एक फारच उपयुक्त आणि आधारदायक योजना आहे. पुढे या योजनेबद्दल ची सर्व माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा. आणि या योजनेचा लाभ घ्या.

जर तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप टेलेग्राम चॅनल लगेच जॉइन करा

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

PM Vidyalakshmi Loan Scheme

योजनेचा उद्देश :

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने चा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणे. कोणताही विद्यार्थी केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पारदर्शक, सुलभ आणि ऑनलाइन प्रक्रियेद्वारे विविध बँकांमार्फत शिक्षण कर्ज मिळावे, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे या योजने द्वारे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

PM Vidyalakshmi Scheme Benefits

योजनेचा फायदा : या स्कीम मुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रकारे लाभ होणार आहे.

  • 3% व्याज सवलत:
    • वार्षिक कुटुंबीय उत्पन्न ₹8 लाखांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना ₹10 लाखांपर्यंतच्या शिक्षण कर्जावर 3% पर्यंत व्याज सवलत मिळते. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना आर्थिक भार कमी होतो.
  • पूर्ण व्याज सवलत:
    • ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹4.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण काळात (म्हणजेच मोरॅटोरियम कालावधीत) पूर्ण व्याज माफ केले जाते.
  • क्रेडिट गॅरंटी:
    • ₹7.5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून 75% क्रेडिट गॅरंटी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जामीनदार अथवा गहाण ठेवण्याची गरज भासत नाही.
  • कोलॅटरलची आवश्यकता नाही:
    • ₹7.5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही कोलॅटरल (गहाण) आवश्यक नाही.
  • एकाच पोर्टलवर सर्व सुविधा:
    • विद्यार्थ्यांना एकाच पोर्टलवर (Vidyalakshmi Portal) सर्व बँकांचे कर्ज पर्याय, अर्ज प्रक्रिया, अर्ज स्थिती यांचा मागोवा घेता येतो.

PM Vidyalakshmi Scheme Eligibility

PM Vidyalakshmi Scheme
PM Vidyalakshmi Scheme

आवश्यक पात्रता : तुम्हाला जर या Loan Scheme चा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • 10+2 किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असावी.
  • मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा अधिक नसावे.

ही अपडेट पहा :

Kotak Junior Scholarship Program 2025-26: कोटककडून 10वी पास विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 3,500 शिष्यवृत्ती! असा करा अर्ज

Mirae Asset Scholarship 2025: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40 हजार रु.पर्यंत स्कॉलरशिप मिळत आहे! लगेच इथून अर्ज करा!

Eligible educational institutions for PM Vidyalakshmi Scheme

पात्र शैक्षणिक संस्था :

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत देशभरातील “गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्था” (QHEIs) पात्र ठरतात. दरवर्षी शिक्षण मंत्रालयाकडून या संस्थांची यादी प्रकाशित व अद्ययावत केली जाते. मान्यताप्राप्त सरकारी व खाजगी संस्थांमधून उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याची नोंद घ्या.

PM Vidyalakshmi Scheme Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • 10वी/12वी ची गुणपत्रिका
  • महाविद्यालयाचा प्रवेशपत्र/ऑफर लेटर
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • बँकेचे पासबुक

PM Vidyalakshmi Scheme Apply Process

अर्ज प्रक्रिया : जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पुढील स्टेप द्वारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. नोंदणी :
    • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी.
  2. अर्ज भरणे :
    • “Common Educational Loan Application Form (CELAF)” भरावा, जो देशातील सर्व बँकांकडून स्वीकारला जातो.
  3. बँक निवड :
    • अर्ज करताना विद्यार्थ्यांना किमान तीन बँकांचा पर्याय निवडावा लागतो, ज्यांच्याकडे अर्ज पाठवला जाईल.
  4. कागदपत्रे अपलोड :
    • आवश्यक शैक्षणिक व आर्थिक कागदपत्रे अपलोड करावीत.
  5. अर्ज सादर :
    • अर्ज पूर्ण करून सबमिट केल्यावर अर्जाची स्थिती पोर्टलवरून तपासता येते.
💻 आपला टेलेग्राम चॅनल जॉइन करायेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

तुम्हाला शिक्षण कर्ज (Education Loan) मंजूर झाल्यानंतर आणि पहिला हप्ता वितरित झाल्यानंतर, विद्यार्थी pmvidyalaxmi.co.in या पोर्टलवर जाऊन व्याज सवलतीसाठी स्वतंत्र अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांना ‘PM Vidyalaxmi Digital Rupee’ अ‍ॅप डाउनलोड करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

महत्वाची सूचना : जर तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • कोणत्याही प्रकारच्या पेमेंटची मागणी करणाऱ्या कॉल्स, SMS, ईमेल्स अथवा WhatsApp संदेशांपासून सावध रहा.
  • विद्या लक्ष्मी पोर्टल कोणत्याही प्रकारचा पेमेंट मागत नाही.
  • QR कोड स्कॅन करून पैसे पाठवण्यास सांगणाऱ्या लिंक अथवा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही शैक्षणिक कर्जासाठी एक अतिशय सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित योजना आहे. या योजनेद्वारे हजारो विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि उज्वल भविष्याची वाट धरली आहे. जर तुम्हालाही उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असेल, तर तुम्ही पण या योजनेचा लाभ नक्की घ्या.

PM Vidyalakshmi Scheme ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना शैक्षणिक कर्ज (Education Loan) मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!